Nandita Dutta : अश्लील चित्रपटांच्या जगातील मल्लिका म्हणून ओळखली जाते नंदिता दत्ता, ‘Nancy Bhabhi’ म्हणून मिळवली प्रसिद्धी

विविध शहरांमध्ये अश्लील चित्रपट बनवणाऱ्या टोळ्या उघडकीस येत आहेत. हे रॅकेट कोलकातामध्येही उघड झालं असून नंदिता दत्तासह एकाला अटक करण्यात आली आहे. (Nandita Dutta, popularly known as Mallika, gained fame as 'Nancy Bhabhi')

Nandita Dutta : अश्लील चित्रपटांच्या जगातील मल्लिका म्हणून ओळखली जाते नंदिता दत्ता, 'Nancy Bhabhi' म्हणून मिळवली प्रसिद्धी

मुंबई : नवीन मुलींना वेब सीरिजमध्ये (Web Series) काम करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल आणि अश्लील चित्रपटांचं (Dirty Picture) बळजबरीने शूटिंग केल्याच्या आरोपाखाली कोलकातामध्ये (Kolkata) अटक करण्यात आलेल्या नंदिता दत्ताला (Nandita Dutta) अश्लील चित्रपटांच्या जगातील मल्लिका म्हणून ओळखलं जात आहे. तिने स्वत: अश्लील चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि तिच्या चाहत्यांमध्ये तिचे पात्र नॅन्सी भाभी म्हणून खूप लोकप्रिय आहे.

नुकतंच मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी अटक केली. तेव्हापासून देशातील विविध शहरांमध्ये अश्लील चित्रपट बनवणाऱ्या टोळ्या उघडकीस येत आहेत. हे रॅकेट कोलकातामध्येही उघड झालं असून नंदिता दत्तासह एकाला अटक करण्यात आली आहे.

‘नॅन्सी भाभी’ म्हणूनही आहे ओळख

नंदिता दत्ताला ‘नॅन्सी भाभी’ म्हणूनही ओळखलं जातं, असं पोलिसांचं म्हणणं आहे. ती बऱ्याच काळापासून अश्लील चित्रपटांच्या व्यवसायात गुंतलेली होती. ती या व्यवसायात नवीन मॉडेल आणायची आणि त्यासाठी ती फेसबुकवर जाहिरात करायची, ज्यामुळे मुली तिच्याकडे आकर्षित होत होत्या. आधी सामान्य शूटिंग किंवा अर्धे नग्न शूटिंग होते आणि नंतर मोठ्या पैशाचा लोभ दाखवून अश्लील चित्रपट केले जात. आणि यात बऱ्याच मुलींचा समावेश आहे. मात्र, कोलकात्यातील या घटनेनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोशल मीडियावरही आहेत अश्लील फोटो 

नंदिता दत्ता एक अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून सोशल मीडियावर ओळखली जाते. तिचे सोशल मीडियावर मोठ्या संख्येने फॅन फॉलोअर्स आहेत आणि तिचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंट्स देखील नॅन्सी भाभीच्या नावानं आहेत आणि तिच्यावर अश्लील फोटो पोस्ट केली गेली आहेत, जी सहज लोकांना आकर्षित करताना दिसतं. नंदिता दत्ता नेहमीच सोशल मीडिया चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी असे आणि व्हिडिओ पोस्ट करायची. नंदिता उर्फ ​​नॅन्सी भाभीनं अलीकडेच एका तेलगू मासिकासाठी मॉडेलिंग केलं आहे. सोशल मीडिया अकाऊंटवरून हे समोर आलं आहे.

संबंधित बातम्या

Tara Sutaria : आता बॉलिवूडची हॉट अभिनेत्री तारा सुतारियाही सोशल मीडियावर ट्रोल, नेटकरी म्हणाले…

Shraddha Kapoor | श्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, चाहत्यांनी पापाराझींना फटकारले!

Malaika Arora : मलायका अरोराचा ग्लॅमरस फोटोशूट, लवकरच झळकणार ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन 2’मध्ये

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI