UP Election 2022 Phase 1 Voting LIVE updates : उत्तर प्रदेश निवडणुकीची प्रत्येक क्षणाची अपडेट, पहिल्या टप्प्यात काय घडतंय?

| Updated on: Feb 14, 2022 | 6:04 AM

UP Vidhan Sabha Election 2022 Phase 1 Voting and Poll Percentage updates: पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील 9 जिल्ह्यातील 58 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 623 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. या निवडणुकीत मुख्य लढाई ही भाजप विरुद्ध समाजवादी पार्टी अशीच असणार आहे.

UP Election 2022 Phase 1 Voting LIVE updates : उत्तर प्रदेश निवडणुकीची प्रत्येक क्षणाची अपडेट, पहिल्या टप्प्यात काय घडतंय?
Assembly Election 2022 Live Updates in Marathi

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Elections) एकूण 7 टप्प्यात होणार आहे. या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज  म्हणजेच 10 फेब्रुवारीला होणार आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील (West Uttar Pradesh) 9 जिल्ह्यातील 58 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 623 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. या निवडणुकीत मुख्य लढाई ही भाजप (BJP) विरुद्ध समाजवादी पार्टी (Samajwadi Party)अशीच असणार आहे. तर बसपा आणि काँग्रेससह अन्य राजकीय पक्षही काही जागांवर मजबूत स्थितीत दिसून येत असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अनेक जागांवर त्रिशंकू लढत होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.  मतदानाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलंय.

उत्तर प्रदेशमधील पहिल्या टप्प्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा टीव्ही 9 मराठी 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Feb 2022 06:54 PM (IST)

    मणिपूरच्या विधानसभा निवडणुकीत बदल

    मतदानाच्या तारखा निवडणूक आयोगाने बदलल्या

    पहिल्या टप्प्यातील मतदान 27 ऐवजी 28 फेब्रुवारीला

    दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 ऐवजी 5 मार्चला

    स्थानिक पातळीवरच्या कारणांमुळे बदल

  • 10 Feb 2022 06:51 PM (IST)

    जेपी नड्डा यांचा दावा- ‘अँटी टेररिस्ट कमांडो सेंटर’ उघडणार

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी हरदोई येथे सांगितले की, दहशतवाद्यांना या पृथ्वीवर कोणताही आश्रय मिळू नये, त्यामुळे आम्ही देवबंद, मेरठ, आझमगढ, रामपूर, बहराइच, कानपूर येथे ‘अँटी टेररिस्ट कमांडो सेंटर’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही उत्तर प्रदेशला भयमुक्त करण्याचा संकल्प घेतला आहे.

  • 10 Feb 2022 06:21 PM (IST)

    सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व 58 जागांवर 57.79 टक्के मतदान

    यूपीतील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होत आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व 58 जागांवर 7.79 टक्के मतदान झाले आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बागपतमध्ये 61.30 टक्के आणि मथुरेत 58.12 टक्के मतदान झाले आहे.

  • 10 Feb 2022 05:01 PM (IST)

    आग्रामध्ये बोगस मतदानावरून सपा आणि भाजप आमनेसामने

    आग्रा येथे बोगस मतदानावरून सपा आणि भाजप आमनेसामने आले. मिळालेल्या माहितीनुसार, सपा कार्यकर्त्यांनी बोगस मतदाराला रोखले असता भाजप उमेदवाराच्या समर्थकांनी गुंडगिरी दाखवली. हे युवक बनावट आधारकार्ड घेऊन मतदान करणार होते. प्रकरण बाह शहरातील माजी माध्यमिक विद्यालय ज्युनियर हायस्कूलचे आहे.

