विद्यार्थिनी असतानाच आई झाली, लग्नानंतर काटेरी आयुष्य, पण आज ‘ती’ अभिनेत्री इंडस्ट्रीतील सर्वात मोठी विलन
विद्यार्थिनी असतानाच टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे... पण लग्न आयुष्यात आल्या असंख्य अडचणी... पण सर्व संकटांवर मात करत आज 'ती' अभिनेत्री इंडस्ट्रीतील सर्वात मोठी विलन

बॉलिवूड आणि टीव्ही विश्वातील अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्या झगमगत्या विश्वात यशाच्या शिखरावर तर पोहोचल्या, पण खासगी आयुष्यात मात्र त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. एक अभिनेत्रीतर विद्यार्थिनी असतानाच आई झाली. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री उर्वशी ढोलकिया आहे. उर्वशी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत ‘कोमलिका’ या भूमिकेला न्याय देत अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि टीव्ही विश्वातील सर्वात मोठी विलेन झाली.
उर्वशी हिचं पडद्यावरील आयुष्य फार क्लासी होतं. कायम वेगळ्या साड्या, मेकअप आणि हटके स्टाईलमध्ये दिसणाऱ्या उर्वशीच्या खासगी आयुष्यात संघर्ष फार मोठे होते. एका शोमध्ये अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले. उर्वशी एक मोठा खुलासा करत म्हणाली, वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी मी आई झाली. ज्या वयात मुली शिक्षण घेतात आणि करियरचे स्वप्न पाहात असतात, त्या वयात माझ्या खांद्यावर मातृत्वाची जबाबदारी आलेली. पण ते आव्हान देखील आनंदाने स्वीकारलं…
लहानपणीचा एक मजेदार किस्सा सांगत उर्वशी म्हणाली, ‘जेव्हा मी लहान होती, तेव्हा देशात रंगीत टीव्हीचा ट्रेंड सुरु झालेला. मी टीव्ही येणाऱ्या जाहिराती मोठ्या आनंदाने पाहायची. एकदा मी माझ्या आईला सांगितलं, मला टीव्ही पाहायचा नाही. माझ्या आईला वाटलं मुलगीला शिक्षणात रस आहे…’
‘पण मला तेव्हा टीव्हीच्या बाहेर नाही तर, टीव्हीमध्ये जायचं होतं. अभिनयाची मला लहानपणापासून आवड होती.’ उर्वशीने असं देखील मान्य केलं की, अभिनय करणं तिचं स्वप्न होतं, त्याशिवाय तिने दुसरं कोणतं स्वप्न पाहिलंच नाही…
उर्वशीने असं देखील सांगितलं की, वयाच्या 6 वर्षापासून काम करण्यात सुरुवात केली. कमी वयात लग्न, त्यानंतर मुलांचा जन्म… यामध्ये करियर आणि जबाबदाऱ्या सांभाळणं फार कठीण होतं… उर्वीशी हिच्या नवऱ्याने देखील तिची साथ दिली नाही. मुलांच्या जन्मानंतर नवऱ्याने उर्वशीला हिला एकटीला सोडलं. अशा परिस्थितीत उर्वशी हिने सर्व संकटांवर मात करत स्वतःचं एक वेगळं विश्व तयार केलं.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, संकट काळात उर्वशी हिचे आई – वडील तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. उर्वशी देखील तिच्या यशाचं संपूर्ण श्रेय आई – वडिलांना देते…. अभिनेत्री म्हणजे, ‘आई – वडिलांच्या पाठिंब्यामुळे आणि विश्वासामुळे आज मी स्वतःला सिद्ध करु शकले आहे…’, असं देखील उर्वशी एका मुलाखतीत म्हणलेली.
