कंगना राणावत हिच्या बहिणीचा संताप, रंगोली भडकली, थेट म्हणाली, खलिस्तानी कट..
कंगना राणावत सध्या तूफान चर्चेत आहे. कंगना राणावतची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे कंगना राणावत ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. कंगना राणावत हिच्यासोबत विमानतळावर एक अत्यंत हैराण करणारा प्रकार घडलाय.

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत ही चांगलीच चर्चेत आहे. कंगना राणावत हिच्यासोबत चंदीगड विमानतळावर एक अत्यंत हैराण करणारा प्रकार घडलाय. या घटनेनंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. कंगना राणावत ही चंदीगडहून दिल्लीला जाण्यासाठी निघाली होती. यावेळी चक्क सीआयएसएफ गार्ड महिलेने तिच्या कानाखाली लावली. यानंतर कंगना राणावत हिने नेमके काय घडले हे स्पष्ट सांगितले. हेच नाही तर कंगना राणावत हिच्याकडून हे स्पष्ट करण्यात आले की, आपण सुरक्षित आहोत. या घटनेचे काही व्हिडीओही व्हायरल होताना दिसले.
आता बाॅलिवूडनंतर कंगना राणावत ही राजकारणात उतरली आहे. कंगना राणावतने नुकताच लोकसभा निवडणूक मंडी येथून जिंकलीये. विशेष म्हणजे कंगना राणावत हिने निवडणूक मोठ्या लीडने जिंकली आहे. कंगना राणावत हिचे काही फोटोही व्हायरल होताना दिसले. या फोटोमध्ये कंगना राणावतच्या गालावर निशान देखील दिसला.
या प्रकारानंतर आता कंगना राणावत हिच्या बहिणीने कंगनाने शेअर केलेली पोस्ट रिशेअर करत मोठी पोस्ट लिहिली आहे. घडलेल्या प्रकारानंतर कंगना राणावत हिची बहिणी रंगोली ही चांगलीच संतापल्याचे बघायला मिळत आहे. आता रंगोली हिने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय.

रंगोली हिने म्हटले की, खलिस्तानी, तुमचा हा एकच दर्जा आहे. मागून कट आणि हल्ला. माझ्या बहिणीचा पाठीचा कणा खूप मजबूत आहे. स्टीलने बनलेला आहे. ते तुम्ही तोडू शकत नाहीत. ही परिस्थिती ती स्वतः हाताळेल. परंतू, आता तुमचे पंजाबचे काय होणार? शेतकरी आंदोलन हे खलिस्तानींचे अड्डे होते. आणखी एक गोष्ट म्हणजे ही सुरक्षेत अत्यंत मोठी चूक आहे आणि हे सिद्ध झाले.
खरोखरच असे व्हायला नको होते. या विरोधात आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे, असेही कंगना राणावत हिच्या बहिणीने म्हटले आहे. कंगना राणावत हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. कंगना राणावतची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. कंगना राणावत हिने अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिली आहेत. हेच नाही तर कंगना राणावत ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे.
