Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेच्या जामीनासाठी 'तारीख पे तारीख'

Bigg Boss Marathi 2 :  अभिजीत बिचुकलेच्या जामीनासाठी 'तारीख पे तारीख'

Bigg Boss Marathi 2 सातारा : बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेल्या अभिजीत बिचुकलेला (Abhijeet Bichukale) चेक बाऊन्स प्रकरणी शुक्रवारी (21 जून) सातारा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला चेक बाऊन्स प्रकरणी सातारा जिल्हा न्यायलयाने जामीन मंजूर केला होता. मात्र खंडणी प्रकरणी त्याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता. दरम्यान या सर्व प्रकरणानंतर अभिजीत बिचुकले विरोधात खंडणी प्रकरणी तक्रार करणाऱ्या फिरोज पठाण यांनी तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा जाण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला होता.

मात्र आता बिग बॉसच्या घरातील सदस्य अभिजीत बिचुकलेला खंडणी प्रकरणातील जामीन मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण अद्याप बिचुकलेंचा खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज मंजूर करण्यात आलेला नाही. अभिजीत बिचुकलेविरोधात तक्रार करणाऱ्या फिरोज पठाण यांनी आज (25 जून) सातारा जिल्हा न्यायलयात याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र न्यायलयाच्या कायदेशीर बाबीमुळे त्याचा जामीन मंजूर होण्यास वेळ लागत आहे. दरम्यान उद्या (26 जून) अभिजीत बिचुकले व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे सातारा न्यायधीशांसोबत संवाद साधणार आहे. त्यावेळी अभिजीत बिचुकलेंच्या जामीनावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  मात्र या सर्व गोष्टीमुळे बिचुकलेंना बिग बॉसच्या घरात येण्यास उशीर होणार आहे.

अभिजीत विरोधात दोन तक्रारी 

बिग बॉस मराठी सिझन 2 मधून अल्पावधीत प्रसिद्धी मिळालेल्या अभिजीत बिचुकलेविरोधात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यातील एक तक्रार चेक बाऊन्स प्रकरणातील होती. वकील संदीप सकपाळ यांनी चेक बाऊन्स प्रकरणी तक्रार दाखल केली होती. तर दुसरी तक्रार खंडणी प्रकरणी असून ती फिरोज पठाण यांनी दाखल केली होती.

चेक बाऊन्स प्रकरण काय? 

फेब्रुवारी 2015 मध्ये खासगी कामासाठी अभिजीत बिचुकलेला 50 हजार रुपये दिले होते. काही महिन्यांनी मी तुम्हाला पैसे परत करेन असे बिचुकलेंनी सकपाळ यांना सांगितले होते. त्यानंतर सकपाळ यांना पैशाची गरज असताना त्यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र त्याने पैसे देण्यास विरोध केला. त्यानंतर सकपाळ यांनी पैशासाठी बिचुकलेंच्या मागे तगादा लावल्यानंतर त्याने त्यांना 28 हजार रुपयांचा चेक दिला. सकपाळ यांनी तो क्लिअरन्ससाठी टाकल्यानंतर चेक बाऊन्स झाला. या कारणामुळे सकपाळ यांनी बिचुकलेंविरोधात 2015 मध्ये सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

अटक आणि न्यायलयीन कोठडी

अभिजीत बिचुकलेला  चेक बाऊन्स प्रकरणात पोलिसांनी बिग बॉस मराठीच्या सेटवर येऊन शुक्रवारी (21 जून) अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणी शनिवारी (22 जून) सातारा जिल्हा न्यायलयात हजर केले होते. त्यावेळी त्याला चेक बाऊन्स प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र अभिजित बिचुकलेला खंडणी प्रकरणी जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळला होता. त्यामुळे बिचुकलेंची रवानगी बिग बॉसच्या घरातून थेट न्यायलयीन कोठडीत करण्यात आली होती.

त्यानंतर आज (24 जून) या प्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायलयाने याप्रकरणी सुनावणी केली. यावेळी न्यायधीशांनी बिचुकलेचा खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे बिचुकलेला 27 जूनपर्यंत न्यायलयीन कोठडीत राहावे लागणार असल्याचे कोर्टाने म्हटलं होतं.

