5

Allu Arjun याच्या 6 वर्षीय मुलीने असं काय केलं? ज्यामुळे सर्वत्र तिचीच चर्चा

Allu Arjun | मुलगी असावी तर अशी... फक्त अल्लू अर्जून यालाच नाही तर, तुम्हाला देखील वाटेल अभिनेत्याच्या लेकीचा गर्व.. खुद्द अल्लू अर्जुन याने केलाय लेकीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या लेकीची चर्चा... तुम्हाला देखील नक्की आवडेल अभिनेत्याच्या लेकीचं काम

Allu Arjun याच्या 6 वर्षीय मुलीने असं काय केलं? ज्यामुळे सर्वत्र तिचीच चर्चा
Follow us
| Updated on: Sep 17, 2023 | 4:07 PM

मुंबई : 17 सप्टेंबर 2023 | अभिनेता अल्लू अर्जुन याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंज केलं. अभिनेता फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. अल्लू अर्जुन याची लोकप्रियता अधिक असल्यामुळे अभिनेत्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण आता अल्लू अर्जुन याची नाही तर, अभिनेत्याच्या लेकीची चर्चा तुफान रंगत आहे. अल्लू अर्जुन याच्या पत्नीने इन्स्टाग्राम स्टोरीवर लेकीचा व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्याची लेक मातीपासून गणपतीची मुर्ती तयार करताना दिसत आहे..

मंगळवारी गणरायाचं आगमन होणार असल्यामुळे सर्वत्र आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या गणरायाची मुर्ती स्वतः साकारताना व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. अशात अल्लू अर्जून याच्या ६ वर्षांच्या मुलीने देखील सुंदर गणरायाचा मुर्ती तयार केली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या पत्नीने पोस्ट केलेल्या लेकीच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.

अल्लू अर्जुन याच्या लेकीचं नाव अल्लू अरहा असं आहे. अल्लू अर्जुन याची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. स्नेहा कायम पती आणि मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी अल्लू अर्जुन याला कुटुंबासोबत स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

सध्या अभिनेत्याचं कुटुंब लेकीने साकारलेल्या गणरायाच्या मुर्तीमुळे चर्चेत आलं आहे. गणरायाचं आगमन होणार आहे, यासाठी मोठ्यापासून लहान मुलं देखील उत्सुक आहेत. अशीच उत्सुकता अभिनेत्याच्या घरात देखील दिसून येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अल्लू अर्जुन याच्या लेकीची चर्चा रंगत आहे.

अल्लू अर्जुन आणि कुटुंब

अभिनेता अल्लू अर्जुन कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेता कायम आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबासोबत वेळ व्यतीत करत असतो. शिवाय कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

अभिनेत्याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभनेता सध्या ‘पुष्पा 2 : द रुल’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. दिग्दर्शक सुकुमार द्वारे दिग्दर्शित सिनेमात अल्लू अर्जुन याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा १५ ऑगस्ट २०२४ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

आपके लिए
वृक्ष संवर्धनाचा अनोखा संदेश, विद्यार्थ्यांनी साकारला झाडाचा गणपती
वृक्ष संवर्धनाचा अनोखा संदेश, विद्यार्थ्यांनी साकारला झाडाचा गणपती
आदित्य ठाकरे यांची उंची किती? रामदास कदम यांनी उडविली खिल्ली
आदित्य ठाकरे यांची उंची किती? रामदास कदम यांनी उडविली खिल्ली
अजितदादा मन मोठं करा, 'त्यांना' माफ करा, बोललं कोण आणि माफीनामा कुणाचा
अजितदादा मन मोठं करा, 'त्यांना' माफ करा, बोललं कोण आणि माफीनामा कुणाचा
अध्यक्ष नार्वेकर यांची दिल्लीत धाव, पडद्यामागे काय हालचाली होताहेत?
अध्यक्ष नार्वेकर यांची दिल्लीत धाव, पडद्यामागे काय हालचाली होताहेत?
गोपीचंद पडळकर यांना कुणी केलं आवाहन, म्हणाले 'लबाडांच्या टोळीतून...'
गोपीचंद पडळकर यांना कुणी केलं आवाहन, म्हणाले 'लबाडांच्या टोळीतून...'
स्पेनच्या बर्सीलोना शहरात विराजमान झाला गणपती बाप्पा, पाहा व्हिडीओ
स्पेनच्या बर्सीलोना शहरात विराजमान झाला गणपती बाप्पा, पाहा व्हिडीओ
10 जन्मात नव्हे 10 तासातच विश्वासाला तडा, सुप्रियाताई याचं काय बिनसलं?
10 जन्मात नव्हे 10 तासातच विश्वासाला तडा, सुप्रियाताई याचं काय बिनसलं?
पडळकरांना जोडे मारा, 1 लाख घ्या, कुणी जाहीर केलं इनाम?
पडळकरांना जोडे मारा, 1 लाख घ्या, कुणी जाहीर केलं इनाम?
राहुल गांधी आणि अमित शाह यांची खडाजंगी, तर सोनिया गांधी म्हणाल्या...
राहुल गांधी आणि अमित शाह यांची खडाजंगी, तर सोनिया गांधी म्हणाल्या...
बच्चू कडू यांचे महिला आरक्षणावरून टीकास्त्र, 'गुलामीत राहणारी महिला...
बच्चू कडू यांचे महिला आरक्षणावरून टीकास्त्र, 'गुलामीत राहणारी महिला...