मासिक पाळीचा ‘तो’ सीन शूट करताना कशी होती अविका गौरची अवस्था? म्हणाली, ‘दिग्दर्शकांनी मला विचारलं…’

Balika Vadhu : 'बालिका वधू' मालिकेत अविका गौरने मासिक पाळीचा दिलेला 'तो' सीन, त्यावर अनेक वर्षांनंतर अभिनेत्री म्हणाली, 'दिग्दर्शकांनी मला विचारलं...', अविका गौर हिने मालिकेत 'आनंदी' ही भूमिका साकारली होती... आजही चाहते अभिनेत्रीच्या भूमिकेला विसरु शकले नाहीत...

मासिक पाळीचा 'तो' सीन शूट करताना कशी होती अविका गौरची अवस्था? म्हणाली, 'दिग्दर्शकांनी मला विचारलं...'
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 1:24 PM

अभिनेत्री अविका गौर आता तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे कायम चर्चेत असते. पण एका वेळ अशी होती जेव्हा प्रत्येक जण अविता हिला ‘आनंदी’ म्हणून ओळखत होते. कारण ‘बालिका वधू’ मालिकेत ‘आनंदी’ या भूमिकेला न्याय देत अविका हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मालिकेनंतर देखील अभिनेत्रीने अनेक प्रोजक्टमध्ये काम केलं. पण आजही अविका हिची ओळख चाहत्यांमध्ये आनंदी म्हणून आहे. मालिकेमुळे अविका हिने अनेक गोष्टी फार जवळून पाहिल्या आहेत. वयाच्या 12 व्या वर्षी अभिनेत्री मासिक पाळीचा सीन शूट केला. त्या सीनबद्दल अभिनेत्रीने अनेक वर्षांनंतर मैन सोडलं आहे.

वयाच्या 12 व्या वर्षी अविका हिने मालिकेत मासिक पाळीचा एक सीन शूट केला. सीनमध्ये आनंदीला पहिल्यांदा मासिक पाळी येते आणि अशा अवस्थेत आनंदी स्वतःच्या कुटुंबापासून दूर सासरी असते. तेव्हा सीन कसा शूट झाला याबद्दल अभिनेत्रीने मौन सोडलं आहे.

सीन शूट होण्यापूर्वी मालिकेच्या दिग्दर्शकांना अविका हिला मासिक पाळीबद्दल तुला काही माहिती आहे का? असं विचारलं होतं. तेव्हा अभिनेत्री दिग्दर्शकांना म्हणाली, ‘मला मासिक पाळीबद्दल माहिती आहे. कारण मला माझ्या आईने सांगितलं होतं. त्या एका सीनसाठी आईने मला मासिक पाळीबद्दल समजावून सांगितलं होतं आणि खऱ्या आयुष्यात देखील असं होणार असं आईने सांगितलं होतं…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी ‘बालिका वधू’ मालिकेचे आभार मानेल, कारण लहान वयात मला फार गोष्टी कळल्या.’ मालिकेमध्ये ‘आनंदी’ भूमिकेला न्याय देत अविका हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता अभिनेत्रीला ओळखणं देखील कठीण झालं आहे. आता सोशल मीडियावर अविका हिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

‘बालिका वधू’ मालिकेत अविका गौरने लहानग्या आनंदीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतही ती सहाय्यक भूमिकेत झळकली होती. याशिवाय, तिने काही तेलुगू आणि कन्नड चित्रपटांतही काम केलं आहे. मात्र करिअरमध्ये अविकाला वाढत्या वजनामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं.

अखेर, ‘फॅट टू फिट’ चॅलेंज स्वीकारत अविकाने आपलं ट्रान्सफॉर्मेशन करुन घेतलं. त्यानंतर अविकाचा सडसडीत बांधा पाहून सगळेच चकित झाले. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अविका हिच्या फिटनेसची चर्चा रंगली आहे. अविका प्रटंड फिटनेस फ्रिक आहे. तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Non Stop LIVE Update
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय.
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य.
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका.
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’.
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?.
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक.
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका.
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा.
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं.