अमिताभ बच्चन यांच्यावर जया यांनी केला मोठा आरोप, पत्नीचे बोलणे ऐकून बिग बी हैराण…
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना ते दिसतात. जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर मोटा आरोप केलाय.

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या कायमच चर्चेत असतात. जया बच्चन यांंचा चाहतावर्ग मोठा आहे. बऱ्याचदा जया बच्चन या पापाराझी यांच्यावर चिडताना देखील दिसतात. याचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. विषय कोणताही असो जया बच्चन या स्पष्ट बोलताना दिसतात. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची लव्ह स्टोरी अत्यंत खास आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे शांत स्वभावाचे आणि जया बच्चन या रागीट स्वभावाच्या आहेत. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही दिसतात.
अमिताभ बच्चन हे गेल्या काही वर्षांपासून काैन बनेंगा करोडपतीच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. हेच नाही तर ते त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही बोलताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांच्या काैन बनेंगा करोडपतीच्या सेटवर जया बच्चन या पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांची मुलगी श्वेता बच्चन ही देखील उपस्थित होती.
जया बच्चन यांनी थेट अमिताभ बच्चन यांच्यासमोर मोठा खुलासा करत त्यांच्यावर एक गंभीर आरोपही केला. जया बच्चन या म्हणाल्या की, अमिताभ यांच्याकडे 5 ते 7 फोन आहेत. मात्र, कधीच ते फोन उचलत नाहीत. बऱ्याच वेळा काही गोष्टी घरामध्ये घडल्यानंतर ते मला म्हणतात की, इतकी मोठी घटना घरात झाली आणि तू मला काहीच सांगितले नाही?
अशावेळी मला फोन करायचा, मला त्याबद्दल सांगायला हवे. जया तुम्ही मला काहीच सांगत नाहीत. पण एखादी घटना झाल्यानंतर जर अमिताभ यांना फोन केला तरीही ते कधीच फोन उचलत नाहीत. जया बच्चन यांचे हे बोलणे ऐकून उपस्थित लोक हसताना दिसतात. विशेष म्हणजे मुलगी श्वेता आई जया बरोबर बोलत असल्याचे म्हणताना दिसत आहे.
यावेळी जया बच्चन या काही मोठे खुलासे करताना दिसल्या. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. विशेष म्हणजे त्यांनी या पोस्टमध्ये काही फोटो शेअर केले होते. हे फोटो काैन बनेंगा करोडपतीच्या सेटवरचे होते. काैन बनेंगा करोडपतीचे नवीन सीजन हे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
