Shashi Kapoor | ‘आवरा’मधून मनोरंजन विश्वात पदार्पण करणाऱ्या ‘हँडसम हंक’ शशी कपूर यांना ‘या’ निर्मात्याची वाटायची भीती, वाचा किस्सा…

ऊ राज कपूर यांच्या 1951मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आवारा’ या चित्रपटाद्वारे शशी कपूर यांनी बाल कलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

Shashi Kapoor | ‘आवरा’मधून मनोरंजन विश्वात पदार्पण करणाऱ्या ‘हँडसम हंक’ शशी कपूर यांना ‘या’ निर्मात्याची वाटायची भीती, वाचा किस्सा...
शशी कपूर
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 11:46 AM

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते शशी कपूर (Shashi Kapoor) अशा कलाकारांमध्ये गणले जात होते, ज्यांचे कधीही कोणाशीही प्रेमसंबंध चर्चेत नव्हते किंवा कोणाशीही कोणत्याही प्रकारची इतर दुषणे त्यांच्या नावाशी जोडलेली नव्हती. शशी कपूर यांना कपूर कुटुंबाचा देखणा ‘कपूर’ म्हटले जाई. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर थिएटर कलाकार होते, तसेच त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले होते. शशी कपूर यांचे भाऊ राज कपूर (Raj Kapoor) आणि शम्मी कपूर (Shammi Kapoor) यांनीही त्यांच्या वडीलांचे क्षेत्र अर्थात अभिनयालाच निवडले. अशावेळी शशी कपूर कसे बरं मागे राहणार…(Bollywood legendary actor Shashi Kapoor Birth Anniversary special story)

भाऊ राज कपूर यांच्या 1951मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आवारा’ या चित्रपटाद्वारे शशी कपूर यांनी बाल कलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. इतकेच नाही, तर शशी कपूर यांनी राज कपूर यांच्यासोबत सहाय्यक म्हणून देखील काम केले होते. 1961मध्ये चोपडा प्रॉडक्शन हाऊसच्या ‘धर्मपुत्र’ या चित्रपटाच्या माध्यमातून शशी कपूर यांनी नायक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तथापि, बिमल रॉय यांच्या 1962च्या ‘प्रेम पत्र’ या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. आपल्या चित्रपट कारकीर्दीत शशी कपूर यांनी अनेक नामांकित चित्रपट निर्मात्यांसोबत केले. यापैकी एक नाव म्हणजे मनमोहन देसाई, जे एक कुशल निर्माता देखील होते.

शशी यांना वाटायची मनमोहन देसाईंची भीती

मनमोहन देसाई यांच्याशी शशी कपूर यांचे व्यावसायिक आणि कौटुंबिक संबंध होते. तथापि, शशी कपूर अनेकदा म्हणायचे की, मनमोहन आपल्याला मारू इच्छित आहेत. शशी कपूर असे का म्हणायचे याचा खुलासा मनमोहन देसाई यांनी त्यांच्या चरित्रात केला आहे. मनमोहन देसाई यांनी त्यांच्या आणि शशी यांच्या नात्याबद्दल बर्‍याच गोष्टींचा उल्लेख या पुस्तकात केला आहे. त्याचवेळी त्यांनी त्या मजेदार किस्स्याचाही उल्लेखही केला, ज्यामुळे शशी म्हणत असत की, मनमोहन देसाई आपल्याला जिवे मारणार आहेत.

‘हे’ होते कारण!

शशी कपूर यांनी 1973 मध्ये आलेल्या फिल्म ‘आ गले लगा जा’ आणि 1979च्या ‘सुहाग’ या चित्रपटात मनमोहन देसाई यांच्याबरोबर काम केले होते. पुस्तकात त्यांनी असे म्हटले की शशी कपूर वाटायचे की, जेव्हा मनमोहन देसाई आपल्या एखाद्या कलाकाराला अतिशय धोकादायक स्टंट करताना पहायचे, तेव्हा त्यांना मजा यायची. एवढेच नाही, तर त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीत मनमोहन देसाई यांच्यासाठी जेवढे धोकादायक स्टंट्स केले तेव्हढे त्यांनी इतर कोणासाठी कधीच केले नसल्याचे नमूद केले आहे (Bollywood legendary actor Shashi Kapoor Birth Anniversary special story)

मनमोहनच्या दिशेने फेकला चाकू

मनमोहन देसाई यांच्या चित्रपटाच्या शूटिंगचा संदर्भ देताना त्यांनी लिहिले की, ‘आ गेल लग जा’ चित्रपटाच्या शेवटच्या स्टंट सीनचे शूटिंग चालू आहे. दृश्य असे होते की, त्याने स्केट परिधान केले आहेत आणि प्रत्येक बाजूला आग लागली आहे. या सीनमध्ये शशी यांना चाकूने मारामारी करायाची होती. त्यावेळी मनमोहन देसाई यांनी त्यांना सांगितले की, तुम्ही हा सीन खऱ्या चाकूने करायचा आहे. हे ऐकून शशी कपूर यांनी नकार दिला. मनमोहन बराच काळ त्यांची समजूत काढत राहिले. शशी कपूर यांनी त्यांना सांगितले की, मी स्केट घातले आहेत आणि अशावेळी खरा चाकू कोणालाही लागू शकतो.

यावर मनमोहन यांनी त्यांना चक्क ‘डरपोक’ म्हटले होते. मात्र, जेव्हा शशी कपूर यांना वाटले की, मनमोहन आपला मुद्दा समजत नाहीयत, तेव्हा त्यांनी मनमोहनच्या दिशेनेच चाकू फेकला. तथापि, तो चाकू त्यांनी अतिशय हळू फेकला होता. त्यावेळी घाबरलेले मनमोहन म्हणाले, ‘हे तू काय करतो आहेस, मी मरेन अशाने’. मग शशी कपूर म्हणाले की, ‘मीसुद्धा इतका वेळ हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो.’

आता मी तुझ्या बरोबर कामच करणार नाही!

हा एकच सीन नाही, तर असे अनेक धोकादायक स्टंट मनमोहन देसाई यांनी शशी कपूर यांच्याकडून करू घेतले होते. एकमध्ये तर शशी कपूर यांच्या बॉडी डबल असणाऱ्या व्यक्तीच्या डोक्याला 60 टाके पडले होते. यानंतर, शशी कपूर मनमोहन देसाई यांच्याकडे गेले आणि थेट त्यांना म्हणाले की, ‘तुला मला मारून टाकावेसे वाटते, म्हणूनच तर प्रत्येक वेळी मला असे प्राणघातक स्टंट करायला लावतोस. आता मी तुमच्याबरोबर अ‍ॅक्शन सीक्वेन्स तर दूर, कधीही कोणताही चित्रपट करणार नाही.’

(Bollywood legendary actor Shashi Kapoor Birth Anniversary special story)

हेही वाचा :

Video | ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर थिरकण्यासाठी पूजा सावंतने घेतली ‘इतकी’ मेहनत, पाहा व्हिडीओ…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.