ममता बॅनर्जींच्या पक्षात सहकाऱ्यांचे बंड का?; जुन्या मित्रानेच सांगितली इनसाईड स्टोरी

पश्चिम बंगालच्या निवडणुकांचं वाजलेलं बिगूल आणि भाजपने पश्चिम बंगालच्या राजकारणात घेतलेली दमदार एन्ट्री यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. (What's the reason behind mass exodus from TMC in west bengal)

ममता बॅनर्जींच्या पक्षात सहकाऱ्यांचे बंड का?; जुन्या मित्रानेच सांगितली इनसाईड स्टोरी
cm Mamta Banarjee

कोलकाता: पश्चिम बंगालच्या निवडणुकांचं वाजलेलं बिगूल आणि भाजपने पश्चिम बंगालच्या राजकारणात घेतलेली दमदार एन्ट्री यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. त्यातच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये बंडाळी माजली आहे. अनेक जुन्या सहकाऱ्यांनी ममता दीदींची साथ सोडून थेट भाजपमध्ये जाणं पसंत केलं आहे. ममता दीदींना सहकारी सोडून का जात आहेत. याची इनसाईड स्टोरी स्वत: टीएमसीची साथ सोडणारे आमदार शीलभद्र दत्ता यांनीच सांगितली आहे. (What’s the reason behind mass exodus from TMC in west bengal)

राजकीय चाणक्य समजले जाणारे प्रशांत किशोर आणि ममता दीदीचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्यासह दीदी घेत असलेले निर्णय पक्षांतर्गत बंडास कारणीभूत असल्याचा दावा शीलभद्र दत्ता यांनी केला आहे. त्याशिवाय त्यांनी आणखी धक्कादायक माहिती दिली आहे.

टीएमसीच्या फुटीला अशी झाली सुरुवात

तृणमूल काँग्रेस युवाचे पूर्वी सुवेंदू अधिकारी अध्यक्ष असायचे. पण त्यांना शह देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी युवा नावाची आणखी एक संघटना स्थापन केली. त्याचे अध्यक्षपद आपला पुतण्या अभिषेककडे दिली. त्यामुळे अभिषेक आणि सुवेंदू यांच्यात वाद होऊ लागले. ममता बॅर्जी यांनीच हे वाद सुरू केले होते. ममता दीदीच्या या धोरणामुळेच पक्षांतर्गत कुरबुरी सुरू झाल्या आणि पक्षात बंडाळी निर्माण झाली.

डावलण्यास सुरुवात

सुवेंदू अधिकारी संघटना मजबूत करण्याचं काम करत होते. कोलकात्यामध्ये पक्ष मजबूत व्हावा यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता. मात्र, ममता बॅनर्जी त्यांना कोलकात्यात एकही कार्यक्रम घेऊ देत नव्हत्या. कोलकात्यामध्ये केवळ अभिषेक यांचे कार्यक्रम होतील, याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यामुळे सुवेंदू नाराज होते. सुवेंदू यांना पश्चिम बंगालमधील तरुणांचं मोठं पाठबळ आहे. तर, दुसरीकडे बंगालमध्ये अभिषेक बॅनर्जी यांना मुख्यमंत्री करण्याची तयार सुरू होती. मात्र, राज्यातील तरुण सुवेंदू यांचाच शब्द प्रमाण मानत असल्याची ममता दीदींसमोर अडचण होती. अभिषेक यांना तर लोक नेताही मानत नव्हते. त्यामुळेच सुवेंदू यांना डावलण्यास सुरुवात झाली होती, असं शीलभद्र यांचं म्हणणं आहे.

म्हणून नेत्यांनी पक्ष सोडला

नॉर्थ बंगालमध्ये पक्षाची अत्यंत वाईट स्थिती होती. त्यावेळी सुवेंदू यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर पुन्हा सुवेंदू यांना हटवण्यात आलं. ही जबाबदारी अरुप विश्वास यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर या भागात टीएमसी सर्व निवडणुकांवर पराभूत झाली. आता टीएमसी एक्सपोज झाली आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी अभिषेक बॅनर्जी यांना नेता म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. टीएमसीच्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांना ही गोष्ट माहीत पडली. त्यामुळेच भविष्यात आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलं हे लक्षात आल्यामुळेच या नेत्यांनी पक्षातून बाजूला होणच पसंत केलं आहे. अभिषेक यांना राजकारणाविषयी काहीच माहिती नाही. पण टीएमसीच्या या सर्व अवस्थेला ममता बॅनर्जी आणि प्रशांत किशोरच जबाबदार असतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. (What’s the reason behind mass exodus from TMC in west bengal)

 

संबंधित बातम्या:

भाजपचे 57 उमेदवार ठरले, नंदीग्राममध्ये देशातील सर्वात मोठी लढत

मिथुन चक्रवर्तींना मोदींना भेटायचंय, भाजप नेत्याला फोनवरून साकडे; बंगालच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी?

पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप; माजी रेल्वे मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश

(What’s the reason behind mass exodus from TMC in west bengal)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI