Birthday Special | ‘थलायवी’ बनण्यासाठी कंगनाने वाढवलेलं तब्बल 20 किलो वजन, पाहा तिचा नवा लूक

Birthday Special | ‘थलायवी’ बनण्यासाठी कंगनाने वाढवलेलं तब्बल 20 किलो वजन, पाहा तिचा नवा लूक
कंगना रनौत

प्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकारणी ‘जयललिता’ यांच्या जीवनावर आधारित 'थलायवी' (Thalaivi) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या (kangana Ranaut) कारकीर्दीतील मैलाचा दगड देखील ठरू शकतो.

Harshada Bhirvandekar

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 23, 2021 | 7:40 AM

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकारणी ‘जयललिता’ यांच्या जीवनावर आधारित ‘थलायवी’ (Thalaivi) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या (kangana Ranaut) कारकीर्दीतील मैलाचा दगड देखील ठरू शकतो. तर, या पात्राला स्वतःमध्ये भिनवण्यासाठी कंगनाने केवळ तिच्या अभिनयाकडेच लक्ष दिले नाही, तर सोबतच तिने आपल्या शरीरातही काही महत्त्वाचे बदल केले. यावेळी तिने तब्बल 20 किलोने वजन वाढवले होते (Actress kangana Ranaut Body Transformation for Thalaivi).

कथेच्या आणि पात्राच्या मागणीनुसार कंगनाला वजन वाढवावं लागलं होतं. यावेळी, सर्वात मोठे आव्हान होते की, तिला नव्या चित्रपटासाठी पुन्हा एकदा स्लीमट्रीम व्हायचे होते. अशा परिस्थितीत कंगनाने खूप कठोर मेहनत केली. खुद्द कंगना रनौत हिने आपल्या ट्विटमध्ये याचा खुलासा केला आहे. तिने लिहिले की, ‘जेव्हा ट्रेलर लाँचिंगसाठी केवळ एक दिवस दूर आहे, तेव्हा मी असे म्हणू शकते की काही महिन्यांत, 20 किलो वजन वाढवणे आणि घटवणे कदाचित सर्वात मोठे आव्हान नव्हते. काही तासांत ही आपली प्रतिक्षा संपणार आहे आणि त्यानंतर जया कायमची तुमची असेल.’

कंगना रनौतचे ट्विट

(Actress kangana Ranaut Body Transformation for Thalaivi)

दाक्षिणात्य चित्रपटांची झलकही दिसणार!

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी जयललिता तमिळ चित्रपटांचा एक महत्त्वाचा भाग होत्या. अशा प्रकारे, अभिनेत्री म्हणून त्यांचा चित्रपट प्रवास दाखवसाठी कंगनाला तिचे वजन वाढवावे आणि कमी देखील करावे लागले. अभिनेत्रीने शेअर केलेल्या चित्रांमध्ये याची झलक पाहायला मिळत आहे. यात कंगना ही एका साऊथ चित्रपटाची अभिनेत्री दिसतेय. दुसर्‍यामध्ये ती एक न्यू कमर अभिनेत्रीसारखी दिसते. तिच्या या मेहनतीमुळे, विविध प्रकारच्या भूमिकेमुळे व्यक्तिरेखेला जीवदान मिळते आहे (Actress kangana Ranaut Body Transformation for Thalaivi).

फोटो सोशल मीडियावर चर्चेत!

कंगना रनौतची ही बॉडी ट्रान्सफॉर्ममेशन छायाचित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. ‘थलायवी’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कंगना वेगवेगळ्या अवतारात दिसली आहे. कंगनाने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ती फुलांच्या ड्रेसमध्ये दिसली आहे. दुसर्‍या चित्रात असताना ती दक्षिण भारतीय चित्रपटाची नायिका बनली आहे. शेवटच्या चित्रात तिने जयललिता या राजकारणात प्रवेश केल्यानंतरची त्यांची प्रतिमा दाखवली आहे.

कंगनाला वाढदिवसाची भेट!

दिग्दर्शक विजयच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी आणि ‘थलायवी’ चित्रपटाशी संबंधित प्रत्येक कलाकारासाठी हा चित्रपट त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. आपल्या औदार्य आणि प्रेमाने तामिळनाडूच्या राजकारणाला नवा आयाम देणारी एक अद्भुत अभिनेत्री आणि दिवंगत नेत्या जयललिता यांच्या जीवनातील विलक्षण बाबींची झलक अभिनेत्री कंगना रनौतच्या वाढदिवशी पाहायला मिळणार आहे. कंगनाच्या चाहत्यांसाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी भेट असणार आहे.

(Actress kangana Ranaut Body Transformation for Thalaivi)

हेही वाचा :

67th National Film Awards | सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा पुरस्कार!

National Film Awards | वाढदिवसाआधीच मोठी भेट! कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें