AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगनासोबत पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल अखेर झरीनाने सोडलं मौन

कंगना आणि आदित्य हे जवळपास साडेचार वर्षे एकमेकांना डेट करत होते. करिअरच्या सुरुवातीलाच कंगना आदित्यच्या प्रेमात पडली होती. नंतर कंगनाने आदित्यवर बरेच गंभीर आरोप करत एफआयआर दाखल केली होती.

कंगनासोबत पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल अखेर झरीनाने सोडलं मौन
Kangana Ranaut, Zarina Wahab and Aditya Pancholi Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 29, 2024 | 8:28 AM
Share

अभिनेत्री झरीना वहाब आणि आदित्य पांचोली हे गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून विवाहित आहेत. मात्र त्यांचं वैवाहिक आयुष्य काही सुखकर नव्हतं. झरीना आणि आदित्य हे ‘कलंक का टीका’ या चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले आणि नंतर या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. झरीना आदित्यपेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे आणि त्यामुळे तिच्या आईला हे लग्न मान्य नव्हतं. तरीही 1986 मध्ये झरीना आणि आदित्यने लग्न केलं. त्यानंतर 1993 मध्ये आदित्य त्याच्या विवाहबाह्य संबंधामुळे चर्चेत आला. अभिनेते कबीर बेदी यांची मुलगी पूजा बेदीसोबत त्याचं नाव जोडलं गेलं होतं. त्यांचं नातं सर्वत्र चर्चेत होतं. मात्र जेव्हा पूजाच्या मोलकरीणीने आदित्यवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर तिने त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केली. यानंतर 2004 मध्ये आदित्य आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. या दोघांच्या अफेअरसोबत त्यांचे वादही सर्वांसमोर आले होते. कंगनाने आदित्यवर शारीरिक शोषणाचा आरोप केला होता. तर आदित्यने तिच्यावर आर्थिक शोषण केल्याचा प्रत्यारोप केला होता. आता बऱ्याच वर्षांनंतर आदित्यची पत्नी झरीना कंगनाबद्दल व्यक्त झाली.

आदित्य आणि कंगनाचं नातं सार्वजनिक होत असताना या सर्व गोष्टींसाठी आधीपासून मानसिक तयारी केली होती, असं झरीनाने म्हटलंय. ‘लेहरे रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत झरीना म्हणाली, “मला निर्मलच्या (आदित्यचं खरं नाव) अफेअर्सबद्दल आधीच माहित होतं. पण मी कधीच त्याला प्रश्न विचारला नाही. मला फक्त एकाच गोष्टीची काळजी होती की तो घरी आल्यावर माझ्याशी कसा वागतोय? मी त्याला प्रश्न विचारण्याकडे दुर्लक्ष केलं कारण त्यामुळे तो निर्भय झाला असता. पण त्याच्या अफेअर्सबद्दल मी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तयार होते.”

पूजा बेदी आणि कंगना राणौत यांनी आदित्यवर केलेल्या आरोपांबद्दल काय वाटतं, असा प्रश्न विचारल्यावर झरीना पुढे म्हणाली, “तो कधीच शोषण करणारा पती नव्हता. त्याचा स्वभाव खूपच चांगला आहे. उलट मी त्याच्यावर हात उचलू शकते. पण त्याचा स्वभाव खूपच गोड आहे. त्याच्या गर्लफ्रेंड्सनी त्याच्यावर हे आरोप केले कारण त्यांना जे पाहिजे होतं ते त्याच्याकडून त्यांना मिळालं नव्हतं.”

“मी कंगनासोबत नेहमीच खूप चांगली वागले होते. ती नेहमी आमच्या घरी यायची. तोसुद्धा तिच्याशी खूप चांगला वागायचा. नेमकं कुठे बिनसलं मला माहित नाही. पण मी इतकंच म्हणू शकते की जे मला दिसत होतं, ते तो बघू शकला नव्हता आणि अखेर जे व्हायचं होतं ते झालंच”, अशी प्रतिक्रिया झरीनाने दिली. 2019 मध्ये कंगनाने आदित्यविरोधात एफआयआर दाखल केली होती. तिने त्याच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. या सर्व वादानंतरही झरीनाने तिच्या पतीला ‘उत्कृष्ट पती आणि पिता’ असं म्हटलंय. “आदित्य खूप चांगला पिता आणि चांगली पती आहे. त्याने कधीच मला कोणत्या गोष्टीपासून रोखलं नाही. मग ते चित्रपट असो, ट्रॅव्हलिंग असो.. त्याने कधीच मला थांबवलं नाही”, असं झरीना म्हणाली.

कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.