AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss Marathi Season 6 Finale : ‘बिग बॉस मराठी 6’च्या विजेत्याला बक्षीस म्हणून मिळणार फक्त इतके रुपये

Bigg Boss Marathi Season 6 Finale : ग्रँड फिनालेचं काऊंटडाऊन सुरू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोण होणार विजेता हे आज अखेर जाहीर होणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या मानाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Bigg Boss Marathi Season 6 Finale : 'बिग बॉस मराठी 6'च्या विजेत्याला बक्षीस म्हणून मिळणार फक्त इतके रुपये
Bigg Boss Marathi 6 finale Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 19, 2026 | 4:47 PM
Share

Bigg Boss Marathi Season 6 Finale : जवळपास तीन महिन्यानंतर ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सिझन शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. रितेश देशमुख सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचा ग्रँड फिनाले आज 19 एप्रिल 2026 रोजी कलर्स मराठी वाहिनीवर पार पडणार आहे. बिग बॉस मराठीचा सहावा सिझन 11 जानेवारी 2026 पासून सुरू झाला होता. एकूण 17 स्पर्धकांनी यंदाच्या सिझनमध्ये भाग घेतला होता. त्यापैकी आता पाच स्पर्धक ग्रँड फिनालेच्या शर्यतीत उतरले आहेत. राकेश बापट, तन्वी कोलते, विशाल कोटियन, दिपाली सय्यद आणि अनुश्री माने या पाच स्पर्धकांपैकी बिग बॉसची ट्रॉफी कोण उचलणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे

ग्रँड फिनालेची तारीख आणि वेळ

‘बिग बॉस मराठी सिझन 6’चा महाअंतिम सोहळा आज रविवार 19 एप्रिल 2020 रोजी रात्री 8 वाजल्यापासून कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होईल. या ग्रँड फिनालेचं सूत्रसंचालनसुद्धा अभिनेता रितेश देशमुखच करणार आहे.

ग्रँड फिनाले कुठे पाहायचा?

प्रेक्षक बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनचा ग्रँड फिनाले कलर्स मराठी वाहिनीवर रात्री 8:00 वाजल्यापासून पाहू शकतात. तसंच जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही फिनाले स्ट्रीम होणार आहे.

टॉप 5 स्पर्धक कोण?

  • विशाल कोटियन
  • दिपाली सय्यद
  • अनुश्री माने
  • राकेश बापट
  • तन्वी कोलते

‘बिग बॉस मराठी 6’च्या निर्मात्यांनी पोस्ट केलेल्या ताज्या प्रोमोनुसार, ग्रँड फिनालेच्या एपिसोडमध्ये टॉप 5 स्पर्धकांना ब्रीफकेस चॅलेंजला सामोरं जावं लागणार आहे.

विजेत्याला किती रुपये बक्षीस म्हणून मिळणार?

मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याला 15 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. मात्र ही रक्कम याआधीच्या सिझन्सच्या तुलनेच खूपच कमी आहे. बिग बॉस हिंदीच्या 19 व्या सिझनच्या विजेत्याला तब्बल 50 लाख रुपये बक्षीस मिळालं होतं.

या भव्य सोहळ्यात केवळ विजेत्याची घोषणा होणार नाही, तर मनोरंजनाचा एक अद्वितीय जल्लोष रंगणार आहे. टॉप 5 चे दमदार परफॉर्मन्सेस, घरातील अविस्मरणीय क्षणांचा आढावा आणि अनेक सरप्राइज एलिमेंट्स प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, घरातून बाहेर पडलेल्या स्पर्धकांच्या परफॉर्मन्समुळे या फिनालेची रंगत अधिकच खुलणार आहे, ज्यामुळे हा सोहळा आणखी संस्मरणीय ठरेल.

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं