AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guess Who : जया बच्चन यांच्या मांडीवर बसलेला ‘हा’ चिमुकला आहे मोठा स्टारकिड, ओळखलंत का?

या चित्रपटात त्यानं लहानपणीच्या शाहरुख खानची भूमिका साकारली होती. तर तुम्ही या क्यूट स्टारकिडला ओळखू शकता का? चला तर मग आपण त्याच्याबाबत जाणून घेऊया.

Guess Who : जया बच्चन यांच्या मांडीवर बसलेला 'हा' चिमुकला आहे मोठा स्टारकिड, ओळखलंत का?
| Updated on: May 22, 2023 | 9:42 PM
Share

मुंबई : सध्या सोशल मीडियावर अनेक मोठ्या बॉलिवूड स्टार्सचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण बर्‍याचदा नेटकऱ्यांना ते स्टार्स कोण आहेत हे ओळखता येत नाही. आताही एका बॉलिवूड स्टारकिडचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या मांडीवर बसलेला दिसत आहे.

जया बच्चन यांच्यासोबत असलेल्या या स्टारकिडचा फोटो ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात या स्टारकिडचा रोल छोटाच होता पण त्याच्या क्यूटनेसमुळे त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या चित्रपटात त्यानं लहानपणीच्या शाहरुख खानची भूमिका साकारली होती. तर तुम्ही या क्यूट स्टारकिडला ओळखू शकता का? चला तर मग आपण त्याच्याबाबत जाणून घेऊया.

करण जौहरचा कभी खुशी कभी गम या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली होती. तर आता याच चित्रपटातील जया बच्चन आणि त्यांच्या मांडीवर बसलेल्या स्टारकिडचा फोटो चर्चेत आहे. विशेष सांगायचं झालं तर फोटोतील या स्टारकिडचं शाहरुख खानशी विशेष नातं आहे.

View this post on Instagram

A post shared by Aryan Khan ? (@aryan.k__12)

जर तुम्ही या स्टारकिडला ओळखलं नसेल तर हा स्टारकिड दुसरा तिसरा कोणी नसून शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान आहे. आर्यन खानने या चित्रपटात शाहरुख खानच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. तसंच आता आर्यन खान मोठा झाला असून सध्या तो लूकच्या बाबतीत सेम शाहरुखसारखाच दिसतोय.

आर्यन खान मागे ड्रग्ज प्रकरणात सापडल्याने चर्चेत आला होता. या प्रकरणामध्ये त्याला जेलमध्येही जावं लागलं होतं. मात्र काही दिवसांनंतर कोर्टाडून त्याची निर्दोष मुक्तता झाली. यामधील अधिकारी समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईवरून त्यांच्यावरच अनेकांनी टीका केली होती.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.