करीना कपूर हिने बाथरूममध्ये लावला थेट सलमान खानचा फोटो, मोठा खुलासा, करिश्मा हिने…
अभिनेता सलमान खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे सलमान खानचे चित्रपट धमाका करताना दिसतात. करीना कपूर आणि सलमान खान यांची जोडी अनेक चित्रपटांमध्ये जबरदस्त कामगिरी करताना दिसलीये. सलमान खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खानचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे सलमान खानचा हा चित्रपट धमाका करताना दिसला. या चित्रपटातून श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी आणि शहनाज गिल यांनी बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. विशेष म्हणजे सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहे. शिवाय बिग बॉस हिंदीला देखील सलमान खान होस्ट करताना दिसतो. सलमान खान याचा अभिनय नाही तर त्याचे खासगी आयुष्यही चर्चेत राहते. सलमान खानने बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना डेट केलंय.
सलमान खानचे वय 58 आहे. मात्र, अजूनही त्याने लग्न केले नाहीये. नेहमीच चाहत्यांकडून सलमान खानला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारले जातात. सलमान खान आणि करीना कपूर यांनी काही चित्रपटांमध्ये स्क्रिन शेअर केलीये. विशेष म्हणजे यांचे चित्रपट धमाका करताना दिसले. चक्क सलमान खान याच्यासमोर करिश्मा कपूर हिने बहीण करीना कपूर हिची मोठी पोलखोल केली.
त्याचे झाले असे की, करिश्मा कपूर सोनी टीव्हीवरील दस का दम सीजन 2 मध्ये बहीण करीनासोबत पोहोचली होती. विशेष म्हणजे त्यावेळी सलमान खान हा शो होस्ट करत. सलमान खान म्हणाला की, करिश्माने मला एकदा सांगितले होते की, माझी लहान बहीण करीनाने तुझे पोस्टर आणि फोटो तिच्या बाथरूममध्ये लावला आहे.
करिश्माचे हे बोलणे ऐकून मला खूप जास्त आनंद झाला. त्यानंतर काही महिन्यांनी राहुल रॉयचा आशिकी चित्रपट आला. यानंतर करिनाने बाथरूममधून माझा फोटो काढला आणि ते पोस्टर देखील काढून दुसऱ्याचा फोटो लावला. हेच नाही तर सेटवर आल्यानंतर मला ही गोष्ट देखील सांगण्यात आली. यावर करिश्मा आणि करीना दोघीही हसताना दिसल्या. करीना कपूर ही सलमान खानची चाहती होती आणि अनेक वर्ष तिच्या बाथरूममध्ये सलमान खानचा फोटो लावण्यात आला होता.
करीना कपूर आणि सलमान खान यांची जोडी चाहत्यांना कायमच आवडते. विशेष म्हणजे यांच्या जोडीने धमाका केलाय. बजरंगी भाईजान या चित्रपटात दोघांनी धमाकेदार भूमिका केली. करीना कपूर आणि सलमान खान यांना परत एकदा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. करीना ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओही शेअर करताना दिसते.