  • 10 Feb 2022 03:59 PM (IST)

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक

    काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत

    काँग्रेसचा जाहीरनामा एका मोटर मेकॅनिकला समजावून सांगितला

    प्रियांका गांधी यांनी थेट गॅरेजमध्ये जाऊन मोटर मेकॅनिकला जाहीरनामा समजावून सांगितला

    सोशल मीडियावर प्रियंका गांधी यांच्या व्हिडिओची जोरदार चर्चा

  • 10 Feb 2022 02:59 PM (IST)

    छारामध्ये ईव्हीएममध्ये बिघाड

    समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाला सांगितले आहे की, अलीगढ जिल्ह्यातील छारा विधानसभा-74, बूथ क्रमांक-443 येथे ईव्हीएम मशीन 1 तास बंद आहे. जिल्हा प्रशासन व निवडणूक आयोगाने दखल घेऊन मतदान सुरळीत पार पडेल याची दक्षता घ्यावी.

  • 10 Feb 2022 02:06 PM (IST)

    Uttar Pradesh Election Poll Percentage : दुपारी 1 वाजेपर्यंत 35 टक्के मतदान

    उत्तर प्रदेशातील 11 जिल्ह्यामधील 58 विधानसभामतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 35 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे.

  • 10 Feb 2022 01:34 PM (IST)

    Meerut Election Updates : किठौर विधानसभा मतदारसंघात सपा-भाजप कार्यकर्ते भिडले

    मेरठच्या किठौर विधानसभा मतदारसंघाती भडौली गावात सपा आणि भाजपा कार्यकर्ते बोगस मतदानावरुन भिडले असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी जमावाला पांगवलं आहे. दोन्ही गटात यापूर्वी देखील बाचाबाची झाली होती.

  • 10 Feb 2022 01:21 PM (IST)

    Meerut Poll Percentage : मेरठमध्ये 1 वाजेपर्यंत 34 टक्के मतदान

    मेरठमध्ये 1 वाजेपर्यंत 34 टक्के मतदान झालं

    हस्तिनापूरमध्ये 35 टक्के मतदान

    मेरठ दक्षिणमध्ये 37 टक्के मतदानाची नोंद झाली

  • 10 Feb 2022 12:43 PM (IST)

    पुण्यातही काँग्रेस भाजप कार्यकर्ते आमने सामने

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याविरोधात पुण्यातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजप कार्यकर्ते देखील यावेळी आक्रमक झालेले पाहयला मिळालं आहे.

  • 10 Feb 2022 12:40 PM (IST)

    Uttar Pradesh Voting Percentage Updates : उत्तर प्रदेशमध्ये 11 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यात 20 टक्के मतदान

    Uttar Pradesh Voting Percentage Updates: उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 20 टक्के मतदान

  • 10 Feb 2022 12:36 PM (IST)

    Shamli Election Percentage : शामलीमध्ये 23 टक्के मतदान

    शामलीमध्ये 23 टक्के मतदान झालं असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे.

  • 10 Feb 2022 12:06 PM (IST)

    Aligarh Election Updates: अलिगढमध्ये सकाळी 11 पर्यंत 18 टक्के मतदान

    Aligarh Election Updates: अलिगढमध्ये सकाळी 11 पर्यंत 18 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • 10 Feb 2022 12:05 PM (IST)

    Hapur Election Updates: हापूडमध्ये 23 टक्के मतदान

    सकाळी 11 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार हापूडमध्ये 23 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.

  • 10 Feb 2022 11:43 AM (IST)

    Meerut Election Updates: मेरठमध्ये 17 टक्के मतदान

    Meerut Election Updates: मेरठमध्ये 17 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. मेरठमधील 7 विधानासभा मतदारसंघातील 11 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 17 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.

  • 10 Feb 2022 11:18 AM (IST)

    Bulandshahr Election Updates: बुलंदशहरमध्ये मतदारांमध्ये उत्साह

    बुलंदशहरमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसून आला आहे. मतदार मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडत आहेत.

