AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena Symbol Hearing : 2018च्या पक्ष घटनेचा मुद्दा खोडला, शिंदे गटाच्या वकिलाचा घाम फोडणारा युक्तिवाद काय?

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षफुटीच्या सुनावणीदरम्यान, शिंदे गटाच्या वकिलांनी 2018 च्या पक्षघटनेला जोरदार आव्हान दिले. ठाकरे गटाचा 'एस्टॉपेल'चा युक्तिवाद खोडून काढत, बहुमत ठरवण्यात निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर भर दिला. पक्षघटना लोकशाही मूल्यांवर आधारित असणे आवश्यक आहे, या निवडणूक आयोगाच्या सूचना महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी न्यायालयासमोर मांडले.

Shivsena Symbol Hearing : 2018च्या पक्ष घटनेचा मुद्दा खोडला, शिंदे गटाच्या वकिलाचा घाम फोडणारा युक्तिवाद काय?
eknath shinde vs uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 02, 2026 | 3:26 PM
Share

एकनाथ शिंदे हे 2018च्या पक्ष घटनेनुसारच नियुक्त झाले आहेत. त्याचे त्यांनी फायदेही घेतले आहेत. आज मात्र ते तीच घटना फेटाळून लावत आहेत. त्याच घटनेला आव्हान देत आहेत, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे. सिब्बल यांचा हा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी फेटाळून लावला आहे. पूर्वी अमूक गोष्ट घडली होती म्हणून आता त्या गोष्टीवर बोलण्यास प्रतिबंध करता येणार नाही. हा ‘एस्टॉपेल’चा मुद्दा नाही, असा युक्तिवाद नीरज कौल यांनी केला आहे. शिंदे गटाच्या वकिलाने घाम फोडणारा युक्तिवाद केल्याने आता या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू झाली आहे. या आधी नऊ दिवस ठाकरे गटाच्या वकिलाने युक्तिवाद केला होता. आज शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू कोर्टात मांडली. यावेळी त्यांनी 2018च्या घटनेच्या मुद्द्यालाच हात घातला. 2018च्या पक्षाच्या घटनेत नमूद केलेल्या पदांपैकी एका पदावर तुम्ही कार्यरत होता हा एकमेव आरोप आमच्यावर केला जात आहे. मात्र, हा ‘एस्टॉपेल’चा (पूर्वीच्या भूमिकेमुळे आता वेगळी भूमिका घेण्यास प्रतिबंध) मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की, बहुमत कोणाचे आहे हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोग वापरत आहे, असं नीरज कौल यांनी म्हटलं आहे.

म्हणून निवडणूक आयोगाच्या सूचना

निवडणूक आयोगाने पक्षाच्या घटनेचा विचार करण्याचं एक अज्ञात अधिकारक्षेत्र स्वतः निर्माण केलं आहे, यावर आमचा युक्तिवाद आधारलेला आहे. 1994 पासून निवडणूक आयोगाने विविध आदेशांद्वारे आणि पत्रव्यवहारातून सर्व राजकीय पक्षांना काही सूचना केल्या होत्या. प्रत्येक पक्षाने त्यांच्या पक्षघटना लोकशाही पद्धतीच्या असल्या पाहिजेत, अशा सूचना निवडणूक आयोगाने केल्या होत्या. जर पक्षात मनमानी किंवा अनियंत्रित कारभार असेल, तर बहुमत कोणाचे हे आपण कसे ठरवणार? यासाठी या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या, याकडे कौल यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं.

त्यानंतर घटना अस्तित्वात आली

राजकीय पक्षांमध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत आणि केवळ एक-दोन सदस्यांनी बहुसंख्य सदस्यांची नियुक्ती करू नये. राजकीय पक्षांनी आपल्या पक्षघटना लोकशाही पद्धतीच्या असल्याची खात्री करणे आवश्यक आहे, असं निवडणूक आयोगाने पूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्यानंतर एका टप्प्यावर शिवसेना निवडणूक आयोगाकडे आली. आमच्या पक्षाच्या घटनेत निवडणुकीची तरतूद नसल्याचं त्यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं. त्यावेळी निवडणूक आयोगाने शिवसेनेला समजावून सांगितलं आणि त्यानंतर शिवसेनेने सुधारीत पक्ष घटना तयार केली, असं कौल म्हणाले.

अचानक घटनेचं स्वरुप कसे बदलले?

मात्र, अचानक 2018मध्ये एक नवीन पक्ष घटना उदयास आली. 1999 मध्ये निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या पक्षघटनेने पक्षाचे जे लोकशाही स्वरूप निश्चित केले होते, ते 2018 च्या पक्षघटनेने पूर्णपणे कसे बदलले? यावर त्यांचा एकमेव बचाव असा आहे की, त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाला माहिती दिली होती. मात्र, निवडणूक आयोगाने स्पष्टपणे निष्कर्ष नोंदवला आहे की, ही पक्षघटना आमच्याकडे उपलब्ध नाही आणि ती आमच्याकडे कधीही नोंदणीकृत करण्यात आलेली नव्हती, असा दावा त्यांनी केला. तसेच ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आलं होतं. त्यात काही नियुक्त्या झाल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्यांनी या कागदासोबत 2018ची घटना जोडली होती, असं काहीच आढळून आलेलं नाही. त्यामुळे ठाकरे गटाचे दावे निराधार आहेत, असा दावाही त्यांनी केला.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा