आता नको आई पप्पा आहेत… सोनाक्षी सिन्हा हिची कॅमेऱ्यासमोरच विनंती, अभिनेत्रीने थेट..
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न झाल्यापासून अभिनेत्री फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. आपल्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे करताना अभिनेत्री दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा लग्नाच्या काही महिन्यानंतर तिच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य करताना दिसत आहे. सोनाक्षीने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे सोनाक्षीचा बिनधास्त स्वभाव लोकांना प्रचंड आवडतो. सोनाक्षीने एका मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच खुलासा केला की, तिने जहीर इक्बाल याच्यासोबतचे नाते तब्बल तीन वर्ष सर्वांपासून लपून ठेवले होते. हेच नाही तर तिने आई वडिलांना देखील याबद्दल सांगितले नव्हते. जोपर्यंत तिच्या मनाची पूर्ण तयारी झाली नव्हती, तोपर्यंत तिने कोणालाही काहीही सांगितले नव्हते. काही वर्ष डेट केल्यानंतर सोनाक्षीने जहीर इक्बालसोबत लग्न केले. मात्र, सुरूवातीला लोकांनी सोनाक्षीला यावरून खडेबोल सुनावले होते. सोनाक्षी आणि जहीर इक्बाल यांनी सिव्हिल मॅरेज केले.
सोनाक्षी हिने स्पष्ट सांगितले की, लग्न ठरल्यानंतर जहीरने मला म्हटले होते की, आपण बाहेर राहू.. मी त्याला म्हटले, तुला बाहेर राहायचे असेल तर राहा मी तर तुझ्या घरी आई वडिलांसोबतच राहिल. सोनाक्षी जहीर इक्बालसोबत त्याच्या कुटुंबासोबतच राहते. सोनाक्षीने सांगितले की, जहीर इक्बाल याच्या कुटुंबासोबत ती चांगला वेळ घालवते आणि त्यांच्यासोबत कायमच फिरायला देखील जाते. सासूसोबतच्या नात्यावरही ती बोलताना दिसली.
नुकताच सोनाक्षी सिन्हा सासू आणि सासऱ्यांसोबत स्पॉट झाली. यादरम्यान सोनाक्षीला पाहून लगेचच तिथे पापाराझी पोहोचले. सोनाक्षी सिन्हा हिला पाहून त्यांनी फोटो आणि व्हिडीओ काढण्यास सुरूवात केली. यावेळी सोनाक्षी सिन्हा फोटोसाठी आणि व्हिडीओसाठी मनाई करताना दिसली. तिने म्हटले की, आता नको आई पप्पा आहेत.. समजून घ्या थोडे…
आता सोनाक्षी सिन्हा हिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. यादरम्यान सोनाक्षी सिन्हा हिचे सासरे तिच्यासोबत दिसत आहेत. सलमान खान आणि सोनाक्षीचे सासरे चांगले मित्र आहेत. जहीर इक्बाल याला सलमान खान यानेच चित्रपटात काम करण्याची संधी दिली. सोनाक्षी सिन्हाचे सासरे मोठे व्यापारी आहेत.
