JEE Main Session 2 Result: जेईई मेन्स सत्र 2 चा निकाल लवकरच! 6 ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता

एनटीएने सध्या जेईई मेन्सच्या निकालाची (JEE Mains Results) तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, मात्र दोन दिवसांत निकालाची तारीखही जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लवकरच उमेदवारांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. एनटीए jeemain.nta.nic.in अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

JEE Main Session 2 Result: जेईई मेन्स सत्र 2 चा निकाल लवकरच! 6 ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता
JEE Mains session 2 resulsImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 1:37 PM

दोन्ही सत्रांची जेईई मेन्सची (JEE Mains) परीक्षा संपली आहे. सत्र 1 चा निकाल यापूर्वीच जाहीर झाला आहे. आता सत्र 2चा निकाल (JEE Mains Session 2) जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. परीक्षेला बसलेले विद्यार्थी निकाल जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. रिपोर्टनुसार, 6 ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर केला जाऊ शकतो. एनटीएने सध्या जेईई मेन्सच्या निकालाची (JEE Mains Results) तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, मात्र दोन दिवसांत निकालाची तारीखही जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लवकरच उमेदवारांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. एनटीए jeemain.nta.nic.in अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

जेईई मेन्स सेशन 2 परीक्षेसाठी आन्सर की जाहीर

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन्स सेशन 2 परीक्षेसाठी आन्सर की जाहीर केली आहे. या परीक्षेला बसणारे विद्यार्थी jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते डाउनलोड करू शकतात. आन्सर की डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख (Birth Date) टाकावी लागणार आहे. त्यानंतर, उमेदवार आन्सर की डाउनलोड करू शकतात. जे उमेदवार या आन्सर की वर समाधानी नाहीत ते उमेदवार 5 ऑगस्टपर्यंत संध्याकाळी 5 वाजता उत्तर कीवर आक्षेप नोंदवू शकतात. आन्सर की डाउनलोड केल्यानंतर उमेदवार आपले गुण मोजू शकतात. अर्जदार 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आन्सर की विरूद्ध आक्षेप नोंदवू शकतात. उमेदवारांना प्रति चॅलेंज 200 रुपये शुल्क भरावे लागेल.

जेईई मेन्सचा निकाल कसा पाहावा

  • उमेदवार jeemain.nta.nic.in एनटीएच्या वेबसाइटला भेट देतात.
  • त्यानंतर होमपेजवर दिसणाऱ्या रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
  • आता विनंती केलेली माहिती जसे की जन्मतारीख आणि नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.
  • त्यानंतर रिझल्ट तुमच्या स्क्रीनवर दिसेल
  • उमेदवार आता स्कोअर पाहून निकाल डाउनलोड करू शकतात.
Non Stop LIVE Update
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.