मी परत येतेय, अक्कासाहेब आता नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

सौंदर्य म्हणजे फक्त गोरेपणा नव्हे तर आंतरिक सौंदर्यही तितकंच महत्त्वाचं आहे, हा विचार घेऊन 'रंग माझा वेगळा' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून मराठी अभिनेत्री हर्षदा खानविलकर नव्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

मी परत येतेय, अक्कासाहेब आता नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : स्टार प्रवाहवर 30 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या प्रोमोनी सध्या सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे (Rang Majha Vegla). सौंदर्य म्हणजे फक्त गोरेपणा नव्हे तर आंतरिक सौंदर्यही तितकंच महत्त्वाचं आहे, हा विचार घेऊन ‘रंग माझा वेगळा’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून मराठी अभिनेत्री हर्षदा खानविलकर नव्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे (Harshada Khanvilkar New Look).

या मालिकेतील खास गोष्ट म्हणजे ‘पुढचं पाऊल’ या मालिकेद्वारे अक्कासाहेबांच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री हर्षदा खानविलकर ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सौंदर्या इनामदार असं तिच्या या व्यक्तिरेखेचं नाव असून हर्षदाचा निराळा अंदाज या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील त्यांच्या व्यक्तिरेखेविषयी सांगताना हर्षदा म्हणाल्या, ‘या भूमिकेसाठी मी प्रचंड उत्सुक आहे. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेने माझं विश्व बदललं. 3 वर्षांपेक्षा अधिक काळ मी ज्या वाहिनीसोबत काम केलं, त्या स्टार प्रवाह वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करताना माहेरी आल्याची भावना आहे. माझं नव्याने आयुष्य सुरु होत आहे, असं म्हटलं तरी चालेल. सौंदर्या इनामदार नावाप्रमाणेच सौंदर्यावर प्रेम करणारी अत्यंत करारी अशी बिझनेस वुमन आहे. तुम्ही सुंदर असाल, तर जगावर राज्य करु शकता हा विचार मानणारी आणि त्याप्रमाणे वागणारी अशी सौंदर्या. ‘पुढचं पाऊल’च्या अक्कासाहेबांवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं, आता सौंदर्यावरही तितकंच प्रेम कराल हा आत्मविश्वास आहे’.

याआधी ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमधील हर्षदा यांच्या अक्कासाहेब या लूकची बरीच चर्चा होती. तमाम स्त्री वर्गात अक्कासाहेबांच्या साड्या, त्यांचे दागिने आणि खास करुन त्यांचे गजरे प्रसिद्ध होते. ‘रंग माझा वेगळा’ या आगामी मालिकेमधील त्यांचा लूकही हटके असणार आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *