CET परीक्षांच्या तारखा जाहीर, उदय सामंतांची ट्विटवरुन घोषणा, ऑनलाईन नोंदणीला सुरुवात

महाराष्ट्राचे (Maharashtra) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटीच्या तारखा (CET Exam Dates) जाहीर केल्या आहेत.

CET  परीक्षांच्या तारखा जाहीर, उदय सामंतांची ट्विटवरुन घोषणा, ऑनलाईन नोंदणीला सुरुवात
CET
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 10:19 PM

मुंबई : महाराष्ट्राचे (Maharashtra) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटीच्या तारखा (CET Exam Dates) जाहीर केल्या आहेत. मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि.03 जून ते 10 जून, 2022 रोजी होणार आहेत. तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि.11 जून ते 28 जून, 2022 तसेच कला शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि.12 जून, 2022 रोजी घेण्यात येणार आहेत, असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

उदय सामंत यांचं ट्विट

सीईटीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षांचे ऑनलाईन नोंदणी अर्ज स्वीकृती सुरु करण्यात आलेली आहे. अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांचे माहिती पुस्तिका, वेळापत्रक आणि अभ्यासक्रम राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर www.mahacet.org उपलब्ध करुन देण्यात आले आहे. उच्च शिक्षण विभागाचे विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षाचे ऑनलाईन अर्ज नोंदणी 19 मार्च, 2022 ते 12 एप्रिल, 2022 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच सीईटी परीक्षा अंदाजे दिनांक 03 जून, 2022 ते 10 जून, 2022 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी सीईटी प्रक्रिया जाहीर

तंत्रशिक्षणांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षाचे ऑनलाईन अर्ज नोंदणी 10 फेब्रुवारी 2022 ते 15 एप्रिल 2022 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच संबंधीत सामाईक प्रवेश परीक्षा अंदाजे दिनांक 11 जून 2022 ते 28 जून2022 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. तसेच कला शिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षा 12 जून, 2022 रोजी घेण्यात येणार आहे. सर्व संबंधीत उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, नमूद कालावधीत आपले अर्ज सादर करुन परीक्षा द्यावी, असं आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून करण्यात आलं आहे.

इतर बातम्या :

आता जिल्हा परिषदेच्या शाळांवर CCTV ची नजर, वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

यंदा एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू राहणार, रविवारची सुटीही रद्द, विद्यार्थ्यांच्या 100 टक्के उपस्थितीला परवानगी

Maharashtra Higher and Technical Education Minsiter Uday Samant declared tentative schedule for all cet exam

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.