घटस्फोटाची चर्चा असतानाच अभिषेक बच्चन याने शेअर केला थेट ‘हा’ फोटो, चक्क ऐश्वर्या राय हिला सोडून…
अभिषेक बच्चन याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अभिषेक बच्चन यांची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा तूफान रंगताना दिसत आहे की, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा लवकरच घटस्फोट हा होणार आहे. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणी भाष्य केले नाहीये.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. दोघांचा घटस्फोट होणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. हेच नाही तर अभिषेकचे घरही ऐश्वर्याने सोडल्याचा खुलासा करण्यात आलाय. ऐश्वर्या राय ही काही दिवसांपूर्वीच विदेशात जाताना दिसली. मात्र, यावेळी ऐश्वर्या राय हिच्यासोबत तिची लेक आराध्या बच्चन हीच होती. अनेकदा ऐश्वर्या राय ही विदेशात जाताना दिसत आहे. परंतू एकटी किंवा मुलगी आराध्या बच्चनसोबतच ती जाते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे देखील सांगितले जात आहे. दोघे आता पूर्वीप्रमाणे एकत्र स्पॉट देखील होत नाहीत.
आता नुकताच अभिषेक बच्चन याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. अभिषेक बच्चन हा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पोहोचला. अभिषेक बच्चन याने स्टेडियममधील फोटो शेअर केलाय. यावेळी अभिषेक बच्चन याच्या हातामध्ये भारताचा झेंडा देखील दिसत आहे. मागे मैदान असून लोकही दिसत आहेत. या फोटोसोबतच अभिषेक बच्चन याने खास कॅप्शन शेअर केले आहे.
अभिषेक बच्चन याने लिहिले की, मी भारताला इथे रिप्रिजेंट करण्यासाठी आलोय…जय हिंद…आता अभिषेक बच्चन याची हीच पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय. अभिषेक बच्चन याच्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. जास्त करून या पोस्टनंतर सर्वजण अभिषेक बच्चन याला विचारत आहेत की, ऐश्वर्या कुठे आहे?
View this post on Instagram
एकाने या पोस्टवर कमेंट करत लिहिले की, अभिषेक ऐश्वर्या कुठे आहे? दुसऱ्याने लिहिले की, अभिषेक तू ऐश्वर्या आणि आराध्या यांना घेऊन का गेला नाहीस पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये. तिसऱ्याने लिहिले की, ऐश्वर्या कदाचित अभिषेकच्यासोबत असावी. मात्र, त्याने ऐश्वर्यासोबतचा फोटो शेअर केला नसावा. अजून एकाने लिहिले की, खरोखरच तुमचा घटस्फोट होतोय का?
मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य करत नाहीये. श्वेता बच्चन हिच्यामुळेच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील घटस्फोट होत असल्याचे सांगितले जातंय. श्वेता बच्चन ही बच्चन कुटुंबासोबतच जलसा या बंगल्यावर राहते. शिवाय काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्षा हा बंगलाही श्वेताच्या नावावर केला होता.
