AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET: नीट परीक्षेतलं गाजलेलं ‘ते’ प्रकरण! इनरवेअर काढायला लावलेल्या विद्यार्थिनींना परीक्षा पुन्हा एकदा द्यायची संधी

हे प्रकरण होतं परीक्षेला बसण्यापूर्वी विद्यार्थिनींना इनरवेअर काढायला लावल्याचं प्रकरण. केरळच्या कोल्लम जिल्ह्यात नीट परीक्षेदरम्यान चेकिंगदरम्यान मुलींनी इनरवेअर काढल्याचं प्रकरण समोर येताच सगळीकडे एकच गोंधळ उडाला.

NEET: नीट परीक्षेतलं गाजलेलं 'ते' प्रकरण! इनरवेअर काढायला लावलेल्या विद्यार्थिनींना परीक्षा पुन्हा एकदा द्यायची संधी
NEET examImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 27, 2022 | 11:42 AM
Share

नीट परीक्षेच्या चेकिंग (NEET Exam Checking) दरम्यान एक प्रकरण चांगलंच चर्चेत होतं, या प्रकरणावरून देशात खळबळ माजली होती. हे प्रकरण होतं परीक्षेला बसण्यापूर्वी विद्यार्थिनींना इनरवेअर काढायला लावल्याचं प्रकरण. केरळच्या कोल्लम (Keral Kollam NEET Exam) जिल्ह्यात नीट परीक्षेदरम्यान चेकिंगदरम्यान मुलींनी इनरवेअर काढल्याचं प्रकरण समोर येताच सगळीकडे एकच गोंधळ उडाला. जुलै मध्ये, एका व्यक्तीने कोट्टारकरा पोलिसांकडे तक्रार ही दाखल केली याच प्रकरणातली आता एक मोठी अपडेट समोर येतीये. या मुलींना 4 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार असल्याचे एनटीएने (National Testing Agency) म्हटलंय. यासंदर्भातला ईमेलही पाठवण्यात आला आहे.

मुलींची इनरवेअर तपासण्याचा प्रकार

नीट यूजी परीक्षेदरम्यान तपासणी करताना काही मुलींची इनरवेअर तपासण्याचा प्रकार घडला होता. यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नीट परीक्षा घेणार असल्याचं सांगितलं आहे. मुलींनी सांगितले की वैद्यकीय प्रवेश परीक्षेला बसण्यापूर्वी चेकिंग करत असताना त्यांना त्यांचे आतील पोशाख काढून टाकण्यास सांगण्यात आले होते. या मुलींना ४ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार असल्याचे एनटीएने म्हटले आहे. याची पुष्टी करण्यासाठी ईमेलही पाठवण्यात आला आहे.

 ब्रा च्या मेटल हुक्समुळे सुरक्षिततेची चिंता

केरळच्या कोल्लम जिल्ह्यात नीट परीक्षेदरम्यान चेकिंगदरम्यान मुलींनी इनरवेअर काढल्याचं प्रकरण समोर येताच जुलै मध्ये एका व्यक्तीने कोट्टारकरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत चतुमंगलममधील परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी एनईईटीला बसलेल्या विद्यार्थिनींना त्यांची ब्रा काढण्यास सांगण्यात आले होते. रिपोर्ट्सनुसार, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी इनरवेअर काढण्यास भाग पाडले गेले होते कारण त्यांच्या ब्रा च्या मेटल हुक्समुळे सुरक्षिततेची चिंता निर्माण होत होती.

प्रकरणाने बरेच लक्ष वेधून घेतले

पोलिसांनी आयपीसीच्या कलम 354 आणि 509 अन्वये एफआयआरही नोंदविला. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एनईईटी परीक्षा केंद्रावर उपस्थित महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे दोन सदस्य आणि केंद्राच्या संरक्षणासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीच्या तीन सदस्यांचा समावेश आहे. मात्र, अटकेनंतर सर्व आरोपींना जामीन मिळाला. या कथित घटनेमुळे खूप संताप आणि व्यापक निषेध व्यक्त केला गेला. त्यानंतर एनएचआरसीने कोल्लम ग्रामीण एसपीला या प्रकरणाची चौकशी करून 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले गेले. या प्रकरणाने बरेच लक्ष वेधून घेतले आणि त्यामुळेच राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानेही या घटनेत सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या आरोपांची चौकशी करून चार आठवड्यांत अहवाल सादर करण्यासाठी एनटीएने त्रिसदस्यीय समितीही स्थापन केली होती.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.