Imtiaz Jaleel Syed (Aurangabad Lok Sabha Constituency)
इम्तियाज जलील यांचा जन्म 10 ऑगस्ट 1968 रोजी झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. तर भाऊ जेट एअरवेजमध्ये व्यवस्थापक आहे. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या जलील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पत्रकारितेत पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लोकमत टाइम्समधून पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली.
नंतरच्या काळात इम्तियाज जलील यांची एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे पुण्यातील ब्युरो चीफ म्हणून निवड झाली. औरंगाबाद आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये त्यांनी तब्बल 23 वर्षे पत्रकारिता केली. त्यामुळे इम्तियाज जलील यांना महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारणाची चांगली जाण आहे. इम्तियाज जलील यांनी 2014 साली पत्रकारिता सोडून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय मित्रमंडळींसाठी धक्कादायक होता. यावेळी कोणत्या पक्षात जायचे हा पेच त्यांच्यासमोर होता.
काहीजणांनी इम्तियाज जलील यांना ‘आम आदमी पक्षात’ जाण्याचा सल्ला दिला. मात्र, पत्रकारिता करत असतान इम्तियाज जलील एमआयएम पक्षाचे तेलंगणा आणि हैदराबादमधील काम पाहून प्रभावित झाले होते. तसेच प्रस्थापित पक्ष औरंगाबादमध्ये मुस्लिम नेतृत्त्वाला संधी देण्याच्या मताचे नव्हते. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला. 2019मध्ये ते एमआयएमच्या तिकीटावर निवडून आले होते.
Phase | Date | State | Seat |
---|---|---|---|
1 | April 19, 2024 | 21 | 102 |
2 | April 26, 2024 | 13 | 89 |
3 | May 07, 2024 | 12 | 94 |
4 | May 13, 2024 | 10 | 96 |
5 | May 20, 2024 | 8 | 49 |
6 | May 25, 2024 | 7 | 57 |
7 | Jun 01, 2024 | 8 | 57 |