शेवटच्या काळात कर्जबाजारी झाल्या होत्या मीना कुमारी, कर्जमुक्त होण्यासाठी राहता बंगलाच देण्याचा निर्णय घेतला!

'बच्चो का खेल' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री मीना कुमारी यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चे हक्काचे स्थान निर्माण केले होते. मीना कुमारी एक चांगल्या अभिनेत्री तर होत्याच, पण त्या खूप चांगल्या नर्तिकाही होत्या. मीना कुमारी यांनी बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावले.

शेवटच्या काळात कर्जबाजारी झाल्या होत्या मीना कुमारी, कर्जमुक्त होण्यासाठी राहता बंगलाच देण्याचा निर्णय घेतला!
Meena Kumari
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 9:49 AM

मुंबई : ‘बच्चो का खेल’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री मीना कुमारी यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चे हक्काचे स्थान निर्माण केले होते. मीना कुमारी एक चांगल्या अभिनेत्री तर होत्याच, पण त्या खूप चांगल्या नर्तिकाही होत्या. मीना कुमारी यांनी बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावले. त्यांनी आयुष्यात खूप काही मिळवले. मात्र, त्यांच्या आयुष्यात एक अशी वेळ आली, जेव्हा अभिनेत्रीच्या आयुष्यात खूप अडचणी आल्या. एवढेच नाही, तर त्या अभिनेत्री मुमताज यांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या गेल्या.

मुमताज यांनी मीना कुमारी यांना वाईट काळात खूप मदत केली. मात्र, मीना कुमारी यांनी हे कर्ज फेडण्यासाठी त्यांच्या नावावर आलिशान बंगला दिला होता. एका मीडिया रिपोर्टनुसार, मुमताजने मीना कुमारी यांच्या ‘गोमती के किनरे’ या चित्रपटात काम केले होते. पण, मीना कुमारी यांची प्रकृती खालावल्याने त्या मुमताज यांना मानधन देऊ शकल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर तीन लाख रुपयांचे कर्ज झाले होते.

मुमताज यांनी कधीच उल्लेख केला नाही!

तरीही मुमताजने मीना कुमारीला याबद्दल कधीही सांगितले नाही. पण मीना कुमारी यांनी मुमताजचे कर्ज फेडण्याचा निर्धार केला होता. मीना कुमारी यांच्या आयुष्यात एक वेळ आली, जेव्हा त्या खूप आजारी पडल्या होती, तेव्हा त्यांनी मुमताजला फोन केला आणि म्हणाल्या की, आता माझ्या आयुष्यावर विश्वास नाही.

मीना कुमारी यांनी आपल्या आलिशान बंगल्यात मुमताजला बोलावून त्यांच्या आयुष्यातील मौल्यवान वस्तू त्यांना दिली. मीना कुमारी मुमताजला म्हणाल्या, ‘माझ्याकडे तुझे तीन लाख रुपये शिल्लक आहेत, त्या बदल्यात मी तुला माझा कार्टर रोडवर असलेला बंगला देतेय’. याचा उल्लेख मुमताज यांचा भाऊ शाहरुख अकारी याने प्रसारमाध्यमांशी खास संवाद साधताना केला होता. ते अजूनही त्याच बंगल्यात राहतात, असे त्यांनी सांगितले.

कॅन्सरशी झुंज देत होत्या मीना कुमारी

मीना कुमारी बर्‍याच काळापासून कॅन्सरशी झुंज देत होत्या आणि त्यांना सतत खोकल्यातून रक्त येत होते. खान अस्करी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या एका खास मुलाखतीत सांगितले की, बरेच दिवस आजारी असल्यामुळे त्यांनी एक दिवस मुमताजला आपल्या घरी बोलावले आणि राहता बंगला त्यांच्या नावावर केला. असे म्हटले जाते की, मीना कुमारी फार शिक्षित नव्हत्या, त्यामुळे त्यांच्या कमाईचा रेकॉर्ड त्यांच्याकडे नव्हता.

31 मार्च रोजी घेतला जगाचा निरोप

दीर्घकाळ आजाराशी झुंज देणाऱ्या मीना कुमारी यांनी 31 मार्च 1972 रोजी या जगाचा निरोप घेतला. आयुष्याच्या शेवटच्या दिवसात मीना कुमारी यांना ‘सेंट एलिझाबेथ नर्सिंग होम’मध्ये दाखल करण्यात आले होते आणि तेथे रुम क्रमांक 26 मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मीना कुमारी यांचे शेवटचे शब्द ‘आपा, मला मरायचे नाही’ हे होते, असे म्हटले जाते.

हेही वाचा :

संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग, ‘ओव्यांच्या खजिन्या’ने दिवाळी होणार चैतन्यदायी!

आलिया भट्ट-रणबीर कपूर डिसेंबरमध्ये लग्नबेडीत अडकणार? चित्रपटांचे चित्रीकरण ढकलले पुढे!

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.