AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor : करीना कपूरचं शिक्षण झालं तरी कुठे? बेबोची शैक्षणिक पात्रता तर…, जाणून व्हाल थक्क

Kareena Kapoor : अभिनेत्री करीना कपूर हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण अभिनेत्रीच्या शिक्षणाबद्दल आणि तिचं शिक्षण कुठे झालं याबद्दल फार कोणाला काही माहिती नाही... तर जाणून घ्या बेबोच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल

Kareena Kapoor : करीना कपूरचं शिक्षण झालं तरी कुठे? बेबोची शैक्षणिक पात्रता तर..., जाणून व्हाल थक्क
Kareena Kapoor
| Updated on: Sep 02, 2026 | 3:22 PM
Share

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर खान सध्या केवळ तिच्या सिनेमांमुळेच नाही, तर तिने निवडलेल्या भूमिकांमुळेही चर्चेत आहे. तिच्या आगामी ‘दायरा’ (Daira) या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, चाहते तिच्या या नवीन लूकचं खूप कौतुक करत आहेत. सध्या सर्वत्र करिना हिची चर्चा सुरु असताना, तिच्या शिक्षणाची देखील चर्चा रंगली आहे. करिना हिच्या शिक्षणाबद्दल फार कोणाला माहिती नाही. तर बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान भक्कम करणारी करिना किती आणि कुठे शिकली आहे जाणून घ्या.

करिना कपूर हिने सुरुवातीचं शिक्षण मुंबईतील जमनाबाई नसरी स्कूल येथून पूर्ण केलं. त्यानंतर आईच्या सांगण्यानंतर देहरादून येथील बोर्डिंग स्कूलमधून पुढचं शिक्षण घेतलं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करिना हिने मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये दोन वर्ष शिक्षण घेतलं. त्यानंतर विलेपार्ले येथून कॉमर्स विषयात शिक्षण घेतलं.

त्यानंतर करिना हिने हार्वर्ड यूनिव्हर्सिटी येथून मायक्रो कंप्यूटर्सचा तीन महिन्यांचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर अभिनेत्रीने तिचा मोर्चा वकिलीकडे वळवला आणि मुंबईतील गव्हर्नव्हेंट लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला… पण बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचं होतं, म्हणून तिने शिक्षण सोडून दिलं. एक वर्ष वकिलीचं शिक्षण घेतल्यानंतर करिनाने अभिनय शाळेत प्रवेश घेतला.

अभिनयाचे धडे गिरवत असताना, अभिनेत्रीला राकेश रोशन दिग्दर्शित ‘कहो ना प्यार है’ सिनेमासाठी विचारण्यात आलं. पण सिनेमात हृतिक रोशन याला कास्ट करण्यात आलं होतं आणि दिग्दर्शकाचा मुलगा म्हणून त्याला अधिक महत्त्व मिळालं असतं. याच कारणामुळे करिनाने सिनेमा करण्यास नकार दिला. त्यानंतर करिना हिने ‘रेफ्यूजी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमासाठी तिला फिल्मफेयर बेस्यट डेब्यू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर करिना हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

करिना हिने अनेक एकापेक्षा एक सिनेमे बॉलिवूडला दिले.  आजही करिना तिच्या भूमिकांमुळे चर्चेत असते. एक काळ असा देखील होता जेव्हा करिना  तिच्या अफेअर्समुळे देखील चर्चेत आली. अखेर अभिनेत्री अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत संसार थाटला. आज करिना पती आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

Follow Us
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंच्या वकिलांनी...
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंचे वकिल फिरवणार डाव? नेमक्या मुद्यावर युक्तिवाद
1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या
Mega Bharti | 1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या माहिती
वाशिममध्ये पावसाने दडी मारली; सोयाबीन-तूर सुकू लागली! शेतकऱ्यांवर...
वाशिममध्ये पावसाने दडी मारली; सोयाबीन-तूर सुकू लागली! शेतकऱ्यांवर मोठं संकट, 4-5 दिवसांत पाऊस नाही तर...
हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार!
Laxman Hake | हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार! लक्ष्मण हाकेंनी GR जाळून सरकारला सुनावलं
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे पुन्हा ठाकरे गटाला खिंडार पडणार? भाजपा नेत्याचा दावा काय?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा निकाल कधी? असीम सरोदे यांचं भाकीत काय?
Asim Sarode | शिवसेना पक्ष-चिन्हाचा निकाल कधी? असीम सरोदे यांचं भाकीत काय?
भुजबळांसह 3 मंत्र्यांचा ओबीसी उपसमितीच्या बैठकीतून बहिष्कार
OBC Reservation | ओबीसी उपसमितीच्या बैठकीत मोठा राडा! भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बैठकीतून बहिष्कार; निधीवरून सरकारला घेरलं
शिवसेना कुणाची? आज शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार; थेट...
शिवसेना कुणाची? आज शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार; थेट...
महागाईचा भडका कष्टकऱ्यांचं कंबरडं मोडलं; सुळेंनी सरकारला घेरलं
Supriya Sule | सण तोंडावर, महागाईचा भडका! कष्टकऱ्यांचं कंबरडं मोडलं; सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरलं
ठाकरे गटाची बाजू... शिवसेना सुनावणी आधीच मोठा धमाका? बड्या वकिलाचं...
ठाकरे गटाची बाजू... शिवसेना सुनावणी आधीच मोठा धमाका? बड्या वकिलाचं विधान चर्चेत