AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pathaan: शाहरुखच्या ‘पठाण’वरुन अयोध्येचे महंत आक्रमक, थेट थिएटर जाळण्याचा इशारा

दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरून वाद; महंतांनी दिली थिएटरच जाळून टाकण्याचा इशारा

Pathaan: शाहरुखच्या 'पठाण'वरुन अयोध्येचे महंत आक्रमक, थेट थिएटर जाळण्याचा इशारा
Shah Rukh Khan स्टारर पठाण सिनेमाला विरोध कायम ; सिनेमागृहात तोडफोड, पाच जणांना अटक
| Updated on: Dec 15, 2022 | 1:21 PM
Share

अयोध्या: अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट वादात सापडला आहे. अयोध्य्याचे महंत राजू दास यांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. इतकंच नव्हे तर त्यांनी म्हटलंय, “मी प्रेक्षकांना विनंती करतो की ज्या थिएटरमध्ये पठाणचा चित्रपट दाखवला जाईल, त्याला जाळून टाका.” राजू दास यांनी बॉलिवूड आणि शाहरुखवर सनातन धर्माची खिल्ली उडवल्याचा आरोप केला.

“बॉलिवूड आणि हॉलिवूड सतत या प्रयत्नात असतात की कशा पद्धतीने सनातन धर्माची मस्करी करावी, कशा प्रकारे हिंदू देवी-देवतांचा अपमान करावा. पठाण चित्रपटात दीपिका पदुकोणने बिकीनी घालून साधुसंतांच्या आणि राष्ट्राच्या भगव्या रंगाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे. हे दु:खद आहे”, असं अयोध्याचे महंत राजू दास म्हणाले.

“भगव्या रंगाची बिकिनी घालून नग्न प्रदर्शन करायची काय गरज होती? अशा लोकांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. मी प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकावा आणि ज्या थिएटरमध्ये तो चित्रपट दाखवला जाईल, त्याला जाळून टाकावं. जशास तसं उत्तर दिलं पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी राग व्यक्त केला.

शाहरुखचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. त्यातील एका सीनमध्ये दीपिका पदुकोण ही केसरी रंगाच्या बिकिनीत पहायला मिळते. यावरूनच हिंदू संघटनांकडून संताप व्यक्त होतोय.

हिंदू महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनीसुद्धा यावर आक्षेप नोंदविला. पठाणमध्ये भगव्या रंगाचे कपडे अश्लील पद्धतीने परिधान केले आहेत, हा सनातन धर्माचा अपमान आहे, असं त्यांनी म्हटलंय.

तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.