नागा चैतन्यशी घटस्फोट, अभिनेत्री समंथाने पुन्हा एकदा बदललं सोशल मीडियावरील नाव!

दक्षिणात्य अभिनेत्री समंथा (Samantha RuthPrabhu) हिने पती नागा चैतन्यपासून (Naga Chaitanya) वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. समंथा हिने शनिवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना नागापासून वेगळे झाल्याची माहिती दिली होती.

नागा चैतन्यशी घटस्फोट, अभिनेत्री समंथाने पुन्हा एकदा बदललं सोशल मीडियावरील नाव!
Samantha

मुंबई :  दक्षिणात्य अभिनेत्री समंथा (Samantha RuthPrabhu) हिने पती नागा चैतन्यपासून (Naga Chaitanya) वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. समंथा हिने शनिवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना नागापासून वेगळे झाल्याची माहिती दिली होती. नागापासून विभक्त झाल्यानंतर समंथाने आता सोशल मीडियावर तिचे नाव बदलले आहे.

समंथाने काही काळापूर्वी देखील सोशल मीडियावरील तिचे नाव बदलले होते. काही काळापूर्वी तिने सोशल मीडियावर तिचे नाव बदलून ‘एस’ केले होते, त्यानंतर नागा आणि त्याच्यातील दुरावाच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या.

समंथाने बदलले नाव बदलले

सामंताने सोशल मीडियावर तिचे नाव बदलून ‘समंथा प्रभू रुथ ऑफिशियल’ असे केले आहे. नागापासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने केलेली ही पहिली गोष्ट आहे.

सोशल मीडियावर दिली घटस्फोटाची माहिती

समंथा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून नागापासून वेगळे झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यात तिने लिहिले होते की, आमच्या सर्व हितचिंतकांनो, खूप विचारविनिमयानंतर, चाय आणि मी पती-पत्नी म्हणून आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की, आमची मैत्री दहा वर्षांपेक्षा जास्त आहे जी आमच्या नात्याचा आधार होती. जी आमच्यामध्ये नेहमीच एक विशेष नाते ठेवेल. आम्ही आमच्या चाहत्यांना, माध्यमांना आणि हितचिंतकांना विनंती करतो की, या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रायव्हसी द्या. आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार.

नागार्जुनने शेअर केल्या भावना

नागा आणि सामंथा यांच्या विभक्त झाल्याची माहिती मिळाल्यानंतर नागार्जुनने आपले वक्तव्य सोशल मीडियावर शेअर केले. त्यांनी म्हटले होते की, समंथा आपल्या कुटुंबासाठी नेहमीच खास राहील. नागार्जुनने लिहिले – जड अंतःकरणाने मला हे सांगायचे आहे. सॅम आणि चाय यांच्यात जे काही घडले ते दुर्दैवी होते. पती -पत्नीमध्ये जे काही घडले ते अत्यंत वैयक्तिक आहे. सॅम आणि चाय दोघेही माझे प्रिय आहेत. मी सॅमसोबत घालवलेले क्षण माझे कुटुंब नेहमी लक्षात ठेवेल आणि ती नेहमीच आमच्यासाठी खास राहील.

समंथा आणि नागा 2017 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. अलीकडेच, समंथा हैदराबादहून मुंबईला स्थलांतरित झाल्याच्या बातम्या आल्या. ज्याला समंथाने अफवा म्हटले होते.

समुपदेशनही निष्फळ

अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा अक्किनेनी यांनाही त्यांचे लग्न वाचवायचे होते, यामुळे त्यांनी समुपदेशन घेण्याचा निर्णय घेतला, पण त्याचाही विशेष फायदा झाला असे वाटत नाही. हे जोडपे त्यांच्या लग्नासंदर्भात माध्यमांमध्ये सुरू असलेल्या कोणत्याही बातमीला कोणतेही उत्तर देत नाही. याचा अर्थ असा की, माध्यमांमध्ये लिहिल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी एक प्रकारे बरोबर आहेत. दोघांच्या कौटुंबिक न्यायालयात समुपदेशन देखील केले गेले आहे, परंतु तरीही या जोडप्याला एकमेकांपासून वेगळे व्हायचे आहे.

हेही वाचा :

शाहरुखचा लेक अडचणीत, बॉलिवूड ‘किंग खान’च्या समर्थनात पुढे आली अभिनेत्री, म्हणाली…

शाहरुखच्या मानगुटीवर ते वानखेडे ते आताचे हे वानखेडे, का होतोय फोटो व्हायरल?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI