चिमुकला लढतोय दुर्मिळ आजाराशी, उपचारासाठी 16 कोटींची गरज, अजय देवगणने केले मदतीचे आवाहन!

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) चित्रपटांमध्ये खूप व्यस्त असला तरी, सामाजिक कार्यात खूप चांगल्याप्रकारे सहभाग घेत असतो. याशिवाय बॉलिवूडचा हा सिंघम अभिनेता गरजूंना मदत करण्यातही मागे हटत नाहीत.

चिमुकला लढतोय दुर्मिळ आजाराशी, उपचारासाठी 16 कोटींची गरज, अजय देवगणने केले मदतीचे आवाहन!
अजय देवगण

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) चित्रपटांमध्ये खूप व्यस्त असला तरी, सामाजिक कार्यात खूप चांगल्याप्रकारे सहभाग घेत असतो. याशिवाय बॉलिवूडचा हा सिंघम अभिनेता गरजूंना मदत करण्यातही मागे हटत नाहीत. मागच्या वर्षी कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान अनेकांना त्याचा स्वभाव पाहिला. स्पायनल मस्क्यूलर रेट्रोफी नावाच्या दुर्मिळ आजाराने पीडित मुलाला मदत करण्यासाठी आता अजय देवगण पुढे सरसावला आहे आणि त्या मुलाच्या उपचारासाठी सध्या 16 कोटी रुपयांची गरज आहे. अजय देवगण यांनी ट्विटद्वारे लोकांना मुलाच्या उपचारात मदत करण्याचे आवाहन केले आहे (Ajay Devgn appeals on twitter to save child who suffering from rare diseases).

पाहा अजय देवगणचे ट्विट

अभिनेता अजय देवगण यांने ट्वीट केले की, “हॅशटॅग सेव्ह अयांश गुप्ता (#SaveAyaanshGupta). हा चिमुकला पाठीच्या स्नायूंच्या अ‍ॅट्रॉफीने ग्रस्त आहे आणि जगातील सर्वात महागड्या औषधाची त्याला आवश्यकता आहे. त्याच्या उपचारासाठी सुमारे 16 कोटी रुपयांची गरज आहे. आपण देणगी त्यांना मदत करू शकता. कमेंट बॉक्समध्ये मी यासाठी देणगी लिंक शेअर करत आहे.’ अजय देवगण आयुष गुप्ता नावाच्या मुलाच्या मदतीसाठी देखील अशाच प्रकारे पुढे आला होता. त्याच्या चाहत्यांसह अन्य ट्विटर वापरकर्त्यांनीही अजय देवगणच्या या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच, मदत करण्याचे वाचन देखील दिले आहे (Ajay Devgn appeals on twitter to save child who suffering from rare diseases).

RRRमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

चित्रपट विश्वात सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती दिग्दर्शक एसएस राजामौलीच्या RRR या चित्रपटाची! या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडचा ‘सिंघम’ अर्थात अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) तेलुगु मनोरंजन विश्वात डेब्यू करत आहे. 2 एप्रिल रोजी अर्थात अजय देवगणच्या वाढदिवशी त्याने आपल्या चाहत्यांना एक मोठे रिटर्न गिफ्ट दिले होते. बहुचर्चित ‘RRR’ या चित्रपटातील अजय देवगणचा लूक या खास दिवशी रिलीज करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी खुद्द अजयनेच आपल्या वाढदिवशी चाहत्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून ‘RRR’चा फर्स्ट लूक रिलीज करणार असल्याचे म्हटले होते.

आगामी चित्रपट

अजय देवगणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तो लवकरच ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यासह ‘मैदान’, ‘मे डे’, ‘रेड 2’ या चित्रपटांमध्येही अजय देवगण दिसणार आहे. ‘रेड 2’ हा चित्रपट एका खऱ्या कथेने प्रेरित आहे. राजकुमार गुप्ता या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. अजय देवगण शेवट ‘तानाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटामध्ये दिसला होता.

(Ajay Devgn appeals on twitter to save child who suffering from rare diseases)

हेही वाचा :

Maharashtra Lockdown | महाराष्ट्रातील लॉकडाऊन पाळण्यास मनोरंजन विश्व तयार, मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली ‘ही’ अट

Alia Bhatt | आलिया भट्ट अखेर कोरोनामुक्त, आलिया म्हणते – निगेटिव्ह होणं पहिल्यांदाच चांगलं वाटतंय!

Published On - 10:58 am, Thu, 15 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI