AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चक्क रशियन मुलीसाठी भाऊ कदम शिकले इंग्रजी, ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या सेटवर मोठा किस्सा

एकदा येऊन तर बघा हा चित्रपट जोरदार चर्चेत आहे. एकदा येऊन तर बघा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. आता हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. चाहते चित्रपटाची वाट पाहताना दिसत आहेत.

चक्क रशियन मुलीसाठी भाऊ कदम शिकले इंग्रजी, 'एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या सेटवर मोठा किस्सा
| Updated on: Nov 23, 2023 | 9:28 PM
Share

मुंबई : ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ नक्कीच आहे. आता नुकताच एकदा येऊन तर बघा चित्रपटाची टीम टीव्ही9 मराठीच्या आॅफिसला पोहचली. यावेळी धमाका करताना टीम दिसली. भाऊ कदम यांनी तर थेट एकदा येऊन तर बघा चित्रपटाच्या सेटवरील काही किस्सेच सांगून टाकले. एकदा येऊन तर बघा या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेश कुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांनी केलीये. हा चित्रपट 8 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

विशेष म्हणजे एकदा येऊन तर बघा हा चित्रपट अगोदर 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, दिवाळीनिमित्त अनेक चित्रपट रिलीज झाल्याने निर्मात्यांनी मोठा निर्णय घेत 8 डिसेंबरला चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतला. नुकताच भाऊ कदम यांनी मोठा खुलासा करत चित्रपटाच्या सेटवरील काही किस्से सांगितले आहेत.

चित्रपटात रशियन मुलगीसोबत डान्स करताना भाऊ कदम हे दिसणार आहेत. यावरच बोलताना भाऊ कदम हे दिसले. भाऊ कदम यांना विचारण्यात आले की, रशियन मुलीसोबत डान्स करण्याचा अनुभव कसा राहिला. यावर भाऊ कदम म्हणाले की, मुळात म्हणजे तिला माझी भाषा कळत नव्हती आणि मला तिची भाषा कळत नव्हती.

मी जसा डान्स करतो तोच डान्स तिने केला. चित्रपटाच्या टीमने हा देखील खुलासा केला की, भाऊ कदम यांनी चित्रपटाच्या सेटवर सर्वाधिक मजा ही रशियन मुलीसोबतच केलीये. रशियन मुलीसोबत सेटवर कशाप्रकारे भाषेचा प्राॅब्लेम येत असत हे सांगताना देखील भाऊ कदम हे दिसत आहेत. भाऊ कदम म्हणाले की, एका सीननंतर सांगण्यात आले की, कट..परंतू ती रशियन मुलगी उठलीच नाही. मग तिला ज्यावेळी Done म्हणून सांगितले गेले, त्यावेळी ती उठली.

याप्रकारे अनेक किस्से चित्रपटाच्या सेटवरील सांगताना भाऊ कदम हे दिसले. भाऊ कदम म्हणाले, मी त्या रशियन मुलीकडून काही शब्द, शिकलो…ओके, डन हे सर्व शब्द मी तिच्याकडूनच शिकलो. मी तिला ठाणे आणि डोंबिवलीची भाषा शिकवली. एकदा येऊन तर बघा हा चित्रपट नक्कीच बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