AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Exit Poll : महाराष्ट्रात 48 जागांवर कोण-कोण जिंकणार? पाहा एक्झिट पोलचं नेमकं भाकीत काय?

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 मतदारसंघांमध्ये प्रत्येक मतदारसंघात कोण जिंकणार? याबाबतचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

Exit Poll : महाराष्ट्रात 48 जागांवर कोण-कोण जिंकणार? पाहा एक्झिट पोलचं नेमकं भाकीत काय?
लोकसभा निवडणूक 2024
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 02, 2024 | 2:54 PM
Share

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे. टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात महायुतीला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वाधिक 25 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला 22 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत ठाकरे गटाला तब्बल 14 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटात सध्या 5 विद्यमान खासदार आहेत. पण महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणाला सर्वासामान्य जनतेने करारा जबाब दिल्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे गटाला 14 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत अजित पवार गट भुईसपाट होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या पक्षाला एकाही जागेवर यश मिळणार नाही, असा अंदाज आहे. तर शरद पवार यांच्या गटाला तब्बल 6 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. त्या पाठोपाठ काँग्रेसला 5 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाला 4 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला शिंदे गटाकडे 13 खासदार आहेत. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात प्रत्येक विद्यमान मतदारसंघात कोणता उमेदवार जिंकून येऊ शकतो, याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

48 मतदारसंघांमध्ये विजयाची शक्यता असलेले संभाव्य उमेदवार

  • 1) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध यामिनी जाधव – शिंदे गट
  • 2) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे – शिंदे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध अनिल देसाई – ठाकरे गट
  • 3) उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तिकर – ठाकरे (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध रविंद्र वायकर – शिंदे गट
  • 4) बुलढाणा – नरेंद्र खेडेकर – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध प्रतापराव जाधव – शिंदे गट
  • 5) ठाणे – राजन विचारे – ठाकरे (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध नरेश म्हस्के – शिंदे गट
  • 6) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध वैशाली दरेकर – ठाकरे गट
  • 7) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध हेमंत गोडसे – शिंदे गट
  • 8) औरंगाबाद – चंद्रकांत खैरे – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध संदीपान भुमरे – शिंदे गट
  • 9) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध बाबूराव कदम – शिंदे गट
  • 10) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता ) विरुद्ध राजश्री पाटील – शिंदे गट
  • 11) हातकणंगले – सत्यजीत पाटील – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता ) विरुद्ध धैर्यशील माने – शिंदे गट
  • 12) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील – ठाकरे गट
  • 13) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध सदााशिव लोखंडे – शिंदे गट
  • 14) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट (जिंकण्याची शक्यता), सुनेत्रा पवार – राष्ट्रवादी
  • 15) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट (जिंकण्याची शक्यता), शिवाजी आढळराव – राष्ट्रवादी
  • 16) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध भूषण पाटील – काँग्रेस
  • 17) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध उज्वल निकम – भाजप
  • 18) नंदुरबार – डॉ. हिना गावित – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध गोपाल पाडवी – काँग्रेस
  • 19) धुळे – सुभाष भामरे – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव – काँग्रेस
  • 20) जालना – रावसाहेब दानवे – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध डॉ. कल्याण काळे – काँग्रेस
  • 21) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध सुधाकर श्रृंगारे – भाजप
  • 22) नांदेड – प्रताप चिखलीकर – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध वसंतराव चव्हाण – काँग्रेस
  • 23) अकोला – अनुप धोत्रे – भाजप विरुद्ध अभय पाटील – काँग्रेस (अंदाज येणे अजून बाकी)
  • 24) अमरावती – नवनीत राणा – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध बळवंत वानखेडे – काँग्रेस
  • 25) नागपूर – नितीन गडकरी – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध विकास ठाकरे – काँग्रेस
  • 26) भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे – भाजप विरुद्ध डॉ. प्रशांत पडोळे – काँग्रेस (अंदाज येणे अजून बाकी)
  • 27) गडचिरोली – अशोक नेते – भाजप विरुद्ध डॉ. नामदेव किरसान – काँग्रेस (अंदाज येणे अजून बाकी)
  • 28) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध सुधीर मुनगंटीवार – भाजप
  • 29) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध रविंद्र धंगेकर – काँग्रेस
  • 30) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध राम सातपुते – भाजप
  • 31) भिवंडी – कपिल पाटील – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध सुरेश म्हात्रे – शरद पवार गट
  • 32) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध डॉ. भारती पवार – भाजप
  • 33) रावेर – रक्षा खडसे – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध श्रीराम पाटील – शरद पवार गट
  • 34) बीड – पंकजा मुंडे – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध बजरंग सोनवणे – शरद पवार गट
  • 35) वर्धा – रामदास तडस – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध अमर काळे – पवार
  • 36) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर – भाजप
  • 37) सातारा – शशिकांत शिंदे – शरद पवार गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध उदयनराजे भोसले – भाजप
  • 38) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट (जिंकण्याची शक्यता), सुजय विखे पाटील – भाजप
  • 39) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध मिहीर कोटेचा – भाजप
  • 40) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध भारती कामडी – ठाकरे
  • 41) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध विनायक राऊत – ठाकरे गट
  • 42) जळगाव – स्मिता वाघ – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध करण पवार – ठाकरे गट
  • 43) सांगली – संजयकाका पाटील – भाजप विरुद्ध चंद्रहार पाटील – ठाकरे विरुद्ध अपक्ष विशाल पाटील (जिंकण्याची शक्यता)
  • 44) रायगड – अनंत गीते – ठाकरे (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध सुनील तटकरे – राष्ट्रवादी
  • 45) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध अर्चना पाटील – राष्ट्रवादी
  • 46) परभणी – संजय जाधव – ठाकरे (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध महादेव जानकर – राष्ट्रवादी
  • 47) रामटेक – राजू पारवे – शिवसेना (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
  • 48) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध संजय मंडलिक – शिवेसना

Follow Us
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा