Navya Naveli Nanda: अमिताभ बच्चन यांची नात अभिनेता सिद्धांतला करतेय डेट? चर्चांनंतर कमेंट केली डिलिट

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) सध्या तिच्या इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमुळे चर्चेत आहे. नव्या ही अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला (Siddhant Chaturvedi) डेट करत असल्याच्या चर्चेला सोशल मीडियावर उधाण आलंय.

Navya Naveli Nanda: अमिताभ बच्चन यांची नात अभिनेता सिद्धांतला करतेय डेट? चर्चांनंतर कमेंट केली डिलिट
Navya Naveli Nanda, Siddhant Chaturvedi
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Apr 22, 2022 | 11:05 AM

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) सध्या तिच्या इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमुळे चर्चेत आहे. नव्या ही अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला (Siddhant Chaturvedi) डेट करत असल्याच्या चर्चेला सोशल मीडियावर उधाण आलंय. या चर्चांदरम्यान आता नव्याने सिद्धांतच्या फोटोवर तिने केलेली कमेंट डिलिट केली. इतकंच नव्हे तर नव्याने तिच्या स्वत:च्या इन्स्टाग्राम पोस्टवरील कमेंटसुद्धा एडिट केली आहे. त्यामुळे नव्या आणि सिद्धांत यांच्यात काहीतरी शिजतंय, असा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला. याआधीही या दोघांनी सोशल मीडियावरील एकमेकांच्या फोटोंवर कमेंट्स केले आहेत. नव्या आणि सिद्धांतने इन्स्टाग्रामवर नुकतेच फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवरूनच डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली.

नव्या नुकतीच हिल स्टेशनला फिरायला गेली असून सोमवारी तिने छतावर बसल्याचा फोटो पोस्ट केला होता. ‘चंद्राने फोटो काढला’, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं होतं. तर दुसरीकडे सिद्धांतनेही त्याचा एक फोटो पोस्ट केला होता. सिद्धांतच्या फोटोवर नव्याने सूर्याचा इमोजी पोस्ट करत कमेंट केली होती. सिद्धांतने ऋषीकेशमधील काही व्हिडीओसुद्धा पोस्ट केले होते. या व्हिडीओमध्ये ज्या छतावर नव्या बसली होती, तसंच दृश्य नेटकऱ्यांनी पाहिलं. ‘अपना मन और मून दोनो क्लिअर’, असं कॅप्शन सिद्धांतने व्हिडीओला दिलं होतं. या सर्व गोष्टींचा अंदाज बांधत नेटकऱ्यांनी नव्या आणि सिद्धांतच्या रिलेशनशिपवरून कमेंट्स करायला सुरुवात केली. या दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरु झाल्यानंतर नव्याने तिच्या फोटोवरील कमेंट एडिट केलं आणि सिद्धांतच्या फोटोवरील तिची कमेंट डिलिट केली.

नव्याची पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)

नव्या आणि सिद्धांतच्या पोस्टवरील कमेंट्स-

सिद्धांत नुकताच ‘गेहराईयाँ’ या चित्रपटात झळकला होता. यामध्ये त्याने दीपिका पदुकोण आणि अनन्या पांडे यांच्यासोबत भूमिका साकारली होती. तो लवकरच ‘फोन भूत’ या चित्रपटात कतरिना कैफ आणि इशान खट्टरसोबत काम करणार आहे. याशिवाय ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटात तो अनन्या पांडे आणि आदर्श गुरव यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. नव्या ही श्वेता बच्चन नंदाची मुलगी आणि अमिताभ बच्चन यांची नात आहे. नव्या चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र तिने फिल्म इंडस्ट्रीत येण्याचा कोणताच विचार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. याऐवजी ती वडील निखिल नंदा यांचा व्यवसाय सांभाळणार असल्याचं म्हटलं जातंय.

हेही वाचा:

KGF 2: “लोकांनी त्याला मूर्खपणा म्हटलं, पण..” केजीएफ 2ला मिळणारा प्रतिसाद पाहून यशने पोस्ट केला Video

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत ‘हा’ लोकप्रिय अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें