AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vishal Anand | ‘चलते चलते’ फेम अभिनेता विशाल आनंद काळाच्या पडद्याआड

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विशाल आनंद यांचे दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. (Bollywood actor Vishal Anand passed away) 

Vishal Anand | 'चलते चलते' फेम अभिनेता विशाल आनंद काळाच्या पडद्याआड
| Updated on: Oct 06, 2020 | 8:47 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विशाल आनंद (Vishal Anand) यांचे दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. ‘चलते चलते’ या प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी काम केले होते. अभिनयाशिवाय त्यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते. व्यवसाय विश्लेषक गिरीश जौहर (Girish Johar) यांनी ट्विट करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. (Bollywood actor Vishal Anand passed away)

“आणखी एक दुख:द बातमी… विशाल आनंद काळाच्या पडद्याआड, ‘चलते चलते’, दिल से मिले दिल’ ही गाणी सदैव लक्षात राहतील,” असे ट्विट गिरीश जोहर यांनी केले.

विशाल आनंद गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांचे रविवारी 4 ऑक्टोबरला निधन झाले. प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांचे ते भाचे होते. विशाल आनंद यांचे खरे नाव भिष्म कोहली. त्यांनी चलते चलते या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी स्वत: केले होते.

त्यासोबतच ‘इंतजार’, ‘सारेगामापा’, ‘दिल से मिले दिल’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’ आणि ‘किस्मत’ इत्यादी चित्रपटातून  चित्रपटातही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांनी जवळपास 11 हिंदी चित्रपटात काम केले होते.

विशाल आनंद यांना 1976 मधील चलते चलते चित्रपटासाठी ओळखले जाते. ”चलते-चलते मेरे यह गीत याद रखना” हे गाणं आताही तितकंच लोकप्रिय आहे. या गाण्यामुळे प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. चलते चलते या चित्रपटात अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनी त्यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती.(Bollywood actor Vishal Anand passed away)

संबंधित बातम्या : 

BellBottom Teaser | बहुप्रतीक्षित ‘बेलबॉटम’चा टीझर प्रदर्शित, अक्षय कुमार पुन्हा ‘खिलाडी’ अंदाजात!

Tamannaah Bhatia | ‘बाहुबली’ अभिनेत्री तमन्ना भाटियाला कोरोनाची लागण, हैद्राबादच्या रुग्णालयात दाखल

गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय.
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.