Bhabanipur Election Result 2021 LIVE : ममतादीदींच्या भवानीपूर मतदारसंघात तृणमूलला मोठी आघाडी

Bhowanipore Assembly Election Result 2021 Live Update in Marathi | पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सध्या इथून आमदार आहेत. यावेळी तृणमूल काँग्रेसने सोभन देव चट्टोपाध्याय यांना रिंगणात उतरवलं आहे

Bhabanipur Election Result 2021 LIVE : ममतादीदींच्या भवानीपूर मतदारसंघात तृणमूलला मोठी आघाडी
भवानीपूर विधानसभा मतदारसंघ

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका (West Bengal Assembly Election 2021) पहिल्यांदाच आठ टप्प्यात घेण्यात आल्या आहेत. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसने (AITMC) पुन्हा एकदा सत्तेत राहण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षही (BJP) पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरला आहे. राज्यातील 294 विधानसभा मतदारसंघांपैकी भवानीपूरच्या (Bhabanipur/Bhowanipore) जागेवरुन तृणमूल काँग्रेसने सोभन देव चट्टोपाध्याय (Sovandeb Chattopadhyay) यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर भाजपने रुद्रनिल घोष (Rudranil Ghosh) यांना तिकीट दिले आहे. सुरुवातीच्या कलांनुसार तृणमूलने मोठी आघाडी घेतली आहे. (Bhowanipore Election Result 2021 LIVE West Bengal Assembly Seat)

मोहम्मद शादाब खान (Mohammad Shadab Khan) भवानीपूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून एकूण 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा असून बहुमताचा आकडा 148 आहे.

2016 मधील विधानसभा निवडणूक

भवानीपूर विधानसभा मतदारसंघ पश्चिम बंगालच्या कोलकाता दक्षिण जिल्ह्यात येतो. गेल्या दोन निवडणुकांत ही जागा सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या ताब्यात आहे. ही राज्यातील सर्वात हाय प्रोफाइल सीट आहे. कारण पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सध्या इथून आमदार आहेत. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दीपा दासमुंशी यांना 25 हजार 301 मतांच्या फरकाने पराभूत केले होते.

एकूण मतदार

ममता बॅनर्जी यांना 65 हजार 520, तर दीपा दासमुंशी यांना गतवेळी 40 हजार 219 मते मिळाली होती. भाजपा गेल्या वेळी तिसर्‍या क्रमांकावर होती. भाजप उमेदवाराला त्यावेळी 26 हजाराहून अधिक मते मिळाली होती. 2016 च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान या जागेवरील एकूण मतदारांची संख्या 2 लाख 5 हजार 713 इतकी होती. यापैकी 1 लाख 37 हजार 475 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. संपूर्ण विधानसभा मतदारसंघात एकूण 269 मतदान केंद्रे होती आणि जवळपास 67 टक्के मतदान झाले होते.

भवानीपूर विधानसभा जागेवर पहिल्यांदा 1952 मध्ये मतदान झाले होते. तेव्हा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. 1967 च्या निवडणुकांनंतर ही जागा रद्द केली गेली. नंतर 2011 मध्ये ही जागा पुन्हा अस्तित्त्वात आली आणि तृणमूलने तिच्यावर ताबा मिळवला होता. (Bhowanipore Assembly Election Result)

विधानसभा निवडणूक 2016 ची आकडेवारी

विद्यमान आमदार : ममता बॅनर्जी
एकूण मतं : 65520
एकूण मतदान : 205713
मतदानाची टक्केवारी : 66.83 टक्के
एकूण उमेदवार : 11

संबंधित बातम्या :

कोरोनाचा उद्रेक, सोनिया गांधी- ममता बॅनर्जींमध्ये चर्चा; पश्चिम बंगालच्या प्रचारातून काँग्रेसची पूर्णपणे माघार

टीएमसीचा पराभव होणार?, ऑडिओ लिक; प्रशांत किशोर म्हणतात, पूर्ण ऑडिओ रिलीज करा

(Bhowanipore Election Result 2021 LIVE West Bengal Assembly Seat)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI