AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानला कोणतीही कल्पना न देता चंकी पांडेने केली थेट ‘ही’ मोठी ‘डील’, हैराण करणारा प्रकार

बाॅलिवूड अभिनेता चंकी पांडे हा कायमच चर्चेत असतो. चंकी पांडेची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. चंकी पांडे आज मोठ्या संपत्तीचा मालक आहे. हेच नाही तर चंकी पांडेची लेक अनन्या पांडे ही देखील चित्रपटांमध्ये धमाका करताना कायमच दिसते.

सलमान खानला कोणतीही कल्पना न देता चंकी पांडेने केली थेट 'ही' मोठी 'डील', हैराण करणारा प्रकार
Salman Khan and Chunky Pandey
| Updated on: May 24, 2024 | 4:14 PM
Share

चंकी पांडेने एक मोठा काळ गाजवला आहे. चंकी पांडेने चित्रपटात धमाकेदार भूमिका केल्या आहेत. हेच नाही तर आता चंकी पांडेनंतर त्याची लेक अनन्या पांडे ही देखील बाॅलिवूडमध्ये धमाका करताना दिसत आहे. चंकी पांडे याने नुकताच एक मोठा खुलासा केलाय. विशेष म्हणजे चंकी पांडे याने हा खुलासा चक्क सलमान खान याच्याबद्दल केला आहे. चंकी पांडे याच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. काही दिवसांपूर्वीच मुलीबद्दल मोठा खुलासा चंकी पांडेकडून करण्यात आला. अनन्याने काय करावे आणि काय नाही हे तिचा प्रश्न असल्याचे थेट म्हणताना चंकी पांडे दिसला.

नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये चंकी पांडेने म्हटले की, मी आणि सलमान खान दक्षिण अफ्रिकेला चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेलो होतो. त्यावेळी मी सलमान खान याला म्हटले की, चल मी तुला एक जिन्स घेऊन देतो. मग त्यानंतर आम्ही एका मॉलमध्ये गेलो. जिन्स फ्रीमध्ये मिळत असल्याने सलमान खान माझ्यासोबत येण्यास तयार झाला.

बाकी काहीही सलमान खान याला माहिती नव्हते. ज्या दुकानात मी सलमान खान याला जिन्स घेऊन देण्यासाठी गेलो होतो त्या दुकानदाराकडून मी सलमान खान याला तिथे आणण्यासाठी 50,000 डॉलर घेतले होते. याबद्दल काहीच कल्पना सलमान खानला नव्हती, असे थेट चंकी पांडे याने म्हटले. सलमान खानला अंधारात ठेऊन चंकी पांडेने ही डील केली होती.

स्मार्ट बिजनेसमॅन असल्याचे सांगताना चंकी पांडे हा दिसला. गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा होती की, अनन्या पांडे ही अभिनेता आदित्य रॉय कपूर याला डेट करत आहे. हेच नाही तर यांचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसले. मात्र, दोघांनी कधीच त्यांच्या नात्याबद्दल काहीच भाष्य हे केले नाही.

यावर काही दिवसांपूर्वीच चंकी पांडेला विचारण्यात आले. यावर बोलताना चंकी पांडे म्हणाला की, अनन्या पांडे ही तिचे निर्णय घेऊ शकते. हेच नाही तर अनन्या माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते. यामुळे मी तिला काय बोलणार ना? काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिने मुंबईमध्ये अत्यंत आलिशान असा फ्लॅट खरेदी केला. या फ्लॅटचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करताना अनन्या पांडे ही दिसली.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी