चक्क नॅशनल टीव्हीवर ‘बोनी कपूर’ने सांगितले जान्हवी कपूर हिचे बाथरूम सीक्रेट
जान्हवी आणि बोनी कपूर हे द कपिल शर्मा शोमध्ये मिली चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आले होते.

मुंबई : कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये जान्हवी कपूर आणि बोनी कपूर यांनी हजेरी लावलीये. सोशल मीडियावर याचे काही प्रोमो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूर तिच्या मिली चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबरला रिलीज होतोय. विशेष म्हणजे स्वत: बोनी कपूर यांनीच या चित्रपटाची निर्मिती केलीये. या चित्रपटात जान्हवीच मुख्य भूमिकेत असणार आहे. बाप- लेकीची जोडी बाॅक्स आॅफिसवर काय धमाका करते हे पाहण्यासारखेच ठरणार आहे.
View this post on Instagram
जान्हवी आणि बोनी कपूर हे द कपिल शर्मा शोमध्ये मिली चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आले होते. यावेळी जान्हवीने बोनी कपूर यांचे अनेक राज शेअर केले. इतकेच नाही तर जान्हवीने द कपिल शर्माच्या शोमध्ये हवा हवाई या श्रीदेवीच्या गाण्यावर जबरदस्त असा डान्सही केला. जान्हवीचा डान्स पाहून सर्वांना यावेळी श्रीदेवीची आठवण आली.
कपिल विचारतो की, तुमच्या घरी पंजाबी जेवण तयार होते की, साऊथ इंडियन. यावर जान्हवी म्हणते की, आमच्या घरी साउथ इंडियन आणि पंजाबी असे दोन्हीही प्रकारचे जेवण तयार होते. इतकेच नाही तर पापा (बोनी कपूर) यांना साऊथ इंडियन जेवण जास्त आवडते.
View this post on Instagram
यावेळी बोनी कपूर जान्हवी कपूरचे काही राज खोलताना दिसले. बोनी कपूर म्हणाले की, मी जेंव्हा जेंव्हा जान्हवीच्या रूममध्ये जातो, त्यावेळी तिच्या रूममध्ये कपडे वगैरे पडलेले असतात. इतकेच नाही तर ती टूथपेस्टचे झाकणही उघडे ठेवते. पुढे बोनी कपूर म्हणतात की, हीच मोठी गोष्ट आहे की, ती स्वत: फ्लश करते…हे ऐकून जान्हवी जोरात पापा…म्हणते. जान्हवी आणि बोनी कपूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
