कोरोनाचं संकट सुरु आमची पायपीट थांबवा, विद्यार्थ्यांचं थेट भाजप खासदारांना साकडं

'नीट'चे परीक्षा केंद्र प्रत्येक जिल्ह्यात असावे आणि धुळे जिल्ह्यालाही परीक्षा केंद्र द्यावे, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे. NEET aspirants Dhule meet Subhash Bhamare

कोरोनाचं संकट सुरु आमची पायपीट थांबवा, विद्यार्थ्यांचं थेट भाजप खासदारांना साकडं
डॉ.सुभाष भामरेंना निवेदन

धुळे: महाराष्ट्रात नीट परीक्षा केंद्र ठराविक जिल्ह्यात असल्याने विद्यार्थ्यांची पायपीट होते. परीक्षा केंद्रावर पोहोचायला उशीर झाल्याने परीक्षेला मुकणे, शहराची व्यवस्थित माहिती नसल्याने परीक्षा केंद्र शोधण्यासाठी ऐनवेळी धावपळ करावी लागते. यामुळे मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागतं हे टाळण्यासाठी ‘नीट’चे परीक्षा केंद्र प्रत्येक जिल्ह्यात असावे आणि धुळे जिल्ह्यालाही परीक्षा केंद्र द्यावे, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे. सदर हे निवेदन डॉ. सीमा सोनवणे, भाग्यश्री बागुल यांच्या नेतृत्वाखाली भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे यांना देण्यात आले आहे. (Dhule NEET aspirants demanded to start NEET Exam center in all districts in nation including Dhule meet Subhash Bhamare )

परीक्षा केंद्रांची अपुरी संख्या

देशातील सरकारी आणि खासगी मेडिकल कॉलेजांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, बीएएमएस अशा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ‘नीट’ परीक्षा घेण्यात येते. नीट परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. त्यामुळे देशभरातून लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. मात्र, विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत देशात परीक्षा केंद्रांची संख्या तोकडी आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नगर, अमरावती, सातारा, कोल्हापूर, मुंबई उपनगर, बीड, बुलडाणा, जळगाव, लातूर, सोलापूर या जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर परीक्षा होते.

परीक्षा केंद्र शोधण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ

नीट परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर सकाळी नऊपूर्वी हजर राहणे गरजेचे आहे. देशात आणि राज्यात प्रत्येक जिल्हास्तरावर नीट परीक्षा केंद्रे नसल्याने परगावाहून आणि इतर जिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी ऐनवेळी धावपळ करावी लागते. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होत असतात. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पर जिल्ह्यात जाण्यासाठी तीन ते चार तासांचा प्रवास करावा लागतो. यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडते.

सुभाष भामरे यांना साकडं

कोरोना सारख्या स्थितीत धुळे जिल्ह्यातून सात ते आठ हजार विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून या परीक्षेसाठी जावे लागते. त्यामुळे सदर ही नीट या परीक्षेसाठी स्थानिक परीक्षा केंद्र धुळे जिल्ह्यातच सुरु करावे अशी मागणी आज धुळे जिल्ह्यातून विद्यार्थी पालकांच्या वतीने करण्यात आली. खासदार डॉ.सुभाष भामरे यांना याबाबात निवेदन देण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रात 28 जिल्ह्यात कोरोनाचं संकट पसरलं, लॉकडाऊन हाच पर्याय? वाचा सविस्तर

कोरोनाचा धोका वाढल्यामुळे केंद्र सरकार अलर्ट; राज्यांना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना

(NEET aspirants demanded to Subhash Bhamare start NEET Exam centre in all districts in nation including Dhule meet Subhash Bhamare )

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI