Maharashtra Election Nagarsevak Winners List 2026 LIVE: राज्यात 29 महापालिकांचा निकाल समोर, कोण कुठं जिंकलं, वाचा A टू Z यादी!
Maharashtra Mahanagar Palika Nagarsevak Winners List 2026 LIVE Updates: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कोणते उमदेवार जिंकले जाणून घ्या एका क्लिकवर

LIVE NEWS & UPDATES
-
Kurla Election Nagarsevak Winners 2026 : कुर्ला शिवसृष्टीमधील विजयी उमेदवार कोण?
कुर्ला शिवसृष्टीमधील प्रभाग क्रमांग क्रमांक 163मधून शिवसेनेच्या शैला दिलीप लांडे विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक 165 मधून काँग्रेसच्या अश्रफ आजमी विजयी, प्रभाग क्रमांकतून 166 शिवसेनेच्या मीनल तुर्डे, प्रभाग क्रमांक 167 मधून काँग्रेसचे डॉ. समन आजमी, प्रभाग क्रमांक 168 मधून राष्ट्रवादीच्या साईदा खान, प्रभाग क्रमांक 169तून ठाकरे गटाच्या प्रविणा मोराजकर विजयी झाल्या आहेत.
-
Mumbai Election Nagarsevak Winners 2026 : आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेची सत्ता
वरळी वॉर्ड क्रमांक 197 हा उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. पण आता येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. प्रभाग 197मध्ये वनिता दत्ता नरवणकर या विजयी झाल्या आहेत. वरळीत शिंदेंचा हा पहिलाच नगरसेवक विजयी झाला आहे.
-
-
Pune Election Nagarsevak Winners 2026 : तुरुंगातुन निवडणूक लढवली आणि विजयी ठरली
पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आंदेकर यांनी तुरुंगातून निवडणूक लढवली होती. त्यांनी रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव केला आहे. सोनाली आंदेकर या वनराज आंदेकर यांच्या पत्नी असून प्रभाग 23 मधून विजयी झाल्या आहेत.
-
Kolhapur Election Nagarsevak Winners 2026 : कोल्हापूरात काँग्रेसची हवा, कोणते उमेदवार आले निवडून?
कोल्हापूरात काँग्रेसची हवा पाहायला मिळत आहे. प्रभाग १ मध्ये तीन काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एक उमेदवार हा शिवसेनेचा आहे. सुभाष बुचडे, रुपाली पवार आणि सचिन हरिष चौगुले हे काँग्रेसचे विजयी उमेदवार आहेत. तर गीता जाधव या शिवसेनेच्या विजेती उमेदवार आहेत.
-
कल्याण-डोंबिवली महापालिकेत कोणाची सत्ता?
राज्यातील अनेक महापालिकांचे निकाल हाती आले असून राज्यात भाजपने अनेक महापालिकांवर विजय मिळवला आहे. अशातच आता कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाने बाजी मारली आहे. त्यांचे आतापर्यंत 45 उमेदवार विजयी झाले आहेत.
-
-
Pimpri Chinchwad Election Nagarsevak Winners 2026 : पिंपरी चिंचवडमध्ये अजित दादांना मोठा धक्का
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचा निकाला जवळपास समोर आला आहे. प्रभाग क्रमांक 18मध्ये भाजपने बाजी मारल्याचे दिसत आहे. या प्रभागात भाजपचे तीन उमेदवार आले आहेत. तर राष्ट्रवादीचा एक उमेदवार आला आहे. अपर्णा डोके, मनिषा चिंचवडे आणि सुरेश भोईर हे भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे अनंत कोऱ्हाळे जिंकले आहेत.
-
Pimpri Chinchwad Election Nagarsevak Winners 2026 : पिंपरी चिंचवडमध्ये कोणते उमेदवार जिंकले? वाचा यादी
पिंपरी चिंचवड प्रभाग 5मध्ये तीन जागा भाजपच्या आल्या आहेत. भीमाबाई फुगे (राष्ट्रवादी) सागर गवळी (भाजप), कविता भोंगळे (भाजप) आणि जालिंदर शिंदे (भाजप) विजयी झाले आहेत.तर प्रभाग 7मध्ये पुन्हा तीन भाजपच्या तर एक जागा ही राष्ट्रवादीची आली आहे. विराज लांडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि सोनाली गव्हाणे, राणी पठारे आणि नितीन लांडगे हे भाजपचे उमेदवार आहेत. -
-
Pimpri Chinchwad Election Nagarsevak Winners 2026 : पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा विजय! प्रभाग 22मध्ये तीन उमेदवार विजयी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत देखील भाजपची हवा पाहायला मिळाली आहे. प्रभाग 22 मध्ये भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. नीता पाडळे, कोमल काळे आणि विनोद नढे हे भाजपचे उमेदवार विजयी झाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष कोकणे देखील निवडून आले.
