Aamir Khan Kiran Rao Divorce | आता आम्हाला आमच्या आयुष्यातली नवी इनिंग सुरु करायचीय, किरण -आमिर खानचा पंधरा वर्षानंतर तलाक!

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. (Bollywood Actor Aamir Khan and his wife Kiran Rao Divorce)

Aamir Khan Kiran Rao Divorce | आता आम्हाला आमच्या आयुष्यातली नवी इनिंग सुरु करायचीय, किरण -आमिर खानचा पंधरा वर्षानंतर तलाक!
Amir Khan Kiran Rao
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 3:04 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Amir Khan) आणि त्याची पत्नी किरण राव (Kiran Rao) या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर खान आणि किरण रावने संयुक्त निवेदन जारी करुन या निर्णयाविषयी माहिती दिली. आमिर खान-किरण रावच्या घटस्फोटाच्या वृत्ताने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दोघांनी सहमतीने वेगळे होत असल्याचं म्हटलं आहे. (Bollywood Actor Aamir Khan and his wife Kiran Rao Divorce)

आमिर खानने पहिली पत्नी रिनासोबत काडीमोड घेऊन किरण रावसोबत लगीनकाठ बांधली होती. लगान सिनेमावेळी आमिर आणि किरण रावचं सुत जुळलं होतं. “गेल्या 15 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आम्ही घटस्फोट घेत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. आम्हाला आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये आम्ही पती-पत्नी नव्हे तर पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील एक सदस्य असू,” असे या निवेदनात म्हटले आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

आमिर खान आणि किरण राव यांचे पत्र 

या सुंदर 15 वर्षांमध्ये आम्हाला एकत्रित आयुष्यभराचे अनुभव, आनंदाने जगता आलं. आमचं नातं केवळ विश्वास, आदर आणि प्रेम यावरच फुलले. आता आम्हाला आमच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू करायचा आहे. आम्ही आता फार काळासाठी पती-पत्नी असं न राहता, माता-पिता आणि कुटुंबाच्या रुपात राहू.

आम्ही काही काळापूर्वीच नियोजनपूर्वक वेगळं होण्याची सुरुवात केली होती. आता त्याला औपचारिक रुप दिल्यानं बरं वाटत आहे. विस्तारित कुटुंबाप्रमाणं आमचं जीवन वेगळं जगणार असलो, तरी महत्वाच्या प्रसंगात एकत्र असू.

आम्ही मुलगा आझादची जबाबदारी आई-वडील म्हणून पार पाडू, त्याचं पालन पोषण दोघेही सहकारी म्हणून करु. आम्ही चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रकल्पांमध्ये सहकारी म्हणून काम सुरु ठेवणार असून त्याबद्दल आम्ही भावूक आहोत.

आमच्या नात्यातील या निर्णयाला सातत्याने पाठिंबा आणि सहकार्य करणारे आमचे कुटुंबीय आणि मित्र यांनादेखील धन्यवाद देतो. कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही सुरक्षितपणे या निर्णयापर्यंत पोहोचलो नसतो.

आम्हाला आमच्या शुभचिंतकांकडून शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळण्याची आशा आहे. आमच्यासारखं तुम्हीही या घटस्फोटाकडे शेवट नव्हे तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे, अशा दृष्टीने पाहाल! – आमिर खान आणि किरण राव

2005 मध्ये विवाहबंधनात

‘लगान’ सिनेमाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. किरण राव या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर आमिर आणि किरणने 28 डिसेंबर 2005 सालामध्ये लग्नगाठ बांधली होती. तर 2011 मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांचा मुलगा आझादचा जन्म झाला होता. आमिर खानला पहिली पत्नी रिया दत्तापासून आयरा खान आणि जुनैद खान अशी दोन मुलं आहेत.

दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी अमिरच्या साथीने किरण राव यांचं मोठं काम

दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी आमिर खान यांच्याबरोबर किरण राव शेताच्या बांधावर गेल्या होत्या. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे त्यांनी पालथे घातले. अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी ‘पाणी फाउंडेशन’च्या माध्यमातून मोठं काम केलं. यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने त्यांची वेळोवेळी स्तुती केली. त्यांना भक्कम पाठिंबा दिला. किरण राव आणि आमीर खान या दोघांनी कित्येक गावांमध्ये पाण्याच्या रूपाने नवसंजीवनी आणली. जिथं गेली अनेक दशकं माळरान होतं तिथं हिरवी स्वप्न फुलवली. आमिर खान, किरण राव आणि संपूर्ण पाणी फाउंडेशनच्या टीमने महाराष्ट्रातला दुष्काळ हटवण्यासाठी मोठं काम केलं.

(Bollywood Actor Aamir Khan and his wife Kiran Rao Divorce)

संबंधित बातम्या : 

20 years of Lagaan | पहिल्या पत्नीचं ‘ते’ पत्र वाचून ढसाढसा रडला आमीर खान, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेता प्राचीन चौहानला अटक, विनयभंगाच्या आरोपानंतर पोलिसांची कारवाई

मोठी बातमी: अभिनेता दिनो मोरियावर ‘ईडी’ची कारवाई; सव्वा कोटींची संपत्ती जप्त

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.