UPSC CSE Mains 2023 चा निकाल जाहीर; थेट लिंकवर जाऊन पटापट चेक करा
UPSC Mains 2023 परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. संपूर्ण देशातील परीक्षार्थींचं या निकालाकडे लक्ष लागलं होतं. परीक्षार्थी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा निकाल पाहू शकता. आम्ही तुम्हाला निकाल चेक करण्याची सर्वात सोपी पद्धत सांगत आहोत. तुम्ही ही पद्धत स्टेप बाय स्टेप फॉलो केली तर तुम्हाला निकाल पाहणं आणि दुसऱ्यांना निकाल दाखवणंही सोपं जाईल.

नवी दिल्ली | 8 डिसेंबर 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)च्या सिव्हिल सर्व्हिस मुख्य परीक्षा 2023 चा (UPSC CSE Mains 2023) निकाल जाहीर झाला आहे. ही परीक्षा देणारे परीक्षार्थी यूपीएससीची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर जाऊन निकाल पाहू शकतात. यूपीएससीच्या मेन्स परीक्षाचे आयोजन 15 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर 2023 पर्यंत देशभरातील निर्धारीत केंद्रांवर करण्यात आलं होतं. त्याचा अखेर आज निकाल जाहीर झाला आहे. परीक्षार्थी दिलेल्या स्टेप्सनुसार त्यांचा निकाल पाहू शकतात.
मुख्य परीक्षेत यशस्वी झालेले परीक्षार्थींना आता इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात येणार आहे. परीक्षार्थींना मेन्स रिजल्ट आणि मुलाखतीबाबतची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी यूपीएससीने जारी केलेली नोटीस पाहता येणार आहे. या मुख्य परीक्षेचं आयोजन दोन सत्रात करण्यात आलं होतं. पहिल्या सत्राची परीक्षा सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 12 पर्यंत होतं. तर दुसरं सत्राची परीक्षा दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकळी 5 वाजेपर्यंत झाली होती.
निकाल असा चेक करा
UPSC चे अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर जा
होम पेजवर दिलेल्या UPSC Mains Results 2023 च्या लिंकवर क्लिक करा
त्यानंतर एक पीडीएफ तुमच्या स्क्रिनवर येईल
आता रोल नंबर टाकून तुम्ही निकाल चेक करू शकता
UPSC CSE Mains 2023 Direct link परीक्षार्थी या लिंकवर क्लिक करूनही निकाल चेक करू शकतात
मेन्स परीक्षेत यशस्वी परीक्षार्थींना डीएएफ || अर्ज भरावा लागेल. हा अर्ज यूपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हा अर्ज परीक्षार्थी डाऊनलोडही करू शकतात.
दरम्यान, प्राथमिक परीक्षेचं आयोजन 28 मे 2023 ला करण्यात आलं होतं. त्याचा निकाल 12 जून 2023 रोजी जाहीर झाला होता. प्राथमिक परीक्षेत यशस्वी झालेले परीक्षार्थी मुख्य परीक्षेत सामील झाले होते. तर मेन्स एक्झामचा निकाल आज 8 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाला आहे. अंतिम निवड मुलाखत आणि मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाणार आहे. आता मुलाखतीची तारीख घोषित करण्यात आलेली नाही. मुलाखतीसाठी सर्व परीक्षार्थींना प्रवेश पत्र दिलं जाणार आहे.
