Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss OTT 2 | बिग बॉसच्या घरातून रात्री उशिरा अचानक स्पर्धकाला काढलं बाहेर; सलमानसमोर केली विनंती

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने पहिल्या सिझनचं सूत्रसंचालन केल्यानंतर आता दुसऱ्या सिझनसाठी सलमान खानची निवड करण्यात आली आहे. बिग बॉस आणि सलमान हे जणू समीकरणच बनलं आहे. मात्र सध्या हा शो त्यातील स्पर्धकांच्या मर्यादेपलीकडील वागणुकीमुळेही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.

Bigg Boss OTT 2 | बिग बॉसच्या घरातून रात्री उशिरा अचानक स्पर्धकाला काढलं बाहेर; सलमानसमोर केली विनंती
Salman KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 9:05 AM

मुंबई : बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. सलमान खानचं सूत्रसंचालन आणि घरातील स्पर्धकांच्या दररोजच्या नवीन ड्रामामुळे प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन होतंय. याच कारणामुळे आता हा शोची मुदत दोन आठवड्यांनी वाढवण्यात आली आहे. मात्र बिग बॉसच्या घरातील एक स्पर्धकाला बाहेर पडायचं आहे. या स्पर्धकाने सलमानसमोर अनेकदा विनवण्या केल्या आहेत. सलमानने त्याला घराबाहेर जाण्याची परवानगी दिली नाही. मात्र नंतर अचानक असं काही घडलं, ज्यामुळे त्याला रात्री उशिरा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं. हा स्पर्धक दुसरा-तिसरा कोणी नसून सायरल ब्रोचा आहे.

सायरसला गेल्या काही दिवसांपासून ठीक वाटत नव्हतं, म्हणून तो सतत बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची विनंती करत होता. प्रकृतीचं कारण देत तो सलमानला सांगत होता की घरात राहिल्याने त्याच्या तब्येतीवर वाईट परिणाम होत आहे. रात्रभर नीट झोपूही शकत नसल्याने वजन आणि भूक दोन्ही कमी झाल्याचं कारण त्याने दिलं. वीकेंड का वार एपिसोडमध्ये सायरसने जवळपास तीस मिनिटांपर्यंत सलमानकडे विनंती केली. इतकंच नव्हे तर त्याने शोच्या निर्मात्यांनीही विनंती केली. अखेर रात्री उशिरा सायरल ब्रोचा बिग बॉस ओटीटी 2 च्या घरातून बाहेर पडला.

लोकांच्या मतांनुसार सायरल या आठवड्यात सुरक्षित होता. मात्र तरीही त्याला रात्री उशिरा बेघर केलं. बिग बॉसच्या घरात अचानक त्याची तब्येत बिघडल्याने निर्मात्यांना हा निर्णय घ्यावा लागला, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता सायरल पुन्हा घरात प्रवेश करणार की नाही हे येत्या काळात समजेल. बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन आता दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे घरात काही वाइल्ड कार्ड एण्ट्रीसुद्धा होऊ शकतात. शोमधून या आठवड्यात कोणताच स्पर्धक बाद झाला नाही.

हे सुद्धा वाचा

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने पहिल्या सिझनचं सूत्रसंचालन केल्यानंतर आता दुसऱ्या सिझनसाठी सलमान खानची निवड करण्यात आली आहे. बिग बॉस आणि सलमान हे जणू समीकरणच बनलं आहे. मात्र सध्या हा शो त्यातील स्पर्धकांच्या मर्यादेपलीकडील वागणुकीमुळेही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. आधी बिग बॉसच्या घरातील जद हदिद आणि आकांक्षा पुरी यांच्या 30 सेकंदांच्या लिप-टू-लिप किसची जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर जद हदिदने पुन्हा एका मर्यादा ओलांडली. बिग बॉसच्या घरात स्पर्धकासमोर त्याने थेट पँटच उघडली. ओटीटीवर सेन्सॉरशिप नसल्याचा पुरेपूर फायदा हे स्पर्धक टीआरपीसाठी घेत असल्याचा आरोप प्रेक्षकांकडून होत आहे.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.