  • 10 Feb 2022 11:06 AM (IST)

    नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस विरोधात घोषणाबाजी

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरा समोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरा समोर आंदोलन करण्याचा काँग्रेस ने इशारा दिला

    त्यामुळे नागपुरातील गडकरी यांच्या घरा समोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

    गडकरी यांच्या घरा बाहेर बॅरिकेट लावण्यात आले

    पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित

    12 वाजता ची काँग्रेस च्या आंदोलनाची वेळ

    भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस विरोधात घोषणाबाजी

  • 10 Feb 2022 10:49 AM (IST)

    नव्या यूपीचा नारा, विकासचं बनेल विचारधारा : अखिलेश यादव

    नव्या यूपीचा नारा, विकासचं बनेल विचारधारा : अखिलेश यादव

  • 10 Feb 2022 10:25 AM (IST)

    उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 9 वाजेपर्यंत 8 टक्के मतदान

    उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 9 वाजेपर्यंत 8 टक्के मतदान

  • 10 Feb 2022 10:17 AM (IST)

    लता मंगेशकर यांच्या अस्थींचं नाशिकमध्ये विसर्जन

    लता मंगेशकर यांच्या अस्थींचं नाशिकमध्ये विसर्जन

    मंगेशकर कुटुंबीय नाशिकमध्ये दाखल

    थोड्याच वेळात अस्थी विसर्जन होणार

  • 10 Feb 2022 10:04 AM (IST)

    Agra Election Updates : भाजप खासदार राजकुमार चाहर यांच्याकडून मतदान

    आग्रा येथील खेरागढमध्ये भाजपा खासदार राजकुमार चाहर यांनी मतदान केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी हे लोकशाही व्यवस्थेतील मोठं पर्व असल्याचं म्हटलं. लोकांनी घराबाहेर पडावं आणि मतदान करावं, असं ते म्हणाले.

  • 10 Feb 2022 09:34 AM (IST)

    Agra Election Updates: आग्रा येथे 6 टक्के मतदान

    आग्रा इथं सकाळी 9 वाजेपर्यंत 6 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आलीय.

  • 10 Feb 2022 09:30 AM (IST)

    Ghaziabad Election Updates: गाझियाबादमध्ये 8 टक्के मतदान

    गाझियाबादमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 8 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आलीय

  • 10 Feb 2022 09:23 AM (IST)

    Hapur Election Updates : हापूडमध्ये 9 वाजेपर्यंत 9 टक्के मतदान

    Hapur Election Updates : हापूडमध्ये 9 वाजेपर्यंत 9 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • 10 Feb 2022 09:04 AM (IST)

    Kairana Voting Update : शामली जिल्ह्यातील कैरानामध्ये मतदारांना घरी पाठवलं जातंय, सपाचा आरोप

    Kairana Voting Update : शामली जिल्ह्यातील कैराना -8 विधानसभा मतदारसंघातील डुंडुखेडा येथील 347 ते 350 मध्ये मतदारांना धमकावलं जातंय. मतदानाच्या रांगामधून घरी पाठवलं जात असल्याचा आरोप समाजवादी पार्टीनं केला आहे.निवडणूक आयोगानं याची दखल घ्यावी, अशी मागणी समाजवादी पार्टीनं केलीय.

  • 10 Feb 2022 08:46 AM (IST)

    Ghaziabad Voting Update : गाझियाबादमध्ये मतदानाला सुरुवात

    Ghaziabad Voting Update : गाझियाबाद विधानसभा मतदारसंघातील मतदानाला सुरुवात झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील फोटो जारी केले आहेत.

  • 10 Feb 2022 08:45 AM (IST)

    Uttar Pradesh Election First Phase Voting : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 58 जागांसाठी मतदान सुरु

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक

    सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात

    अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी मोठ्या रांगा

    संवेदनशील ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात

    उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु

    58 जागांसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान

  • 10 Feb 2022 08:35 AM (IST)

    देशाला प्रत्येक भयातून मुक्त करा, बाहेर या मतदान करा : राहुल गांधी

    राहुल गांधी यांचं मतदारांना आवाहन

Published On - Feb 10,2022 8:34 AM

Follow us
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.