AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई नर्गिसच्या निधनाच्या तीन वर्षानंतर संजय दत्तने ऐकला होता तिचा शेवटचा संदेश, धायमोकलून रडला अभिनेता!

1981 मध्ये संजय दत्तने 'रॉकी' चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अवघ्या तीन दिवस अगोदर संजूचे मातृछत्र हरपले होते. स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देणार्‍या अभिनेत्री नर्गिस यांनी 1981मध्ये या जगाचा निरोप घेतला होता.

आई नर्गिसच्या निधनाच्या तीन वर्षानंतर संजय दत्तने ऐकला होता तिचा शेवटचा संदेश, धायमोकलून रडला अभिनेता!
नर्गिस आणि संजय दत्त
| Edited By: | Updated on: Jun 01, 2021 | 4:25 PM
Share

मुंबई : एका आईसाठी तिची सर्व मुले समान असतात, परंतु तरीही असे म्हणतात की मुलगे हे त्यांच्या आईच्या जास्त जवळ असतात. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आणि त्याची आई नर्गिस दत्त (Nargis Dutt) यांच्यातही असेच संबंध होते. 1981 मध्ये संजय दत्तने ‘रॉकी’ चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अवघ्या तीन दिवस अगोदर संजूचे मातृछत्र हरपले होते. स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देणार्‍या अभिनेत्री नर्गिस यांनी 1981मध्ये या जगाचा निरोप घेतला होता. पण जाण्यापूर्वी त्यांनी संजय दत्तसाठी खूप काही सांगणारा, अर्थपूर्ण संदेश रेकॉर्ड केला होता. लेक संजय दत्तसाठी नर्गिसचा हा शेवटचा संदेश होता (Bollywood Actor Sanjay Dutt share emotional post for mother Nargis on her birth anniversary).

अनेकदा चित्रपटातील व्यक्तिरेखांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच काही काळापूर्वी संजय दत्तचा एक जुना व्हिडीओही बराच चर्चेत आला होता, ज्यामध्ये तो आपल्या आईच्या शेवटच्या मेसेजबद्दल बोलला होता. या व्हिडीओमध्ये संजय म्हणाला होता की, त्याची आई नर्गिस यांचे निधन झाले तेव्हा तो अजिबात रडला नाही. परंतु, जेव्हा त्याने त्याच्या आईच्या शेवटच्या मेसेजची टेप ऐकली, तेव्हा तो 4 ते 5 तास धायमोकलून रडला.

आई नर्गिसचा संजय दत्तसाठी अखेरचा निरोप

यासिर उस्मान यांनी संजय दत्तवर लिहिलेल्या ‘Sanjay Dutt: The Crazy Untold Story of Bollywood’s Bad Boy’ पुस्तकातही या घटनेचा उल्लेख केला आहे. यामध्ये संजय दत्तने सांगितले होते की, नर्गिसच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर त्याच्या मित्राने त्याला नर्गिस यांची ही टेप ऐकवली होती. ती ऐकून संजय दत्त खूप भावूक झाला होता. आईचे शेवटचे शब्द ऐकून तो स्वत:ला रडण्यापासून रोखूच शकला नाही, असे तो म्हणाला (Bollywood Actor Sanjay Dutt share emotional post for mother Nargis on her birth anniversary).

संजय दत्त ज्या ऑडिओ टेपबद्दल बोलत होता त्यात नर्गिस यांनी संजयला आपला शेवटचा निरोप सांगितला होता, तो असा की, ‘संजू, कुठल्याही इतर गोष्टीपेक्षा, तुझी नम्रता कायम ठेव. आपले चरित्र चांगले ठेवा. कधीही दिखावा करू नको. नेहमी नम्र राहा आणि नेहमीच वडीलधाऱ्यांचा आदर कर. हीच गोष्ट तुला खूप पुढे घेऊन जाईल आणि तीच तुला आपल्या कामात बळ देईल.’

आईच्या वाढदिवशी संजय दत्तची भावनिक पोस्ट

आज (1 जून) नर्गिस यांची जयंती आहे. या खास प्रसंगी संजय दत्तने आपल्या आईसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या ट्विटरवर संजय दत्तने आई नर्गिससोबत आपले काही फोटो शेअर केले आहेत. हे पोस्ट शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुझ्यासारखे कोणीही नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई…’

(Bollywood Actor Sanjay Dutt share emotional post for mother Nargis on her birth anniversary)

हेही वाचा :

Dhanush Jagame Thandhiram trailer | चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय धनुषचा गँगस्टर लूक, पाहा ‘जगमे थंदीरम’चा जबरदस्त ट्रेलर

Photo : ‘सकारात्मक ऊर्जेसाठी योगा उत्तम…’,अमृता खानविलकरचा फिटनेस मंत्रा

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.