AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss Marathi : निक्की तू हलक्या कानाची… तुझी बुद्धीच हलकी… कोण म्हणालं असं?; बिग बॉसच्या घरात काय घडतंय?

निक्की तांबोळीला भाऊच्या धक्क्यावर चांगलीच फटकार बसली आहे. रितेश देशमुख यांनी निक्कीला चांगलंच फैलावर घेतलं. पॅडी ऊर्फ पंढरीनाथ कांबळे यांना जोकर म्हटल्याचं निक्कीच्या चांगलंच अंगलट आलं. त्यामुळे रितेश यांनी तिचा सर्वांसमोर पाणउतारा करत तिला आरसाच दाखवला. तसेच बाहेर तिची इमेज काय होत आहे, याची जाणीवही करून दिली.

Bigg Boss Marathi : निक्की तू हलक्या कानाची... तुझी बुद्धीच हलकी... कोण म्हणालं असं?; बिग बॉसच्या घरात काय घडतंय?
| Updated on: Aug 26, 2024 | 11:23 AM
Share

बिग बॉसच्या घरात भाऊच्या धक्क्यावर घरातील सदस्यांची चांगलीच कान उघडणी करण्यात आली. अभिनेते रितेश देशमुख यांनी जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी यांच्यासह अरबाजचेही चांगलेच कान उपटले. जान्हवीला तर थेट तुरुंगात टाकण्याची शिक्षा दिली. निक्कीलाही तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. तसेच निक्कीच्या घरातील वागण्यावरही बोट ठेवलं. दुसऱ्यांचं ऐकून कोणताही विचार न करता घरातील सदस्यांसोबत निक्की कसे भांडते हे रितेश यांनी निक्कीला सर्वांसमोर सुनावलं. त्यामुळे निक्कीचा चेहरा चांगलाच पाहण्यासारखा झाला होता. विशेष म्हणजे निक्कीनेही आपली ही चूक मान्य केली आहे.

निक्की तांबोळीने पंढरीनाथ कांबळे यांना जोकर म्हटलं होतं. त्यावरून रितेश देशमुख यांनी निक्कीचे चांगलेच कान उपटले. इतकेच नाही तर जोकर कोण असतो? त्याचं महत्त्व काय असतं? हे सुद्धा रितेश देशमुख यांनी निक्कीला सांगितलं. यावेळी रितेश देशमुख यांनी जोकर म्हणजे काय? कुणाला म्हटलं जातं? हे स्पष्ट केलं. जोकरची व्याख्याच त्यांनी सांगितलं. जोकर जो असतो ना तो दोन जागी असतो. एक सर्कसमध्ये असतो. जेव्हा सर्कसमध्ये मोठमोठे प्राणी येतात, लोक घाबरतात. आता काय होईल? असं सर्वांना वाटतं. तेव्हा जोकर येऊन त्यांची भीती घालवतो. जेवढ्या टाळ्या सिंहाला पडतात तेवढ्याच टाळ्या जोकरला पडतात, असं रितेश देशमुख यांनी सांगितलं.

तो गेमचेंजर असतो

दुसरा जोकर पत्त्यात असतो. एक्क्यात जेवढी ताकद नसते ना तेवढी जोकरात असते. कारण तो हरलेली बाजू जिंकून देतो. गेम चेंजर. एकीकडे एंटरटेनर तर दुसरीकडे गेम चेंजर. हा जोकर पॅडी भाऊ असेल असं वाटतं तर तो त्यांचा मान आहे. कुणालाही कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका. मी तर कुणाच्या बापाला घाबरत नाही हे बोलता ना… निक्की, अहो प्रेक्षकांना तरी घाबरा. ही कॅप्टन्सी एका आठवड्याची आहे. शो 100 दिवसांचा आहे. पुढच्या आठवड्यात काय होईल तुम्हाला माहीत नाही आणि मलाही माहीत नाही, असं रितेश यांनी निक्कीला सुनावलं.

तुम्हाला घरचे लोक चावी देतात

निकी तुम्ही हलक्या कानाच्या आहात. तुमची बुद्धी हलकी आहे. तुमचा आणि आर्याचा वाद झाला. त्यानंतर वर्षाजी (वर्षा उसगांवकर) आर्यांना समजावत होत्या. नको वाद वाढवू. शांत राहा. पण त्या (जान्हवी किल्लेकर) बाहेर आहेत ना? त्यांचं नाव घ्यायचं नाही. त्या (जान्हवी किल्लेकर) आल्या त्यांनी तुमचे कान भरले. तुम्ही काहीही विचार न करता पाय आपटत गेला. हिंमत असेल तर तोंडावर बोला असं म्हणाला. तुम्हाला काय माहीत वर्षाजी काय म्हणाल्या? कान भरले, लगेच जायचं आणि भांडायचं हा आहे निक्की फॉरमॅट. धनंजयने तुझे कानभरले आणि तुम्ही घनश्याम बरोबरचे भावाबहिणीचं नातं तोडलं. तुम्हाला गोष्ट बरोबर आहे की नाही, हे कळत नाही. तुम्ही घर चालवता? तुम्हाला वाटतं तुम्ही घर चालवता. नाही निक्की घरातील लोक तुम्हाला चालवतात. ते चावी मारतात आणि तुम्ही भांडत सुटता, असं त्यांनी सांगितलं.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.