Bigg Boss Marathi: घन:श्यामवर प्रचंड भडकली अंकिता म्हणते, ‘टुम टुम धावत येऊ नको असं वाटतं…’
Bigg Boss Marathi: घन:श्यामवरला दोन कानाखाली द्याव्याशा वाटतात... मुलावर विश्वास ठेलणं कठीण..., टुम टुम धावत येतो तेव्हा..., छोट्या पुढारीवर प्रचंड भडकली अंकिता, व्हिडीओ तुफान व्हायरल, सध्या सर्वत्र बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमेची चर्चा...

Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ शो आता प्रेक्षकांना आवडत आहे. सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये सतत बिग बॉस आणि स्पर्धकांची चर्चा रंगली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, जान्हवी, अरबाज यांच्यासोबतच कोकण हार्टेड गर्ल अंकिता आणि छोटा पुढारी घन:श्याम यांच्या नावाची देखील चर्चा तुफान रंगली आहे. आता तर अंकिता आणि घन:श्याम यांच्यातील वाद समोर येत आहेत. ‘घन:श्यामला पाहिल्यानंतर दोन कानाखाली द्याव्याशा वाटतात…’ असं वक्तव्य अंकिता हिने केलं.
‘बिग बॉस मराठी’ सीझन 5 शोचा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अंकिता, घन:श्याम याच्यावर भडकलेली दिसत आहे. शिवाय घन:श्यामला दोन कानाखाली द्याव्याशा वाटतात… मुलावर विश्वास ठेलणं कठीण आहे… असं देखील म्हणताना दिसत आहे.
View this post on Instagram
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये अंकिता आणि धनंजय पोवार यांच्यासोबत बोलताना दिसत आहे. अंकिता म्हणाली, ‘घन:श्यामला खरंच मारावंलं वाटत होतं, त्याच्या एकाही शब्दावर मला विश्वास नाही… अका टुम टुम धावत येतो तेव्हा वाटतं दोन सणसणीत लावून द्याव्या…’ यावर धनंजय अंकिताला समजावताना म्हणतात, ‘असे विचार मनात देखील आणायचे नाही..’ व्हिडीओ नेटकरी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
नक्की काय आहे अंकिता – घन:श्याम यांच्यातील प्रकरण?
दोन बाहुल्यांरुपी बाळांनी ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली आणि त्यासोबतच स्पर्धकांना टास्क दिला. घरात बाहुल्यांरुपी बाळांना सांभाळण्याचा टास्क सुरू असताना घन:श्यामने कॅप्टनकडे तक्रार केली. ‘मला अंकिताचा हात लागला आहे…’ टास्क संपल्यानंतर अंकिताने धनंजय यांच्याकडे तक्रार केली आणि घन:श्यामवरला दोन कानाखाली द्याव्याशा वाटतात असं म्हणाली..
नव्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी अंकिता हिची बाजू घेत घन:श्यामवर यांच्यावर टीका करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘अंकिता तू बिनधास्त भिड आम्ही आहोत…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘अंकिता नको ते पाऊल उचलू नकोस..लहान मुलांवर हात उचलणं गुन्हा आहे…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘छोटा पुढारी निघ माघारी…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘अंकिता संपूर्ण महाराष्ट्र तुझ्याबरोबर आहे…’ त्यामुळे आता ‘बिग बॉस मराठी’मध्ये पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
