AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Scholarship exam : पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख ठरली, MSEC ची मोठी घोषणा

पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Scholarship exam : पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख ठरली, MSEC ची मोठी घोषणा
EXAM
| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 10:57 AM
Share

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (MSEC) घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Exam) 20 फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे. एमसईसीचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाशी संलग्नित शाळांमधील पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज दाखल करु शकतात.

20 फेब्रुवारीला परीक्षा

पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिष्यवृत्ती परीक्षांचं आयोजन करते. दरवर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये ही परीक्षा आयोजित केली जाते. 2021-22 या शैक्षणिक वर्षातील परीक्षा आयोजित करण्यासाठी 20 फेब्रुवारी 2022 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. पाचवी आणि आठवीची परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी परीक्षा घेण्याचं नियोजन करण्यात येणार आहे.

ऑनलाईन अर्ज कुठं करायचा?

पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना www.msecpune.in आणि https://msecpuppss.in या वेबसाईटवर अर्ज करण्याच आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आलं आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा फीमध्ये वाढ

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची फी यावर्षीपासून वाढवण्यात आली आहे. नव्या शासन निर्णयाप्रमाणं बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क 50 रुपये तसेच परीक्षा शुल्क 150 रुपये करण्यात आलंय. मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थ्यासाठी प्रवेश शुल्क 50 रुपये तर परीक्षा शुल्क 75 रुपये करण्यात आलं आहे.

फी वाढ करण्याचं कारण?

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवेदनपत्रे भरणे, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची छपाई, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, निकाल जाहीर करणे, गुणवत्ता याद्या तयार करणे इत्यादी कामकाजासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येतो. त्यामुळं, शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आलं आहे.

इतर बातम्या

Telangana : चिंता वाढवणारी बातमी, तेलंगाणातील निवासी शाळेत 27 विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग

SSC, HSC Exam | कोरोनामध्ये अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ

Maharashtra State Examination Council Scholarship exam of 5th and 8th class conduct on 20 February

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.