AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Disha Patani | शूटिंग संपली तरी गाडीच नाही, दिशा पाटनीची थेट ‘ऑटो स्वारी’!

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या आगामी ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या व्यस्त आहे. या चित्रपटात दिशा आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Disha Patani | शूटिंग संपली तरी गाडीच नाही, दिशा पाटनीची थेट ‘ऑटो स्वारी’!
दिशा पाटनी
| Edited By: | Updated on: Mar 13, 2021 | 9:04 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या आगामी ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या व्यस्त आहे. या चित्रपटात दिशा आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता चित्रपटाच्या सेटवरून काही खास फोटोही समोर आले आहेत. मात्र, आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे दिशाच्या ऑटो स्वारीची! हो.. कारण शूटिंग संपल्यानंतरही गाडी न आल्याने दिसणे थेट जवळ उभ्या असलेल्या रिक्षाची सवारी केली (Bollywood Actress Disha Patani takes Auto rickshaw ride goes viral on internet).

‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटाचे शूटिंग संपवून वाट बघत ताटकळत उभे राहण्यापेक्षा दिशाने चक्क ऑटो पकडून घरी जाण्याचा निर्णय घेतला. सध्या तिच्या रिक्षा सफरीचे काही फोटो सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आले आहेत.

मुंबईच्या वर्सोवा बीचवर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. या दरम्यान अभिनेता जॉन अब्राहम देखील तिथे उपस्थित होता. या दोघांचेही फोटो सध्या खूप चर्चेत आहेत. शूटिंगवरून परतत असली, तरी दिशाचा बोल्ड आणि स्टायलिश अंदाज यावेळी देखील पाहायला मिळाला. यावेळी दिशाने पिंक शॉर्ट्स आणि गुलाबी पुलओव्हर्स परिधान केल्या होत्या.

पाहा दिशाचा हा खास अंदाज

View this post on Instagram

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

(Bollywood Actress Disha Patani takes Auto rickshaw ride goes viral on internet)

सोशल मीडियावर चर्चा

आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती म्हणजे स्वत: ची आलिशान गाडी सोडून दिशा ऑटोने घरी का गेली? या प्रश्नावर दिशाचे चाहते वेगवेगळे अंदाज बाधताना दिसत आहेत. मात्र, दिशाची ही ऑटो स्वारी तिच्या चाहत्यांना आणि सर्वांनाच धक्का देणारी होती. विशेष म्हणजे कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शासनाने आखून दिलेले नियम पाळणाऱ्या दिशाने या प्रवासादरम्यान मास्क देखील परिधान केले होते (Bollywood Actress Disha Patani takes Auto rickshaw ride goes viral on internet).

‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दिशा पाटनी यांच्यासमवेत अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 11 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी ‘एक विलेन’ मध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता रितेश देशमुख महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते.

दिशाची डबल राऊंड हॉस किक चर्चेत

(Bollywood Actress Disha Patani takes Auto rickshaw ride goes viral on internet)

सध्या दिशा तिच्या वेगवेगळ्या व्हिडीओ आणि फोटोंमुळे चर्चेत आहे. नुकताच दिशा पाटनीने तिच्या इंस्टाग्राम वॉलवर एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती मार्शल आर्ट करताना दिसली होती. तिच्या या व्हिडीओचे चाहत्यांनी भरपूर कौतुक देखील केले होते. या व्हिडीओत दिशाने अतिशय कठीण अशी डबल राऊंड किक मारून दाखवली होती. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक दिशाचे तोंडभरून कौतुक करत आहेत. या पोस्टवरील एका कमेंटमध्ये एका वापरकर्त्याने दिशाचे कौतुक करताना लिहिले की, ‘ये लडकी है या आग’, तर दुसर्‍याने ‘वंडर वूमन’, असे लिहिले आहे. तर, कुणी ‘सो कूल’ लिहून तिच्या फिटनेसचे कौतुक केले आहे.

(Bollywood Actress Disha Patani takes Auto rickshaw ride goes viral on internet)

हेही वाचा :

Tanushree Dutta | ‘आशिक बनाया आपने’वर तनुश्री दत्ताचा दमदार डान्स, मनोरंजन विश्वात पुन्हा धमाका करण्यास तयार, पाहा Video

50 Years Of Anand | महानायक अमिताभ बच्चन यांना ओळख मिळवून देणारा चित्रपट ‘आनंद’, वाचा याचे खास किस्से…

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.