फिरोज पठाण यांच्याकडून अभिजीतची स्तुती

दरम्यान आज (24 जून) रात्री अचानक फिरोज पठाण यांनी पोलीस ठाण्यात जात तक्रार मागे घेतली. त्यावेळी त्यांनी “अभिजीत बिचुकले हा बिग बॉस मराठी सिझन 2 मधील एक सदस्य आहे. तो बिग बॉसच्या घरात असल्याने साताऱ्याचे नाव मोठं होतं आहे,” अशी स्तुतीही फिरोज पठाण यांनी बिचुकलेची केली. फिरोज यांनी तक्रार मागे घेतल्याने बिचुकलेंना लवकरच न्यायलयीन कोठडीतून मुक्त करण्यात येणार आहे.

‘तारीख पे तारीख’

त्यानंतर आज (25 जून) अभिजीत बिचुकलेविरोधात तक्रार करणाऱ्या फिरोज पठाण यांनी सातारा जिल्हा न्यायलयात याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र न्यायलयाच्या कायदेशीर बाबीमुळे त्याचा जामीन मंजूर होण्यास वेळ लागत आहे. दरम्यान उद्या (26 जून) अभिजीत बिचुकले व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे सातारा न्यायधीशांसोबत संवाद साधणार आहे. त्यावेळी अभिजीत बिचुकलेंच्या जामीनावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  मात्र या सर्व गोष्टीमुळे बिचुकलेंना बिग बॉसच्या घरात येण्यास उशीर होणार आहे.

बिग बॉसची टीम साताऱ्यात 

यंदाच्या बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेला एक चेहरा म्हणजे अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale).. वादग्रस्त वक्तव्य करणे, टास्क खेळताना नियमांच्या विरुद्ध वागणे, घरातील महिला सदस्यांसोबत फर्ल्ट करणे यामुळे बिचुकले अनेकदा चर्चेत आले आहेत. यामुळे बिचुकले शो मध्ये असताना शो चा टीआरपी चांगलाच वाढला होता. त्यामुळे शोच्या टीआरपीसाठी बिग बॉसची टीम त्यांना परत आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते आहे. बिचुकलेंना अटक झाल्यापासून गेल्या चार दिवसांपासून बिग बॉस टीम सातारा मुक्कामी आहे. त्यामुळे बिचुकलेंची कोठडीतून सुटका झाल्यानंत त्यांना थेट बिग बॉसच्या घरात आणलं जाणार असल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.

कोण आहे अभिजीत बिचुकले ?

अभिजीत बिचुकले हे साताऱ्यातील फेमस व्यक्तीमत्व आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यामुळे ते राज्यभर चर्चेत आले.

अभिजीत बिचुकले हा बिग बॉस मराठी सिझन 2 मधील सदस्य आहे.

अभिजीत बिचुकले स्वत:ला कवी म्हणवून घेतात. त्यांनी आतापर्यंत नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीपर्यंतच्या अनेक निवडणुका लढवल्या आहेत.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे.

बिग बॉसच्या घरात वादग्रस्त वक्तव्य करणे, टास्क खेळताना नियमांच्या विरुद्ध वागणे, घरातील महिला सदस्यांसोबत फर्ल्ट करणे यासाठी प्रसिद्ध आहे

बिग बॉसच्या घरात वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना अल्पावधीतच प्रसिद्ध मिळाली आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सातारा आणि सांगलीतून त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता.

संबंधित बातम्या 

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकले विरोधातील तक्रार मागे

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेचा जामीन नामंजूर, कोर्टात काय घडलं?

अभिजीत बिचुकलेच्या जागी बिग बॉसमध्ये जाणार का? शितली म्हणते…

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरातून थेट तुरुंगात

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेला अटक का आणि कशी झाली? वकिलांनी अख्खी स्टोरी सांगितली

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेला अटक, सातारा पोलिसांची मुंबईत येऊन कारवाई

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच रुपालीला थोबाडीत मारणार, आई संतप्त  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *