AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katrina Kaif Pregnancy : कतरिना कैफने दिली ‘गुड न्यूज’, विकी कौशलसोबत खास फोटो शेअर; लवकरच येणार चिमुकला पाहुणा

Katrina Kaif-Vicky Kaushal : बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी 'गुड न्यूज' शेअर केली आहे . त्यांच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. 

Katrina Kaif Pregnancy : कतरिना कैफने दिली 'गुड न्यूज', विकी कौशलसोबत खास फोटो शेअर; लवकरच येणार चिमुकला पाहुणा
कतरिना कैफ- विकी कौशल
| Updated on: Sep 23, 2025 | 8:32 PM
Share

बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif ) आणि अभिनेता विकी कौशल  (Vicky Kaushal) यांनी ‘गुड न्यूज’ शेअर केली आहे . त्यांच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.  बेबी बंपसोबत ब्लॅक अँड व्हाईट फोट टाकत कतरिनाने (Katrina Kaif Pregnancy)  तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही बातमी शेअर केली आहे. अवघ्या काही मिनिटांपूर्वी शेअर केलेल्या गुड न्यूजवर काही क्षणांतच लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून कतरिनाच्या प्रेग्नन्सीबद्दल विविध चर्चा सुरू होत्या. मात्र त्यावर कतरिना किंवा विकी कोणीच प्रतिक्रिया दिली नव्हती. काही महिन्यांपूर्वी त्या दोघांचा एअरपोर्टवरील फोटो प्रसिद्ध झाला, ज्यामध्ये व्हाईट लूज ड्रेसमध्ये कतरिना दिसल्यावर प्रेग्नन्सीच्या चर्चांनी जोर धरला. तर गेल्या आठवड्यात आर्यन खानच्या चित्रपटाच्या रिलीजसाठीही विकी कौशल एकटाच आला होता, तेव्हाही कतरिना सोबत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

तर गेल्या आठवड्यातच कतरिनाचा एक फोटो बराच व्हायरल झाला होता. ज्यामध्ये कतरिना प्रेग्नंट असल्याचं दिसत होतं. एका लालसर रंगाच्या गाऊनमध्ये, बेबी बंपसह सुंदर दिसणाऱ्या कतरिनाचा एक धूसऱ फोटो समोर आला होता. एका रेडिट यूजरने तो फोटो शेअर केला होता. मात्र त्यावर कोणतीच अधिकृत कमेंट न आल्याने सर्वांना या अफवा वाटल्या होत्या. पण चाहत्यांना मात्र गुड न्यूजची प्रतीक्षा होतीच.  

गोड फोटो केला शेअर

इतके महिने याविषयी मौन राखणाऱ्या विकी-कतरिनाने अखेर आज सर्वांसोबत ही गोड बातमी शेअर केलीच. त्यांनी, सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवर  एक सुंदर, ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत सर्वांना आयुष्यात येणाऱ्या गोड पाहुण्याबद्दल सांगितलं. यामध्ये एक फोटो प्रिंट असलेली फ्रेम असून त्यात गरोदर कतरिना आणि विकी कौशल बेबी बंपकडे प्रेमाने पहात असल्याचं दिसतंय. On our way to start the best chapter of our lives with hearts full of joy and gratitude. 🙏🏽 अशी सुंदर कॅप्शनही त्यांनी या पोस्टसोबत जोडली आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

या फोटोवर चाहते, तसेच विकी-कतरिनाचे मित्र-मैत्रिणी, वेल-विशर्स सर्वांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे, तसेच दोघांनाही या नव्या प्रवासासाठी भरभरून शुभेच्छाही दिल्या आहेत. आता विकी-कतरिनाचं बाळ या जगात कधी येतं, त्यांना मुलगा होतो का मुलगी याची चाहत्यांना आणि सर्वांनाच उत्सुकता आहे.

विकी- कतरिनाचं लग्नं

एका पार्टीत भेटलेल्या विकी-कतरिनाची हळूहळू ओळख झाली, एकमेकांना आवडू लागल्याचं समजल्यावर त्यांचं नात सुरू झालं, पण मीडियापासून, बाहेरच्या जगापासून त्यांनी हे नातं लपवूनच ठेवलं. अखेर 9 डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी राजस्थानमध्ये कुटुंबिय, मित्र-मैत्रीणींच्या उपस्थितीत थाटामाटात लग्न केलं. त्यांचं एकमेकांवरचं प्रेम दर्शवणारे फोटो, पोस्ट्स अधूनमधून दोघंही शेअर करत असतात.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.