AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिषेक बच्चनसोबत नाही तर, पहिल्यांदा कोणासोबत ऐश्वर्या राय अडकली विवाहबंधनात?

लग्नाबद्दल अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याकडून मोठा खुलासा... अभिषेक बच्चन याच्याआधी अभिनेत्रीने कोणासोबत केलं लग्न? आजही ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नाबद्दल रंगतात अनेक चर्चा...

अभिषेक बच्चनसोबत नाही तर, पहिल्यांदा कोणासोबत ऐश्वर्या राय अडकली विवाहबंधनात?
| Updated on: Mar 14, 2023 | 5:24 PM
Share

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांनी २००७ साली लग्न केलं. लग्नानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न मुंबईमध्ये ठरावीक पाहुण्यांच्या उपस्थितीत झालं. लग्नानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. ज्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक अनेक वर्ष चर्चेत राहिले. आज ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली आहेत, तरी देखील दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. लग्नानंतर ऐश्वर्या हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी एका झाडासोबत सप्तपदी घेतल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.

लग्नानंतर २००८ साली ऐश्वर्या हिने रंगणाऱ्या चर्चांवर नाराजी व्यक्त केली होती. ऐश्वर्या हिला एका मुलाखतीत विचारण्यात आलं की, लग्नाचा एक पैलू, ज्याची अजिबात अपेक्षा देखील केली नव्हती? या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, ‘काही अशा गोष्टी ज्यांची मी कधी अपेक्षा देखील केली नव्हती. काही गोष्टींचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता, अशा गोष्टी घडल्या…’

त्यानंतर ऐश्वर्याला हिला, झाडासोबत लग्न? यावर विचारण्यात आलं. या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, ‘चर्चा रंगल्या होत्या. पण रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा होत्या. ज्या मला बिलकूल आवडल्या नव्हत्या. म्हणून मी अनेक गोष्टींवर कधी व्यक्त देखील झाली नाही… आमचं कुटुंब उत्तम आहे. लग्नात प्रत्येक गोष्ट घरातील वरिष्ठांच्या सांगण्यानुसार झाल्या होत्या. ‘

पुढे ऐश्वर्या म्हणाली, ‘बाबांनी (अमिताभ बच्चन) लग्नानंतर योग्य वेळ ठरवून माध्यामांसोबत संवाद साधला आणि सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. ‘ रंगणाऱ्या अफवांवर बच्चन कुटुंबाने सतत नकार दिला. २०१६ मध्ये अभिषेकने ट्विट केलं होतं की, ‘रेकॉर्डसाठी आम्ही आजही झाडाच्या शोधात आहोत….’ ज्यामुळे अभिनेता चर्चेत आला होता.

अमिताभ बच्चन यांना देखील सांगितलं की, ‘कुटुंब अंधविश्वासी नाही. लग्नाआधी आम्ही ऐश्वर्याची जन्म पत्रिका देखील पाहिली नव्हती. झाड कुठे आहे? मला दाखवा… ऐश्वर्याने एकाच व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. तिने माझा मुलगा अभिषेक याच्यासोबत लग्न केलं आहे… ‘ ऐश्वार्या – अभिषेक यांच्या लग्नानंतर अनेक चर्चा रंगल्या होत्या आणि रंगणाऱ्या चर्चा फक्त आणि फक्त अफवा असल्याचा खुलासा बच्चन कुटुंबाने केल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.