NEET UG 2021 Scam : नीट परीक्षा पुन्हा घ्या, पेपर व्हायरल प्रकरणी सीबीआय चौकशी करा, विद्यार्थ्यांची एनटीएकडे मागणी

नीट परीक्षेत जयपूरमध्ये परीक्षा सुरु असतानाच पेपर परीक्षा केंद्राबाहेर मोबाईल वर फोटो काढून पाठवण्यात आला होता. हा सगळा प्रकार एकूण 30 लाखांसाठी झाला होता.

NEET UG 2021 Scam : नीट परीक्षा पुन्हा घ्या, पेपर व्हायरल प्रकरणी सीबीआय चौकशी करा, विद्यार्थ्यांची एनटीएकडे मागणी
Student
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 1:42 PM

नवी दिल्ली: मेडिकल अभ्यासक्रमांसाठीची नीट यूजी परीक्षा 12 स्पटेंबरला पार पडली होती. नीट परीक्षेत जयपूरमध्ये परीक्षा सुरु असतानाच पेपर परीक्षा केंद्राबाहेर मोबाईल वर फोटो काढून पाठवण्यात आला होता. हा सगळा प्रकार एकूण 30 लाखांसाठी झाला होता. जयपूरमधील प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी आणि नीट परीक्षा पुन्हा घेतली जावी, अशी मागणी नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी एनटीएकडे केली आहे. एनटीएकडे विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं निवदेन सादर करत ही मागणी केली आहे. नीट परीक्षेचा पॅटर्न समजण्यास विद्यार्थ्यांना अजून वेळ लागेल, असंही नमूद करण्यात आलं आहे.

परीक्षेतील छोटा बदल विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक

नीट परीक्षेच्या प्रक्रियेत होणारा छोटासा बदल विद्यार्थ्यासांठी त्रासदायक असतो, असं विद्यार्थ्यांनी एनटीएला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. नीट परीक्षेच्या पॅटर्न समजून घेण्यास विद्यार्थ्यांनी आणखी काही कालावधी लागेल, असंही म्हटलं आहे. वैद्यकीय प्रवेशांसाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा वर्षातून एखदा घेण्यात असल्यानं विद्यार्थ्यांसाठी तणाव वाढवणारी ठरते, असंही नमूद करण्यात आलं आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विविध बोर्डांनी बारावीचा अभ्यासक्रम कमी केला होता त्या पार्श्वभूमीवर एनटीएनं नीट परीक्षेसंदर्भात बदल केले होते.

विद्यार्थ्यांच्या निवेदनातील प्रमुख मुद्दे

नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याचं पहिल प्रकरण जयपूरमध्ये घडलं आहे. तो पेपर इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे इतरत्र पसरवून उत्तरतालिका तयार करण्यात आली. या प्रकराची सीबीआय चौकशी व्हावी. नीट परीक्षा आणि राज्य पातळीवरील प्रवेश परीक्षा यांच्यातील अंतर कमी असल्यानं विद्यार्थ्यांना तणावाला सामोरं जावं लागतं, असं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार वर्षातून दोन वेळा नीट परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी देखील विद्यार्थ्यांनी केली आहे.

जयपूर पेपर लीक प्रकरण नेमकं काय?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून रविवारी देशभरात नीट यूजी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. 12 सप्टेंबरला देशभरात विविध परीक्षा केंद्रावर नीट परीक्षा पार पडली होती. परीक्षा सुरु असतानाच प्रश्नपत्रिका लीक झाली होती. जयपूर पोलिसांनी या प्रकरणी 8 जणांना अटक केली होती. परीक्षार्थीसह पोलिसांनी तिच्या कुटंबातील सदस्य, परीक्षा केंद्र सुपरवायझर आणि इतरांना अटक केली होती. जयपूर पोलिसांनी प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाची डील 30 लाखांना ठरल्याची माहिती दिली होती.

जयपूरमध्ये दिनेश्वरी कुमारी ही विद्यार्थिनी, तिचे काका, पर्यवेक्षक राम सिंग, परीक्षा केंद्राचा प्रमुख मुकेश आणि इतर चार जणांना अटक केली होती. डीसीपी रिचा तोमर यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. प्रश्नपत्रिका लीक करण्यासाठी मोबाईल फोनचा वापर करण्यात आला. प्रश्नपत्रिकेचे फोटो मोबाईलवर काढून सोडवून घेण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आली, असी माहिती रिचा तोमर यांनी दिली होती.

इतर बातम्या:

NEET UG 2021 : नीट परीक्षा यूजी परीक्षेच्या प्रवेशपत्रावर केंद्राचा चुकीचा उल्लेख, विद्यार्थ्यांना मनस्ताप

NEET UG 2021: नीट यूजी परीक्षेला आजपासून सुरुवात, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

NEET UG exam scam medical aspirants demanded reexam of neet ug to nta and demand cbi enquiry of paper leak

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.