UP Election|भाजपला यूपीत धक्क्यावर धक्के, अपहरणाची चर्चा; पण आमदार म्हणाले, सपात जाणार!

लखनऊः उत्तर प्रदेशात मंत्री स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी पदासह पक्षाचा राजीनामा दिल्याने भाजपला जोरदार झटका बसला आहे. त्यानंतर भाजप आमदार विनय शाक्य (Vinay Shakya) यांचे अपहरण झाल्याचा दावा त्यांच्या मुलीने केल्याने खळबळ उडाली. मात्र, आता त्याच शाक्य यांनी पुढे येत आपले अपहरण झाले नसून, आपण स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबत समाजवादी पक्षात जाणार […]

UP Election|भाजपला यूपीत धक्क्यावर धक्के, अपहरणाची चर्चा; पण आमदार म्हणाले, सपात जाणार!
Vinay Shakya, BJP MLA
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 10:57 AM

लखनऊः उत्तर प्रदेशात मंत्री स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी पदासह पक्षाचा राजीनामा दिल्याने भाजपला जोरदार झटका बसला आहे. त्यानंतर भाजप आमदार विनय शाक्य (Vinay Shakya) यांचे अपहरण झाल्याचा दावा त्यांच्या मुलीने केल्याने खळबळ उडाली. मात्र, आता त्याच शाक्य यांनी पुढे येत आपले अपहरण झाले नसून, आपण स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबत समाजवादी पक्षात जाणार असल्याचे म्हणले आहे. त्यांची प्रकृती ठीक नाही. त्यांना अर्धांगवायूचा झटका आलाय. त्यामुळे ते स्पष्ट बोलू शकत नाहीत. मात्र, ते आपल्या अस्पष्ट आवाजतही, आपण सपात जाणार असल्याचे म्हणत आहेत, असा दावा ‘आज तक’ने आपल्या रिपोर्टमध्ये केलाय. शिवाय विनय शाक्य यांची आई, भावाने त्यांच्या अपहरणाची बातमी फेटाळून लावलीय. त्यांनी आपली मुलगी रियाने केलेला व्हिडिओ एक कट असल्याचे म्हटले आहे. आता झालेय असे की, मौर्य हे खरेच समाजवादी पक्षात जाणार का, याबद्दलही अटकळी व्यक्त केल्या जात आहेत. मात्र, मंगळवारी त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेत राजकीय धुरळा उडवून दिल्याचे देशाने पाहिले. ही उत्तर प्रदेशातल्या राजकीय नाट्याची सुरुवातय. खरा अंक येणाऱ्या काळात रंगणाराय. चला, तर मग…या रंजक राजकीय बातमीमागची बित्तमबातमी जाणून घेऊयात…

नेमके प्रकरण काय?

उत्त्तर प्रदेशात मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर औरैया जिल्ह्यातील बिधूना जागेवरील भाजप आमदार विनय शाक्य यांचे अपहरण झाले आहे, असा दावा त्यांची मुलगी रियाने केला होता. विशेष म्हणजे आपल्या वडिलांचे अपहरण आपल्या भावाने केल्याचे त्यांचे म्हणणे होते. सोबतच आपले चुलते देवेश शाक्य यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले होते. त्यांचा हा व्हिडिओ चर्चेत राहिला. त्यात त्या म्हणतात, माझे वडील अर्धांगवायूने ग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना चालणे-फिरणे अशक्य आहे. त्यांच्या या असहाय्यतेचा फायदा माझे चुलते देवेश शाक्य खूप दिवसांपासून उठवत आहेत. त्यावर ती स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आहे. त्यांनी आज आपल्या सीमा ओलांडल्या असून, माझ्या वडिलांना घरातून जबरदस्तीने समाजवादी पक्षात प्रवेश घ्यावा म्हणून जबरदस्तीने लखनऊला नेल्याचा दावा केला आहे.

माझ्याही अपहरणाचा प्रयत्न

शाक्य यांच्या मुलीने पुढे आपल्या व्हिडिओत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तोंडभरून कौतुक केले होते. त्या म्हणतात, मी विनय शाक्य यांची मुलगी म्हणून सांगते की, आम्ही भाजपवाले आहोत. पक्षासोबत मजबूत उभे राहू. आम्हाला कठीण काळात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदत केली. त्यांनी माझ्या वडिलांचे उपचार केले. आज आमचेच काही लोक राज स्वतःचे राजकारण चमकावून घेतायत. ते आता गुंडागर्दीवर उतरलेत. हे लोक माझ्याही अपहरणाचा प्रयत्न करतायत. मी प्रशासन आणि पक्षाच्या नेतृत्वाला सांगू इच्छिते की, मी माझ्या वडिलांची उत्तराधिकारी आहे आणि आम्ही सारे लोक भाजपवाले आहोत.

पोलिसांना दावा फेटाळला

आमदार विनय शाक्य यांच्या अपहरणाचा दावा पोलिसांनी फेटाळलाय. औरैयाचे पोलीस अक्षीक्षक याप्रकरणी म्हणतात की, बिधूनाचे आमदार विनय शाक्य हे सुरक्षित आहेत. ते आपल्या आईजवळ आहेत. अपहरणाचा आरोप खोटा आहे. हे प्रकरण कौटुंबिक आहे. यावर आमदार शाक्य यांनी स्वतःही प्रतिक्रिया दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

इतर बातम्याः

Devyani Farande| 2 टर्म आमदारकी, महापालिकेतही छाप; परखड नेतृत्व देवयानी फरांदेंच्या वाटचालीवर वाढदिवसानिमित्त नजर …

Nashik Corona|नाशिकमध्ये आदिवासी महिलांचे लसीकरण कौतुकास्पद, राज्यभर अंमलबजावणी व्हावी, उपसभापतींची थाप…!

Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.