-
Mumbai Election Nagarsevak Winners 2026 : मुंबई प्रभाग 1मध्ये शिंदेंची शिवसेना
मुंबई महानगरापालिका प्रभाग 1मधून फोरम परमार, शीतल म्हात्रे आणि रेखा यादव हे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामधील शिंदेच्या शिवसेनेच्या रेखा यादव विजयी झाल्या आहेत.
-
Mumbai Election Nagarsevak Winners 2026 : मंगेश कुडाळकर यांच्या लेकाचा पराभव
मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 169मध्ये मंगेश कुडाळकर यांचा मुलगा जय कुडाळकर निवडणूक लढत होता. ठाकरे गटाच्या प्रविणा मोराजकर यांच्याकडून जय कुडाळकरचा पराभव झाला आहे. शिंदेच्या शिवसेने जय मंगेश कुडाळकर यांना 7051 मत मिळाले. तर उद्धव ठाकरे गटाच्या प्रविणा मोराजकर यांना 8021 मते मिळाली आहेत.
-
राज्यात आतापर्यंत कोणत्या पक्षाचे किती उमेदवार विजयी? सर्वात मोठा पक्ष कोणता?
राज्यातील 29 महानगरपालिकांचे निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. आतापर्यंत कोणत्या पक्षाने सर्वात जास्त उमेदवार निवडणून आले याबाबत सविस्तर माहिती पाहूयात. भाजप-1241 शिवसेना- 322 काँग्रेस-252 शिवसेना UBT- 145 राष्ट्रवादी Ap- 123 एमआयएम- 75 NCP(SP)- 25 वंचित- 14 मनसे- 13 इतर- 191
-
BMC Election Nagarsevak Winners 2026 : भाजपच्या निशा परुळेकर यांचा दणदणीत विजयी
मुंबई प्रभाग 25मध्ये भाजपच्या निशा परुळेकर विजयी झाल्या आहेत. सध्या भाजप आणि शिवसेना 125 ठिकाणी आघाडीवर आहे.
-
TMC Election Nagarsevak Winners 2026 : एकनाथ शिंदे राहात असलेल्या वॉर्डमध्ये ठाकरेंची हवा
एकनाथ शिंदे राहात असलेल्या वॉर्डमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा पराभव झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव झाला आहे. उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार शहाजी खुपसे 667 मतांनी विजयी झाले आहेत.
-
TMC Election Nagarsevak Winners 2026 : ठाण्यात भाजपची हवा! एका प्रभागातील चारही उमेदवार विजयी
ठाण्यात भाजपमधील एक अख्खे पॅनेल आले आहे. प्रभाग 21 मधील सर्व उमेदवार निवडून आले आहेत. त्यामध्ये संजय वाघुले, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी यांचा समावेश आहे. चारही उमेदवार हे भाजपचे आहेत.
-
Nashik Election Nagarsevak Winners 2026 : ठाकरे सेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश गीते विजयी
नाशिक महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे सेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश गीते यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे मिलिंद भालेराव यांचा पराभव केला आहे. प्रथमेश गीते 12559 मतांनी विजयी झाले आहेत.
-
Mira Bhayandar Election Nagarsevak Winners 2026 : मिरा भाईंदरमध्ये शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांचा दणकून पराभव
मिरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 16 मध्ये वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. या प्रभागामध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजू भोईर यांचा पराभव झाला असून भाजपाचे नवीन सिंग विजयी झाले आहेत.
-
BMC Election Nagarsevak Winners 2026: मुंबई वॉर्ड 175मधून मानसी सामतकर विजयी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा स्पष्ट निकाल समोर येत आहे. मुंबईतील प्रभाग 175 मधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मानसी सामतकर विजयी झाल्या आहेत. मुंबईतील वॉर्ड 175मधून एकूण 12 उमेदवार मैदानात होते. पण मानसी या विजयी ठरल्या आहेत.
Maharashtra Election Nagarsevak Winners List 2026 LIVE: राज्यातील 29 महापालिका निवडणूकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान करण्यात आले. मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले. तर, आज 16 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे या निकालाकडे लक्ष लागले आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप आघाडीवर आहे. तर भाजप आणि शिंदेची सेना एकूण 129 जागांवर आघाडीवर आहेत. राज्यात एक हाती भाजपची सत्ता येणार असल्याचे एकूणच चित्र दिसत आहे. आता राज्यातील इतर महापालिकांमध्ये कोणते उमेदवार विजयी झाले जाणून घ्या अपडेट एका क्लिकवर…
Published On - Jan 16,2026 3:37 PM
