Bigg Boss Marathi 4: किरण माने ते ‘शेवंता’.. बिग बॉसच्या घरात ‘या’ स्पर्धकांमध्ये होणार टक्कर

बिग बॉस मराठी 4 चा ग्रँड प्रीमिअर

Oct 02, 2022 | 9:26 PM
स्वाती वेमूल

|

Oct 02, 2022 | 9:26 PM

'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता धोंगडेनं बिग बॉस मराठीच्या घरात एण्ट्री केली आहे. सुमी या भूमिकेतून अमृताने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 'चांदणे शिंपीत जाशी' या मालिकेतही अमृता दिसली.

1 / 12
सोशल मीडियावरील पोस्टमुळे सतत चर्चेत असणारे अभिनेते किरण माने हेसुद्धा बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी झाले आहेत. 'मुलगी झाली हो' या मालिकेतून अचानक काढून टाकण्यात आल्याने ते चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांनी वाहिनीविरोधात तक्रारसुद्धा दाखल केली होती.

2 / 12
स्पिट्सविला एक्स 3 या हिंदी टीव्ही शोमधून समृद्धी जाधवला प्रसिद्धी मिळाली. समृद्धीने या आधी मराठी इंडस्ट्रीत काम केलं नव्हतं. आता मराठी प्रेक्षकांसमोर तिला बिग बॉसच्या घरात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

3 / 12
हिंदी आणि मराठी टीव्ही इंडस्ट्रीतला लोकप्रिय चेहरा अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या घरात दाखल झाला आहे. बाकरवडी या मालिकेतील त्याची अभिषेक गोखलेची भूमिका चांगलीच गाजली होती.

4 / 12
रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने बिग बॉस मराठीच्या घरात धमाकेदार एण्ट्री केली आहे.

5 / 12
अभिनेता प्रसाद जवादे याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तोदेखील यंदाच्या सिझनमध्ये दाखल झाला आहे.

6 / 12
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यंदाच्या सिझनमध्ये झळकणार आहे. देवमाणूस या मालिकेत तिने आमदार बाईंची भूमिका साकारली होती.

7 / 12
माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेत अविनाशची भूमिका साकारलेली अभिनेता निखिल राजेशिर्के याने बिग बॉस मराठीच्या घरात एण्ट्री केली आहे.

8 / 12
रोडीज फेम योगेश जाधव बिग बॉस मराठी 4 च्या घरात स्पर्धक म्हणून दाखल झाला आहे.

9 / 12
फ्रेशर्स मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेली अमृता देशमुख हिने बिग बॉसच्या घरात एण्ट्री केली आहे. तिने स्वीटी सातारकर, आजी आणि नात यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय.

10 / 12
विविध हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री यशश्री मसूरकर हिने बिग बॉसच्या घरात धमाकेदार एण्ट्री केली आहे.

11 / 12
डान्सर आणि अभिनेता विकास सावंतसुद्धा यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे.

12 / 12

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें